क्रेटाला टक्कर देण्यासाठी टोयोटाची नवीन कार; मायलेजमध्ये ठरणार अव्वल!
टोयोटा आणि मारुती सुझुकी कॉम्पॅक्ट एसयुव्ही सेगमेंटच्या कारवर एकत्र पध्दतीने काम करत आहेत. दोन्ही कंपन्यांच्या नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही एकाच प्लॅटफॉर्मवर आधारीत असतील, परंतु दोन्ही वाहनांची रचना बाहेरील स्ट्रक्चर तसेच नाव वेगवेगळे देण्यात येणार आहे.
ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये (Automobile sector) कॉम्पॅक्ट एसयूव्हीचा ट्रेंड वाढत चालला आहे. अनेक ग्राहक आता कॉम्पॅक्ट एसयूव्हीकडे वळलेले दिसून येत आहे. मागणी वाढल्याने पुरवठा करण्यासाठी विविध कार निर्मात्या कंपन्या आपल्या प्रोडक्शनमध्ये कॉम्पॅक्ट एसयूव्हीची संख्याही वाढवत आहे. आता सर्व कंपन्या या सेगमेंटमध्ये आपल्या कारही लाँच करत आहेत. टोयोटा किर्लोस्कर मोटरने देखील ह्युंदाई क्रेटाला टक्कर देण्यासाठी तयारी केली आहे. टोयोटा (Toyota) आणि मारुती सुझुकी इंडिया कॉम्पॅक्ट एसयुव्ही (SUV) वर एकत्र काम करत आहेत. दोन्ही कंपन्यांच्या नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही एकाच प्लॅटफॉर्मवर आधारित असतील. सध्या दोन्ही कंपन्या विटारा ब्रेझा आणि बलेनो एकमेकांच्या सहकार्याने बनवत आहेत.
टोयोटाकडून नाव नोंदणी
मारुतीच्या नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्हीचे कोडनेम YFG आहे आणि टोयोटाने तिचे कोडनेम D22 ठेवले आहे. एका रिपोर्टनुसार, टोयोटाने या नवीन एसयुव्हीसाठी HyRyder नावाची नोंदणी केली आहे. म्हणजेच क्रेटाला टक्कर देण्यासाठी येणाऱ्या या कारचे नाव Toyota HyRyder असू शकते. तसे, कंपनीने इनोव्हा हायक्रॉस नावाने आणखी एका नावाची नोंदणी केली आहे.
जूनमध्ये दाखल होणार एसयुव्ही?,
पुढील महिन्यात मारुती आणि टोयोटा नवीन कारची पहिली झलक ग्राहकांना दाखवतील अशी अपेक्षा आहे. त्याचे अधिकृत मार्केट लाँच ऑगस्टमध्ये केले जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास या दोन्ही कंपन्या यंदाच्या दिवाळीच्या सिजनमध्ये या वाहनांचे चांगले मार्केटिंग करू शकतील आणि कदाचित तोपर्यंत लोकांना या वाहनांची डिलिव्हरी देखील मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जास्तीत जास्त मायलेज
या नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्हीचे मायलेज बाजारातील इतर गाड्यांच्या तुलनेत सर्वाधिक असू शकते, असा दावा करण्यात येत आहे. याचे कारण म्हणजे यात टोयोटा आपले सेल्फ चार्जिंग हायब्रिड तंत्रज्ञान वापरू शकते. टोयोटाने अलीकडेच आपले संपूर्ण मार्केटिंग ‘हम हैं हायब्रीड’कडे वळवले आहे. कंपनी आपल्या सर्व वाहनांमध्ये या तंत्रज्ञानाचा प्रचार करत आहे. त्यामुळे वाहनांचे मायलेज वाढण्यास मोठी मदत होते.