टोयोटा किर्लोस्कर मोटर्सची Toyota Hilux भारतात लाँच, फॉर्च्यूनर आणि इनोव्हा क्रिस्टाचा मिक्स अवतार

टोयोटा किर्लोस्कर मोटर्सने (Toyota Kirloskar Motor) त्यांची बहुप्रतीक्षित लाईफस्टाईल युटीलिटी व्हेईकल ‘द हायलक्स’ (Toyota Hilux) लाँच केली आहे. ही कार फॉर्च्यूनर आणि इनोव्हा क्रिस्टाचा मिक्स अवतार असल्याचे बोलले जात आहे.

टोयोटा किर्लोस्कर मोटर्सची Toyota Hilux भारतात लाँच, फॉर्च्यूनर आणि इनोव्हा क्रिस्टाचा मिक्स अवतार
Toyota Hilux
Follow us
| Updated on: Jan 20, 2022 | 3:11 PM

मुंबई : टोयोटा किर्लोस्कर मोटर्सने (Toyota Kirloskar Motor) त्यांची बहुप्रतीक्षित लाईफस्टाईल युटीलिटी व्हेईकल ‘द हायलक्स’ (Toyota Hilux) लाँच केली आहे. ही कार फॉर्च्यूनर आणि इनोव्हा क्रिस्टाचा मिक्स अवतार असल्याचे बोलले जात आहे. चांगला परफॉर्मन्स, अधिक कार्यक्षमता, पॉवर आणि अत्याधुनिकतेसह तुम्हाला यात शहरातील ड्राईव्हसाठी सर्वोत्तम सुखसोयी, अद्वितीय शक्ती, सु-संतुलित युटीलिटी आणि साहसाचा अनुभव मिळेल, असे कंपनीने म्हटले आहे.

हायलक्स हे नाव ‘हाय’ आणि ‘लक्झरी’ या शब्दांपासून बनलेले असून ते गेली अनेक दशके जगातील सर्व भूप्रदेशांत अतिशय ‘दणकटपणा’ आणि ‘कणखरपणा’ यांसाठी नावाजलेले आहे. हायलक्सच्या आजच्या बाजारातील लाँचमुळे अनेक SUV चाहत्यांची भारतीय रस्त्यांवर हायलक्सचा अनुभव घेण्याची प्रतीक्षा संपली आहे. आपल्या मूळ जातकुळीशी इमान राखत नवी टोयोटा हायलक्स ही स्थानिक परिस्थिती आणि गरजा लक्षात घेऊन तयार केली गेली आहे.

