Electric Car : दमदार इलेक्ट्रिक कार लवकरच बाजारात! ग्राहकांची लॉटरी लागणार
Electric Car : देशात इलेक्ट्रिक कारचे मार्केट वाढत आहे. भारतात पुढील एका वर्षात 10 पेक्षा अधिक इलेक्ट्रिक कार बाजारात येतील. यावेळी टाटा मोटर्ससोबत महिंद्रा अँड महिंद्रा, किआ मोटर्स, हुंदई मोटर आणि मारुती सुझुकी पण मैदानात उतरणार आहेत. कोण-कोणत्या इलेक्ट्रिका कार बाजारात येणार आहेत, काय असेल त्यांची किंमत?
नवी दिल्ली | 23 सप्टेंबर 2023 : इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये धुमशान होणार आहे. अनेक कंपन्या इलेक्ट्रिक कार बाजारात धमाका (New Electric Cars Launch In India) करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. टाटा मोटर्सच नाही तर महिंद्रा अँड महिंद्रा, किआ मोटर्स, हुंदई मोटर आणि मारुती सुझुकी पण बाजारात उतरणार आहेत. या कंपन्या एकापेक्षा एक इलेक्ट्रिक कार आणतील. यामध्ये टाटा हॅरियर ईव्ही, पंच ईव्ही, कर्व्ह ईव्ही, तर हुंदाई आयोनिक 6, किआ ईवी9, मारुती सुझुकी ईव्हीएक्स, महिंद्रा एक्सयूवी.ई8 सह 10 पेक्षा अधिक इलेक्ट्रिक कार बाजारात येतील. येत्या काही दिवसात ईव्ही खरेदीचा विचार करत असाल तर थोडी कळ काढा. बाजारात अनेक पर्याय तुम्हाला मिळतील.
टाटा मोटर्सचा इलेक्ट्रिक ताफा
टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक कार बाजारात धडाक्यात सुरुवात केली आहे. नवीन ईव्ही कार बाजारात दाखल होतील. लूक, फीचर, रेंज आणि स्पीडमध्ये या कार जोरदार असतील. यामध्ये सर्वाधिक प्रतिक्षा पंच ईव्हीची आहे. पंच इलेक्ट्रिक कारची सुरुवात 10 लाख रुपयांपासून होण्याची शक्यता आहे.
इतर कंपन्या पण मैदानात
महिंद्रा अँड महिंद्राची इलेक्ट्रिक एसयुव्ही XUV.e8 ची चाचणी सुरु आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला ही कार भेटीला येऊ शकते. ही कार महिंद्रा एक्सयूवी700 वर आधारीत असेल. यामधे दमदार फीचर, बॅटरी रेंज जोरदार असतील. मारुती सुझुकी पण मैदानात आहे. इलेक्ट्रिका एसयुव्ही ईव्हीएक्स यावर्षी ऑटो एक्सपोमध्ये दिसली होती. फीचर, रेंज आणि पॉवरफुल बॅटरी या जमेच्या बाजू आहेत.
हुंदई आणि किआच्या इलेक्ट्रिक कार
हुंदाई मोटर इंडिया काही दिवसात त्यांची प्रीमियम इलेक्ट्रिक एसयुव्ही आयोनिक 6 लाँच करण्याची शक्यता आहे. यासोबतच कोना फेसलिफ्टेड मॉडल येऊ शकते. किआ मोटर्स पण त्यांची मोठ्या साईजची इलेक्ट्रिक एसयुव्ही ईव्ही9 पुढील वर्षांत भारतीय बाजारात दाखल होईल. या नवीन इलेक्ट्रिक कारची सविस्तर माहिती लवकरच समोर येईल. या कारची किंमत आणि इतर माहिती कंपन्या कळवतील. काही कंपन्या दिवाळीत तर काही कंपन्या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच इलेक्ट्रिक कार बाजारात धमाका करु शकतात.