7.5 कोटींची आलिशान इलेक्ट्रिक कार बाजारात; असे आहेत जोरदार फीचर

Rolls Royce Spectre | रोल्स रॉयसने भारतीय बाजारात पहिली इलेक्ट्रिक कूप स्पेक्टर उतरवली आहे. या कारची एक्स शोरुम किंमत 7.5 कोटी रुपये आहे. आलिशान ईव्ही सेगमेंटमध्ये सर्वात खास कार, रोल्स रॉयस स्पेक्टरची चर्चा रंगली आहे. काय आहेत या कारचे फीचर, तुम्हाला माहिती आहे का?

7.5 कोटींची आलिशान इलेक्ट्रिक कार बाजारात; असे आहेत जोरदार फीचर
Follow us
| Updated on: Jan 19, 2024 | 3:49 PM

नवी दिल्ली | 19 जानेवारी 2024 : रोल्स रॉयस स्पेक्टर, जगभरात धुमाकूळ घालणारी ही आलिशान इलेक्ट्रिक कार सरतेशेवटी भारतीय बाजारात दाखल झाली. सुपर लक्झरी सेडान आणि एसयुव्ही तयार करणारी ब्रिटिश कंपनी रोल्स रॉयसच्या या लक्झिरियस कारची सध्या मार्केटमध्ये हवा आहे. या अल्ट्रा-लक्झरी इलेक्ट्रिक सुपर कूपची एक्स शोरुम किंमत 7.5 कोटी रुपये आहे. सिंगल चार्जमध्ये ही कार 530 किलोमीटर धावते. रोल्स रॉयल स्पेक्टरला गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात इंग्लंडमधील वेस्ट ससेक्स येथे सर्वात अगोदर सादर करण्यात आले. या कारला जगभरात जोरदार प्रतिसाद मिळाला.

  • इलेक्ट्रिक कूपमध्ये 102 kWh बॅटरी पॅक आहे
  • यामध्ये ड्युएल इलेक्ट्रिक मोटर सेटअप देण्यात आले आहे. त्यामुळे चारही चाकांना पॉवर मिळते
  • तर फ्रंट एक्सेलला 254 बीएचपी पॉवर मिळते, रिअर ऐक्सलला 482 बीएचपी पॉवर मिळते
  • या लक्झरी इलेक्ट्रिक कारला 576 बीएचपी कमाल पॉवर, 900 न्यूटन मीटर पिक टॉर्क जेनरेट होते

कसा आहे लूक

लूक आणि फीचर्सचा विचार करता ही कार रोल्स रॉयस स्पेक्टर दिसायला रोल्स रॉयस रेथसारखी दिसते. यामध्ये रुंद आणि इल्युमिनेटेड फ्रंट ग्रिल, रिडिझाईन्ड सिग्नेचर स्पिरिट ऑफ एक्सटेसी, 2 डोअर सेटअर, 23 इंचचे व्हील, स्टारलाईट डोर्ससह इतर अनेक फीचर्स मिळतात, त्यामुळे ती एक अल्ट्रा लक्झरी कार ठरते. या कारवर भारतीय श्रीमंत वर्ग पण फिदा झाला आहे. खास लूक, इंटिरिअर आणि फीचर यामुळे ही कार लोकप्रिय ठरली आहे.

हे सुद्धा वाचा

मागणीत मोठी वाढ

जगभरात स्पेक्टरवर श्रीमंतांच्या उड्या पडल्या आहेत. 2024 मध्ये या कारची मागणी अधिक वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. नवी दिल्लीतील रोल्स-रॉयस मोटर कारचे मुख्य डीलर यदुर कपूर यांनी या कारच्या खास फीचरचे कौतूक केले. उत्तर भारतात ही कार लाँच करताना आनंद होत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. अत्याधुनिक डिझाईन, दिमाखदार इंटिरिअर, इंजिनिअरिंग आणि इनोव्हेशन्स यामुळे या कारचा खास वर्ग तयार झाला आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.