Special Story : ‘या’ आहेत सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या देशातील टॉप 5 इलेक्ट्रिक कार्स

आज आम्ही तुम्हाला देशात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक कार्सबद्दल माहिती देणार आहोत. (Top 5 most selling electric cars in india)

Special Story : 'या' आहेत सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या देशातील टॉप 5 इलेक्ट्रिक कार्स
Follow us
| Updated on: Jan 30, 2021 | 8:29 AM

मुंबई : प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज कार कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. पूर्वी इलेक्ट्रिक कार्सच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिले नाही. कार कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स लाँच करत आहेत. तसेच यापूर्वीदेखील देशात काही इलेक्ट्रिक कार्स लाँच झाल्या आहेत. त्यापैकी काही कार्सना भारतीय ग्राहकांकडून पसंतीदेखील मिळत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच सर्वाधिक विक्री होणाऱ्या देशातील टॉप 5 कार्सबद्दल माहिती देणार आहोत. (Top 5 most selling electric cars in india, checkout the list)

टाटा नेक्सॉन ईवी (Tata Nexon EV)

टाटा मोटर्सच्या नेक्सॉन ईवी (Tata Nexon EV) या इलेक्ट्रिक कारला भारतीय ग्राहकांची चांगलीच पसंती मिळत आहे. लाँचिंगनंतर 11 महिन्यांमध्ये देशात या कारच्या 2 हजार 2300 हून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे. यावरुन आपण अंदाज लावू शकतो की देशात आता इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. यावर्षी ऑगस्ट महिन्यात 1000 नेक्सॉन ईवी रोलआऊट करण्यात आल्या. त्यानंतर गेल्या चार महिन्यात 1100 हून अधिक युनिट्सची रेकॉर्डब्रेक विक्री झाली आहे. टाटा मोटर्सने याबाबत म्हटले आहे की, नेक्सॉन ईवी ही देशात सर्वात जास्त विकली जाणारी इलेक्ट्रिक कार आहे. टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक एसयूव्हीची एक्स शोरूम किंमत 13.99 लाख रुपये ते 16.25 लाख रुपयांपर्यंत आहे. ही कार XM, XZ+ आणि XZ + LUX अशा तीन व्हेरियंट्समध्ये उपलब्ध आहे. नेक्सॉन ईव्हीच्या XM व्हेरियंटची किंमत 13.99 लाख रुपये आहे, तर XZ+ आणि XZ+ LUX व्हेरियंटची किंमत अनुक्रमे 15.25 लाख आणि 16.25 लाख रुपये आहे.

या इलेक्ट्रिक एसयूव्ही मध्ये दिलेलं इलेक्ट्रिक मोटर इंजिन 129PS पॉवर आणि 245Nm पीक टॉर्क जनरेट करतं. या कारमध्ये 30.2 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक आहे. एकदा फुल चार्ज झाल्यानंतर टाटा नेक्सॉन 312km पर्यंत धावू शकते. शून्य ते 100 किलोमीटर प्रति तास इतका वेग घेण्यासाठी नेक्सॉनला 9.9 सेकंद लागतात. नेक्सॉनला स्टँडर्ड 15A AC चार्जरने 20 टक्क्यांहून 100 टक्क्यांपर्यंत चार्ज करण्यासाठी 8 तास लागतात, तर फास्ट चार्जरने नेक्सॉनची बॅटरी 0 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्च करण्यासाठी 60 मिनिटे पुरेशी आहेत. या कारला 8 वर्षाची स्टँडर्ड वॉरंटी देण्यात आली आहे, तसेच यामध्ये IP67 वॉटरप्रूफ बॅटरी पॅकचा समावेश करण्यात आला आहे.

