AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Toyota च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ दोन लोकप्रिय गाड्यांबाबत कंपनीचा मोठा निर्णय

टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनी (Toyota Kirloskar Motor) पुन्हा एकदा आपल्या कार्सच्या किंमतीत वाढ करीत आहे.

Toyota च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, 'या' दोन लोकप्रिय गाड्यांबाबत कंपनीचा मोठा निर्णय
Toyota Glanza
| Updated on: May 10, 2021 | 5:06 PM
Share

मुंबई : टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनी (Toyota Kirloskar Motor) पुन्हा एकदा आपल्या कार्सच्या किंमतीत वाढ करीत आहे. इनोवा क्रिस्टा (Toyota Innova Crysta) आणि फॉर्च्युनर एसयूव्हीच्या (Toyota Fortuner SUV) किंमती वाढवल्यानंतर, कार निर्मात्या कंपनीने आता आपल्या प्रीमियम हॅचबॅक ग्लान्झा (Toyota Glanza) आणि सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही अर्बन क्रूझरच्या (Toyota Urban Cruiser) किंमतीही वाढवल्या आहेत. (Toyota Kirloskar increased prices of Glanza and Urban Cruiser)

टोयोटा कंपनीने या गाड्यांच्या किंमती किती प्रमाणात वाढवल्या आहेत, याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. दरम्यान, गेल्या काही काळापासून कंपनी सातत्याने आपल्या वाहनांच्या किंमती वाढवत आहे. टोयोटा अर्बन क्रूझर एसयूव्हीची किंमत 12,500 रुपयांनी वाढविण्यात आली आहे. ही किंमत मिड ग्रेड व्हेरिएंट्ससाठी आहे. त्याचबरोबर प्रीमियम ग्रेड प्रकारांमध्ये 5000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे, तर उच्च श्रेणीतील अर्बन क्रूझर 2500 रुपयांनी महाग झाली आहे.

त्याचबरोबर प्रीमियम हॅचबॅक हायब्रिड व्हेरिएंटच्या किंमतीत 33,900 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. टॉप स्पेक व्ही ट्रिमच्या किंमतीत 20,000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या वाढीचा अर्थ असा आहे की टोयोटा Glanza ची किंमत आता 7.34 लाख रुपयांवर गेली आहे आणि या कारच्या टॉप स्पेक व्हेरिएंटची किंमत 9.3 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते.

Innova Crysta महागली

टोयोटाने काही आठवड्यांपूर्वी भारतीय बाजारपेठेतील इतर मॉडेल्सच्या किंमतीही वाढवल्या आहेत. एप्रिल महिन्यात टोयोटाने इनोव्हा क्रिस्टा एमपीव्हीच्या सर्व व्हेरिएंट्सच्या किंमतीत 26,000 रुपयांची वाढ केली आहे. म्हणजेच आता या वाहनाची किंमत 16.52 लाख रुपये ते 24.59 लाख रुपयांदरम्यान असेल.

Fortuner च्या किंमतीत वाढ

त्याचबरोबर टोयोटा फॉर्च्युनर एसयूव्हीची किंमतही गेल्या महिन्यात 72,000 रुपयांनी महाग झाली आहे. आता या कारची किंमत 30.34 लाख रुपयांपासून सुरू होईल. या कारच्या टॉप व्हेरिएंटसाठी 38.30 लाख रुपये मोजावे लागतील. टोयोटाने आपले सुविधा केंद्र सध्या बंद केले आहे. 14 मेपर्यंत ते बंद राहील.

इतर बातम्या

Hero MotoCorp 16 मेपर्यंत दुचाकींची निर्मिती करणार नाही, जाणून घ्या कारण

Royal Enfield घेऊन लेह लडाखला जाण्याचा प्लॅन करताय, 3-4 महिने वाट पाहावी लागणार

भारतीयांच्या पसंतीस उतरलेली Mahindra ची SUV नव्या अवतारात लाँच होणार

(Toyota Kirloskar increased prices of Glanza and Urban Cruiser)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.