टोयोटा हायलक्सचे फीचर्स

  • या लेटेस्ट लाईफस्टाईल वाहनात आहे 2.8 लीटरचे फोर-सिलिंडर टर्बो-डीझेल इंजिन आणि हे 6-स्पीड ऑटोमॅटिक आणि 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे
  • यातील जागतिक दर्जाचे इंजिनियरिंग, वाढीव सुरक्षा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि या वर्गातील सर्वोत्तम (बेस्ट इन-क्लास) सुखसोयी यांमुळे तुमचा प्रत्येक दिवस देईल एक साहसी अनुभव. यातील ऑटोमॅटिक ट्रान्समिशन (AT) प्रकारात तुम्हाला मिळते या सेग्मेंट मधील सर्वोत्तम 204 HP पॉवर आणि 500 Nm चे टॉर्क आउटपुट, तर मॅन्युअल ट्रान्समिशन (MT) प्रकारात मिळते 204 HP पॉवर आणि 420 Nm चे टॉर्क आउटपुट. सर्व प्रकारांमध्ये (व्हेरीयंट) ग्राहकांना अत्यंत सहज ऑफ-रोडिंग साठी 4X4 ड्राईव्हट्रेन उपलब्ध आहे.
  • आपल्या कणखरपणासाठी सुप्रसिद्ध असलेल्या या लाईफस्टाईल वाहनात आहे मजबूत बॉनेट लाईन आणि सशक्त क्रोम फ्रेमसह पियानो ब्लॅक ट्रपीझॉयडल ग्रिल ज्यांच्या सहाय्याने दिला गेलाय एक बोल्ड लुक आणि अद्ययावत फील. याशिवाय या वाहनात आहेत सुपर क्रोम फिनिशसह आश्चर्यकारक 18-इंची अॅलॉय व्हील्स.
  • शार्प-स्वेप्ट बॅक एलईडी हेडलाईट्स आणि सुप्रसिद्ध नाईट-टाईम सिग्नेचरसह एलईडी रियर कॉम्बी लॅम्पस यांमुळे या लाईफस्टाईल वाहनाचा मॉडर्न लुक परिपूर्ण होतो.
  • विपरीत हवामान आणि आव्हानात्मक रस्त्यांवर वाहनावर संपूर्ण ताबा राखता येण्यासाठी यात आहेत सर्वोत्तम सुरक्षा फीचर्स जसे – 7 SRS एयरबॅग्स, वेहिकल स्टेबिलीटी कंट्रोल (VSC), ट्रॅक्शन कंट्रोल (TC) आणि इलेक्ट्रॉनिक प्रणाली
  • कोणत्याही परिस्थितीत चालकाकडे पूर्ण ताबा राखण्यासाठी यात आहेत इलेक्ट्रनिक डिफरन्शियल लॉक (EDL), ऑटोमॅटिक हिल असिस्ट कंट्रोल (HAC), डाऊनहिल असिस्ट कंट्रोल (DAC) आणि ऑटोमॅटिक लिमिटेड स्लिप डिफरन्शियल (ALSD)
  • वाहनाच्या स्पीडला शोभणारी नैसर्गिक हाताळणी देण्यासाठी VFC स्टेरिंग
  • अत्यंत आरामदायक ड्राईव्हसाठी यात आहेत सेग्मेंट मधील सर्वोत्तम (फर्स्ट-इन-सेग्मेंट) सुविधा जसे ड्राईव्ह मोड्स ऑप्शन्स (पॉवर आणि ईको), टायर अँगल मॉनीटर आणि फ्रंट पार्किंग सेन्सर्स
  • वाहनात प्रवाशांच्या सर्वोच्च आरामासाठी लेदर सीट्स, ड्यूएल झोन संपूर्ण ऑटोमॅटिक तापमान नियंत्रण प्रणाली, स्मार्ट एन्ट्री आणि ऑटो हेड लँम्प्स
  • मनोरंजन आणि सीमलेस कनेक्टीविटी तंत्रज्ञान देणारा अॅन्ड्रॉईड ऑटो /अॅपल कार-प्ले सह 8 इंची इन्फोटेनमेंट टेबल स्टाईल स्क्रीन यात देण्यात आली आहे.
  • टोयोटा हायलक्स कार इमोशनल रेड, व्हाईट पर्ल, सिल्व्हर मेटॅलिक, सुपर व्हाईट आणि ग्रे मेटॅलिक या रंगांमध्ये उपलब्ध आहे.

2 कोटी युनिट्सची विक्री

180 पेक्षा जास्त देशांमधील लक्षावधी लोकांची मने जिंकत हायलक्सच्या जागतिक विक्रीच्या आकड्याने 20 मिलियन युनिट्सचा टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे. गेली पाच दशके आणि आठ पिढ्यांपासून टोयोटा हायलक्सने काळाशी सुसंगत पावले टाकत लोकांना असामान्य अनुभव दिले आणि स्वतःच्या दैनंदिन आयुष्यात, मग ते व्यावसायिक असो की वैयक्तिक, एक असामान्यपणा आणू इच्छिणाऱ्यांशी एक अतूट नाते जोडले. जागतिक दर्जाचे इंजिनियरिंग, वाढीव सुरक्षा, आधुनिक तंत्रज्ञान आणि बेस्ट-इन-क्लास सुखसोयी अशी आपल्या सेग्मेंट मधले सर्वोत्तम (फर्स्ट -इन-सेग्मेंट) वैशिष्ट्ये टोयोटा हायलक्समध्ये तुम्हाला मिळतात.

