कार कंपन्यांकडून आता सीएनजी वाहनांची निर्मिती; ‘या’ कंपन्यांच्या कार लवकरच बाजारात होणार दाखल!
इंधनाचे वाढते दर पाहता पेट्रोल-डिझेलपेक्षा आता इलेक्ट्रिक व सीएनजी वाहनांना मागणी वाढली आहे. सरकारदेखील या वाहनांना प्रोत्साहन देत असल्याने कार निर्मात्या कंपन्या आपल्या आधीच्या कार मॉडेलला सीएनजी व्हेरिएंटमध्ये आणत आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून राज्यासह देशात पेट्रोल-डिझेलचे (Petrol-diesel) दर गगनाला भिडले आहेत. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने इंधनावरील कर कमी केला असला तरी अद्यापही इंधनाचे दर शंभरी पारच आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचे (Inflation) चटके सहन करावे लागत आहे. इंधनाचे वाढते दर पाहता पेट्रोल-डिझेलपेक्षा आता इलेक्ट्रिक व सीएनजी वाहनांना (CNG car) मागणी वाढली आहे. सीएनजी वाहनांचा विचार करताना सरकारदेखील या वाहनांना प्रोत्साहन देत असल्याने कार निर्मात्या कंपन्या आपल्या आधीच्या कार मॉडेलला सीएनजी व्हेरिएंटमध्ये आणत आहे. काही कार निर्मात्या कंपन्यांनी सीएनजी व्हेरिएंटच्या कार्सची निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. पुढील काही महिन्यांमध्ये कोणत्या सीएनजी कार्स बाजारात येणार आहेत, याची माहिती घेउयात
1) मारुती सुझुकी बलेनो
मारुती सुझुकी लवकरच अपडेटेड बलेनो कारचे नवीन व्हर्जन बाजारात आणत आहे. हे बलेनो कारचे सीएनजी व्हर्जन असणार आहे. बलेनो सीएनजीमध्ये 1.2 लीटर इंजिन असेल. सीएनजीवर चालल्यावर हे इंजिन 77 पीएसची पॉवर आणि 98.5 न्यूटनचा टार्क जनरेट करेल. ही कार 2022 मध्ये मॅन्यूअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही ट्रांसमिशनमध्ये उपलब्ध होणार आहे. या कारचा मायलेज 30 किमीपर्यंत असू शकतो.
2) मारुती सुझुकी स्विफ्ट
स्विफ्ट ही देशात सर्वाधिक विकली जाणारी हॅचबॅक कार आहे. डिझायर सीएनजी सारखे स्विफ्ट सीएनजीमध्ये 1.2 ड्युअल जेट K12C पेट्रोल इंजिन आणि फॅक्टरी फिटेड सीएनजी किट देण्यात येणार आहे. सीएनजी मोडवर हे इंजिन 76 बीएचपी पॉवर आणि 96 एनएम टार्क जनरेट करेल. यात 7 इंचाचा टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, अँड्रोइड ऑटो ॲप्पल कनेक्टीव्हिटी, एलईडी हेडलँप आणि टेललाईट, रिअर पार्किंग कॅमेरा, फ्रंटला दोन एअरबेग आणि क्लाईमेट कंट्रोलसारखे आधुनिक फीचर्स देण्यात आले आहे.
3) विटारा ब्रेझा
आपल्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. सध्या विटारा ब्रेझा 1.3 लीटर मल्टीजेट डिझेल इंजिनसह उपलब्ध आहे. परंतु फेसलिफ्ट आल्यानंतर ही कार डिझेलऐवजी पेट्रोल इंजिनमध्ये बदलेल. लवकरच याचे सीएनजी मॉडेलदेखील येणार असल्याची माहिती आहे. नवीन मॉडेल सीएनजी फिटेड आणि 1.5 लीटर पेट्रोल इंजिनसह उपलब्ध होउ शकते.
4) टाटा अल्ट्रोज
इलेक्ट्रिक कार्ससह टाटा मोटर्स सीएनजी कार्सच्या निर्मितीतही आपले नशिब आजमावत आहे. टाटा आपली सीएनजी व्हेरिएंटवर चालणारी अल्ट्रोज कारचे नवीन मॉडेल लाँच करण्याच्या तयारीत आहे. काही दिवस आधीच अल्ट्रोजचे सीएनजी टेस्ट करण्यात आली होती. सीएनजी किट असलेली अल्ट्रोज 1.2 लीटर नॅच्यूरल ऐस्पीरेटेड 3 सिलेंडर पेट्रोल इंजिनसह काम करेल. सीएनजी मोडवर ही कार 72 बीएचपी आणि 95 एनएम टार्क जनरेट करेल.