स्कॉर्पियो एसयुव्हीत झाले मोठे बदल… ‘हे’ नवीन दमदार 15 फीचर्स वाढले
महिंद्राच्या अनेक लोकप्रिय कारमधील स्कॉर्पियो ही एक आहे. पहिली स्कॉर्पियो लाँच झाल्यापासून ते आजपर्यंत या गाडीच्या डिझाईनमध्ये तसेच कलर टेक्चरमध्ये अनेक बदल करण्यात आलेत. प्रत्येक वेळी ग्राहकांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. आता कंपनीने नवीन स्कॉर्पियोतही अनेक बदलांसह 15 नवीन फीचर्स दिले आहेत.

महिंद्रा स्कॉर्पियो (mahindra scorpio) ही देशातील सर्वाधिक लोकप्रिय गाड्यांमधील एक आहे. आपण रस्त्यांवर बर्याचदा स्कॉर्पियोला पाहत असतो. दमदार लूक, इंजीन तसेच बूटस्पेस, ग्राउंल लेव्हलसाठीही महिंद्राच्या स्कॉर्पियोला ग्राहकांची सर्वाधिक पसंती मिळत असते. आता महिंद्राकडून आपल्या नवीन लूक व फीचर्स (features) असलेल्या स्कॉर्पियोला लाँच करण्याची तयार करण्यात येत आहे. या कारच्या इंटीरिअर डिझाइलनशी संबंधित अनेक फोटो लिक झाले आहेत. नवीन स्कॉर्पियो पहिल्यापेक्षा जास्त ॲडव्हान्स आणि स्टाइलिश (Stylish) बनविण्याचा प्रयत्न कंपनीकडून करण्यात आलेला आहे. यात पहिल्यापेक्षा अनेक बदल करण्यात आलेले आहेत. त्यातील अनेक बदल हे सिटींग अरेंजमेंटशी संबंधित आहेत.
आतापर्यंत नवीन स्कॉर्पियोच्या टेस्टींगदरम्यान व्हायरल झालेल्या फोटोंवरुन तिच्यात करण्यात आलेल्या बदलांबाबत बोलले जात आहे. त्यामुळे हे नवीन मॉडेल लवकरच बाजारात दाखल होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. फोटातून इंटीरिअरबाबतही विविध माहिती समोर येत आहे. जुन्या मॉडेलच्या तुलनेत नवीन स्कॉर्पियोत काय नवीन बदल करण्यात आलेय, याची माहिती जाणून घेणार आहोत.
1) नवीन स्कॉर्पियोच्या डेशबोर्डला पूर्णपणे बदलण्यात आले आहे.
2) नवीन मॉडेलमध्ये ॲप्पल कार प्ले आणि अँड्रोईड ऑटो असं दोघांना सपोर्ट करेल असा मोठा टचस्क्रीन देण्यात आलेला आहे.
3) फ्रंटला असलेल्या एसी व्हेंट्सलाही नवीन डिझाईन देण्यात आले आहे. मागील एसी व्हेंट्समध्येही बदल केले आहेत.
4) ड्राईव्हर सिटला हाइट ॲडजेस्टेबल बनविण्यात आले आहे.
5) नवीन महिंद्रा स्कॉर्पियोला 360 डिग्री कॅमेरा ऑप्शन देण्यात आलेले आहे.
6) डिजिटल एनालॉग मीटरला अधिक चांगले बनविण्यासाठी त्यातही बदल करण्यात आले आहे.
7) नवीन मॉडेलला रिव्हर्स कॅमेरा क्रूज कंट्रोल, मल्टीपल एअरबॅग या सारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत.
8) टायर प्रेशरला तपासण्यासाठी मॉनिटरिंग सिस्टम आणि रिअर डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.
9) सिटींग अरेंजमेंटमध्येही मोठे बदल करण्यात आले आहे. तिसरी रांग पहिल्यासारखी नसून त्यात फ्रंट फेसिंग देण्यात आले आहे.
10) ड्युअल पॉड प्रोजेक्टर एलईडी हेडलँप फीचर देण्यात आले असून त्यात, डीआरएल फिक्स केले आहे.
11) कंपनीने फॉग लँपच्या डिझाईनमध्येही अनेक बदल केले आहेत. त्याला सी शेप क्रोम ट्रिम्समध्ये उपलब्ध करुन दिले आहे.
12) बाहेरील डिझाइनबद्दल बोलायचे झाल्यास, त्यातही मोठे बदल करुन जास्त चौडे एअर डॅम दिले आहेत.
13) अलॉय व्हील्स आणि टेल लँपमध्येही अनेक बदल केले आहेत.
14) बाहेरील बदलांसाठी कंपनीने मल्टी स्लॅटेड ग्रीलचा वापर केलेला आहे.
15) ही कार 6 स्पीड मॅन्यूअल आणि 6 स्पीड टॉर्क कनव्हर्टर ऑटोमॅटिक गिअर बॉक्ससह उपलब्ध होणार आहे.