महिंद्रा e20 प्लस (Mahindra e2o Plus)

ही भारतातील सर्वात किफायतशीर इलेक्ट्रिक कार आहे. या कारची सुरुवातीची किंमत 7.48 लाख रुपये इतकी आहे. ही कार तीन ट्रिम्समध्ये उपलब्ध आहे. या कारची रेंज 140 किमी इतकी आहे. या हॅचबॅक कारमध्ये चार जण बसू शकतात. या कारचं टॉप स्पीड 80 किमी प्रति तास इतकं आहे.

टाटा टिगॉर EV (TATA Tigor EV)

टाटा टिगॉर EV या कारची किंमत 13.19 लाख रुपये इतकी आहे. टाटा मोटर्सने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ही कार लाँच केली होती. या कारची रेंज 213 किमीपर्यंत आहे. ही कार व्हाईट, ब्लू आणि सिल्व्हर कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. या गाडीचं फ्रंट ग्रिल खूपच आकर्षक आहे. स्टायलिश अलॉय, शार्क फिन अँटिना आणि LED हाय माउंटेड स्टॉप लँपसह ही कार उपलब्ध आहे. या कारमध्ये तुम्हाला ब्लॅक आणि ग्रे इंटिरियरसह हार्मन म्युझिक सिस्टिमही मिळते.

MG ZS EV

ही कार दोन ट्रिम्स ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये Excite आणि Exclusive चा समावेश आहे. MG ZS EV मध्ये 44.5 kWh ची लिक्विड कूल्ड लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे, जी 150 PS पॉवर आणि 353 Nm टॉर्क जनरेट करते. SUV एकदा चार्ज केल्यानंतर 340 किमीपर्यंत अंतर धावू शकते. MG ने म्हटलंय की, ZS EV मधील बॅटरी 15A होम सॉकेट आणि DC फास्ट चार्जरनेसुद्धा चार्ज करु शकता. 50 kW DC फास्ट चार्जरद्वारे ही बॅटरी चार्ज केली तर 80 टक्के बॅटरी चार्ज होण्यासाठी केवळ 50 मिनिटं पुरेशी आहेत. सुरक्षेसाठी या गाडीत 6 एयरबॅग्स, HDC, HSA, ABS आणि EBD सारखे स्टँडर्ड फिचर्स देण्यात आले आहेत. या कारची सुरुवातीची किंमत 20 लाख रुपये इतकी आहे.

ह्युंदाय कोना EV फेसलिफ्ट (Hyundai Kona EV Facelift 2021)

ह्युंदाय कंपनी कोना EV फेसलिफ्ट 2021 च्या रुपाने भारतात पहिली इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. डिसेंबर 2020 मध्ये ही कार ग्लोबल मार्केटमध्ये लाँच करण्यात आली आहे. ही कार लुक्स आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत जबरदस्त सिद्ध होईल, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ही कार भारतात लाँच झालेली नसली तर अनेक देशांमध्ये ही कार लाँच करण्यात आली आहे. तिथे या गाडीला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या गाडीची किंमत 23.71 लाख रुपये आहे.

संबंधित बातम्या

Special Story : 2021 मध्ये इलेक्ट्रिक कार्सचा जलवा, टाटा, महिंद्रा ते टेस्ला, अनेक बड्या कंपन्या शानदार कार लाँच करणार

देशात इलेक्ट्रिक कारची मागणी वाढली, टाटा मोटर्सच्या Nexon EV च्या 2,200 युनिट्सची विक्री

पेट्रोल पंपप्रमाणेच इलेक्ट्रिक गाड्यांसाठी ‘चार्जिंग’ स्टेशन उघडणार, चार्जिंगसाठी येणार ‘इतका’ खर्च!

2021 मध्ये येणार जबरदस्त इलेक्ट्रिक कार, एकदाच चार्ज करून 500 किमी धावणार

आता इलेक्ट्रिक कार चार्ज करावी लागणार नाही, ही कंपनी बॅटरी स्वॅपिंग सर्व्हिस सुरु करणार

(Top 5 most selling electric cars in india, checkout the list)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.