शानदार कार

जगात सुप्रतिष्ठित अशा या वाहनाचा दमदार परफॉरमंस हा इनोव्हेटिव मल्टीपर्पज वेहिकल (IMV) प्लॅटफॉर्ममुळे आणि यातील सशक्त पॉवरट्रेन प्रणालीमुळे आहे. इनोव्हा क्रिस्टा आणि फॉर्च्युनर या भारतात आणि इतर अनेक देशांमध्ये यशस्वी झालेल्या वाहनांमध्ये असलेला हा तोच यशस्वी (बॉडी-ऑन-चॅसी) प्लॅटफॉर्म आहे. आपल्या सेग्मेंट मध्ये अग्रेसर असलेल्या ह्या मोडेल्सना ग्राहकांचा सकारात्मक प्रतिसाद सतत मिळतोय, कारण यांमध्ये सशक्त इंजिनसोबतच अनेक कमालीची वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय ड्रायव्हिंग कंडीशन्स कशाही असल्या तरीही विश्वास संपादन करत आहेत, कमालीची सहनशक्ती, कमी मेंटेनन्स खर्च, आणि वेगवेगळ्या कार्यांसाठी ही वाहने अतिशय व्यवहार्य ठरली आहेत.

हायलक्सच्या लांबी आणि उंचीमुळे तिचे अस्तित्व उठून दिसते. इंजिन हूड, पुढील बम्पर, लोअर गार्ड, आणि बम्परच्या कडा यांचा संगम होऊन या वाहनातील बोल्ड आणि अद्ययावत सशक्त क्रोम फ्रेमसह ट्रपीझॉयडल पियानो ब्लॅक रंगाचे ग्रिल अधोरेखित होते. यातील वैशिष्ट्यपूर्ण एलईडी रियर कॉम्बी लॅम्प्स मुळे याचे अस्तित्व अधोरेखित होते आणि रात्रीचे दिसण्याची क्षमता वाढते. ह्या वैशिष्ट्यात आणखी भर पडते ती 18 इंची अॅलॉय व्हील्समुळे.

सेफ्टी फीचर्स

टोयोटा तुमच्या सुरक्षेला सर्वोपरी महत्व देते, त्यामुळे चालक आणि प्रवासी यांच्या सुरक्षेसाठी, टोयोटा हायलक्सच्या सर्वच व्हेरीयंट्स मध्ये अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये दिली गेली आहेत. ABS, EBD, ब्रेक असिस्ट सिस्टीम आणि हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल यांमुळे रस्ता कसाही असो, तुमचे ड्रायव्हिंग सुरक्षित असते, ज्यामुळे ही गाडी सर्वांना हवीहवीशी आहे. या वाहनाच्या सर्वच व्हेरीयंट्स मध्ये रिव्हर्स कॅमेरा, क्लीयरन्स सोनार आणि बॅक-अप सोनार दिलेले आहे; याशिवाय 7 SRS एयर बॅग्स, डाऊनहिल असिस्ट कंट्रोल आणि वेहिकल स्टॅबिलीटी कंट्रोल अशा सोयींमुळे ग्राहकाला सर्वात सुरक्षित टोयोटा हायलक्स चालविल्याचा थरार आणि आनंद मिळतो.

या गाडीत दिल्या गेलेल्या अत्युच्च दर्जाच्या सुरक्षा फीचर्समुळे टोयोटा हायलक्स या गाडीला दक्षिण पूर्व आशियाई देशांसाठी असलेल्या न्यु कार असेसमेंट प्रोग्राम (ASEAN NCAP) कडून 5-स्टार क्रॅश सेफ्टी रेटिंग प्राप्त झाले आहे.

ऑनलाईन बुकिंग्स सुरु

टोयोटा हायलक्स साठी बुकिंग्स आता खुली आहेत. एप्रिल 2022 मध्ये डिलिव्हरीज सुरु करण्यापूर्वी मार्च 2022 मध्ये एक्स-शोरूम किमतींची घोषणा करण्यात येईल. ग्राहकांना ही कार ऑनलाईन (www.toyotabharat.com) बुक करता येईल किंवा नजीकच्या टोयोटा डीलरकडेही बुक करता येईल. टोयोटाच्या व्हर्च्युअल शोरूम मध्ये ग्राहकांना त्यांच्या घरातूनच आरामात हायलक्सचा अनुभव घेता येईल.

इतर बातम्या

शानदार ऑफर! 4.30 लाखांची Datsun कार 2.75 लाखात खरेदीची संधी

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे ग्राहक त्रस्त, Tata Motors उद्या दोन नवीन CNG कार लाँच करणार

धमाकेदार ऑफर! Maruti Alto अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी, कार आवडली नाही तर पैसे परत

(Toyota Hilux Pickup Truck Unveiled In India, know specs and features)

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.