Electric Scooter : जुलैमध्ये ‘या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर्स शब्दश: गाजल्या! यातील तुमची फेवरेट कोणती?
इंधनाचे वाढते दर, वाढती महागाई आदी विविध कारणांमुळे भारतीय दुचाकी बाजारपेठेत इलेक्ट्रिक स्कूटरच्या सेगमेंटमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. Okinawa Praise Pro, TVS iQube Electric, Bajaj Chetak, Ather 450X आणि Okinawa Ridge Plus आदी स्कूटरची मार्केटमध्ये चलती राहिली आहे.
भारतीय टू-व्हीलर मार्केट सध्या गरम आहे. त्यातच पेट्रोलचे वाढते दर पाहता, आता इलेक्ट्रिक स्कूटर्सचे (Electric Scooter) मार्केट शेअर मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. इलेक्ट्रिक दुचाकीमध्ये कमी किमतीत अनेक चांगले पर्याय ग्राहकांसमोर निर्माण झालेले आहेत. या स्कूटरच्या माध्यमातून युजर्स केवळ डेली युजच नाही तर अगदी व्यावसायिक (Professional) सामान वाहून नेण्यासाठीही तिचा वापर करीत आहे. त्यामुळे छोट्या-मोठ्या व्यापाराचे सामान वाहून नेण्यासाठी या स्कूटर उपयोगी पडत आहेत. आज या लेखात आपण अशाच काही स्कूटरबाबत माहिती घेणार आहोत, ज्या जुलै महिन्यात सर्वाधिक विकल्या (Sale) गेल्या होत्या. या यादीत 5 स्कूटर्सचा समावेश आहे.
- Okinawa Praise Pro : ओकिनावाची ही स्कूटर एक बजेट सेगमेंटमधील स्कूटर आहे. स्कूटरची किंमत 84747 रुपये (एक्सशोरूम) आहे. ही स्कूटर फक्त एकाच प्रकारात खरेदी केली जाउ शकते. ही स्कूटर जुलैमध्ये सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक स्कूटर ठरली आहे.
- TVS iQube : ही TVS स्कूटर आकर्षक लूक आणि मजबूत बिल्ट क्वालिटीसह येते. जुलै 2022 मध्ये या स्कूटरच्या एकूण 6304 युनिट्सची विक्री झाली आहे. TVS ची ही इलेक्ट्रिक स्कूटर सध्या तीन प्रकारात सादर केली जात आहे.
- Bajaj Chetak : जुलै महिन्यातील विक्रीत बजाज चेतकचे 3000 युनिट्स विकले गेले आहेत विक्रीमध्ये ही स्कूटर तिसऱ्या स्थानावर आहे. या स्कूटरमध्ये अनेक चांगले फीचर्स देण्यात आले असल्याने ग्राहकांच्या पसंतीला उतरत आहे.
- Ather 450X : ही इलेक्ट्रिक स्कूटर जुलैमध्ये विक्रीच्या बाबतीत चारव्या क्रमांकावर आहे. यात नवीन पॉवर ट्रेन आहे. यासोबतच यामध्ये मोठी बॅटरी आणि अनेक नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. हे तीन व्हेरियंटमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. नवीन प्रकारात इको मोडवर 105 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देण्याचा दावा करण्यात आला आहे.
- Okinawa Ridge Plus : Okinawa ची ही स्कूटर पाचव्या स्थानावर आहे स्कूटरची सुरुवातीची किंमत 66787 रुपये (एक्सशोरूम) आहे. तसेच यामध्ये 800 वॅटच्या मोटर्सचा वापर करण्यात आला आहे. ते एका चार्जवर 120 किमी अंतर कापू शकते. जुलै महिन्यात स्कूटरच्या 1302 युनिट्सची विक्री झाली आहे.
Non Stop LIVE Update