AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टेस्ला पूर्वीच ही कंपनी फोडणार नारळ, इलेक्ट्रिक कार भारतात होणार दाखल

Tesla Elon Musk | भारतीय बाजारात इलेक्ट्रिक कार दाखल करण्यासाठी टेस्ला प्रयत्न करत आहे. एलॉन मस्कने यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेत भेट पण घेतली होती. पण या कारला अद्याप काही मुहूर्त लागला नाही. उलट टेस्लाच्या प्रतिस्पर्धी कंपनीने बाजारात उतरण्याची तयारी केली आहे. त्यामुळे टेस्लाच्या योजनेवर पाणी फेरले आहे.

टेस्ला पूर्वीच ही कंपनी फोडणार नारळ, इलेक्ट्रिक कार भारतात होणार दाखल
| Updated on: Oct 29, 2023 | 5:32 PM
Share

नवी दिल्ली | 29 ऑक्टोबर 2023 : भारत जगातील सर्वात मोठ्या बाजार पेठेपैकी एक आहे. येथील मध्यमवर्ग सातत्यपूर्ण कामगिरी करत आगेकूच करत आहे. तो श्रीमंत होत आहे. भारताची अर्थव्यवस्था सध्या उभारीवर आहे. त्यामुळे जागतिक ब्रँड भारतात येण्यासाठी धडपडत आहेत. अनेक जागतिक कंपन्यांनी चांगलीच मांड ठोकली आहे. तर काही कंपन्यांना एंट्री करायची आहे. इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाला तर भारतात येण्यासाठी बाशिंग लावून बसली आहे. पण या कारला अद्याप मुहूर्त लागला नाही. उलट टेस्लाच्या प्रतिस्पर्धी कंपनीने भारतात येण्याचा मार्ग प्रशस्त केला आहे. त्यामुळे एलॉन मस्कची चिंता वाढली आहे.

VinFast Auto भारतात

व्हिएतनामची इलेक्ट्रिक कार कंपनी VinFast Auto भारतात दाखल होणार आहे. ही कंपनी अमेरिकेत मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक कारची विक्री करते. आता या कंपनीने अगदी जवळ असलेल्या भारताकडे मोर्चा वळवला आहे. टेस्लासाठी केंद्र सरकारने अनेक सवलती दिल्या. पण कंपनीला केंद्र सरकारकडून अजून सवलती पदरात पाडून घ्यायच्या असल्याने टेस्लाची भारतातील एंट्री लांबली आहे.

‘विनफास्ट’ ला हवी जागा

‘विनफास्ट’ भारतात उत्पादन युनिट सुरु करणार आहे. त्यासाठी कंपनीला जागा हवी आहे. भारतात जमिनीच्या शोधात कंपनी आहे. ईटीच्या वृत्तानुसार, कंपनी तामिळनाडूतील दोन स्थळांची पाहणी करुन आली आहे. आता ही कंपनी गुजरातमध्ये प्रकल्पासाठी जागा शोधणार आहे.

कंपनीला हवा समुद्र जवळ

‘विनफास्ट’ अशा जागेच्या शोधात आहे, जिथे समुद्र अगदी जवळ असेल. कंपनी केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ आणि पीएलआय या योजनेचा फायदा उचलण्याची तयारी करत आहे. भारतात मोठ्या प्रमाणात उत्पादन करुन इलेक्ट्रिक कार मध्य-पूर्वेपर्यंत आणि इतर देशात विक्रीची कंपनीची योजना आहे. त्यामुळे समुद्र किनारा असलेल्या राज्यांना ही कंपनी पसंती देत आहे. कंपनीने चेन्नई जवळील मानालूर क्षेत्र आणि तुतीकोरन जिल्ह्यातील जमिनीची पाहणी केली आहे.

20 कोटी डॉलरची गुंतवणूक

कंपनी भारतात उत्पादन प्रकल्पासाठी 20 कोटी डॉलरची गुंतवणूक करणार आहे. म्हणजे जवळपास 1670 कोटी रुपये खर्च करणार आहे. भारतात 2026 पर्यंत इलेक्ट्रिक कारची असेम्बलिंग सुरु करण्याची कंपनीची योजना आहे. ‘विनफास्ट’ ही जगातील तिसरी सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी आहे. या कंपनीचे भारतात दरवर्षी 50,000 इलेक्ट्रिक कार तयार करण्याचे उद्दिष्ट आहे.

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.