Toyota Rumion : अर्टिगाचा हटके लूक, नवीन नावासह आता मिळतील तगडे फीचर्स

Toyota Rumion : मारुती अर्टिगा बाजारातील नावाजलेला ब्रँड आहे. आता तो हटके लूकसह आणि नव्या नावासह बाजारात एंट्री करत आहे. या नवीन कारमध्ये ग्राहकांना अनेक तगडे फीचर्स मिळतील.

Toyota Rumion : अर्टिगाचा हटके लूक, नवीन नावासह आता मिळतील तगडे फीचर्स
Follow us
| Updated on: Aug 11, 2023 | 8:47 AM

नवी दिल्ली | 11 ऑगस्ट 2023 : टोयोटा आणि मारुती सुझुकी (Toyota-Maruti Suzuki) या कंपन्यांनी एकत्र येत अनेक नवे मॉडेल्स बाजारात उतरविण्याचा चंग बांधला आहे. आता दोन कंपन्यांच्या जॉईंट वेंचरसह टोयोटा नवीन कार घेऊन येत आहे. ही एक एमपीव्ही आहे. अर्थातच ती मारुतीची सर्वाधिक लोकप्रिय एमपीव्ही अर्टिगावर आधारीत आहे. टोयोटाने या कारला ब्रँडिंगसह बाजारात उतरवले आहे. मारुती अर्टिगाने (Maruti Ertiga) बाजारात गेल्या अनेक वर्षांपासून मांड ठोकलेली आहे. ही कार भारतीयांनी डोक्यावर घेतली. ती भारतीज बाजारातील नंबर वन एमपीव्ही आहे. अर्टिगाची ही लोकप्रियता इनकॅश करण्याचा प्रयत्न या दोन्ही कंपन्या करत आहे. त्यासाठी अर्टिगा आता नव्या लूकसह, नव्या नावासह आणि दमदार फीचर्ससह बाजारात दाखल झाली आहे.

हा ब्रँड घालणार धुमाकूळ

अर्टिगा ही लोकप्रिय कार, टोयोटा रुमियन (Toyota Rumion) या नावाने बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी दाखल झाली आहे. कंपनीने ही कार बाजारात दाखल केली आहे. पण या कारची किंमत अजूनही जाहीर केली नाही. लवकरच या कारची किंमती जाहीर होऊ शकते.

हे सुद्धा वाचा

कधी होईल लॉन्च?

या कारच्या लॉचिंगची तारीख अजून समोर आली नाही. पण आता भारतात सणांचा हंगाम सुरु होत आहे. ऑगस्टपासून अनेक सणांची रेलचेल असेल. दसरा, दिवाळी सारखे मोठे सण येत आहे. त्यामुळे या सणांच्या तोंडावर ही कार लाँच होण्याची शक्यता आहे. त्यावेळी तिची किंमत पण समोर येईल. या कारच्या फर्स्ट लूकवर ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे.

डिझाईनमध्ये बदल

अर्टिगा तिच्या सेगमेंटमधील बेस्ट सेलिंग कार आहे. त्यामुळो टोयोटाला रुमियन सुद्धा यशस्वी होईल, अशी आशा आहे. टोयोटा रुमियन अर्टिगा कारचा नवीन अवतार आहे. यामध्ये इनोव्हा क्रिस्टासारखे फ्रंट ग्रिल्स आणि बंपरचा वापर करण्यात येत आहे. अलॉय व्हील्सचे डिझाईन पण बदलण्यात आले आहे. अनेक दमदार फीचर्स ग्राहकांना मिळतील.

कॉस्मेटिक चेंज

या कारला फ्रेश लूक देण्यासाठी कारचे इंटिरिअर आणि एक्सटिरिअर यामध्ये जबरदस्त बदल करण्यात आला आहे. या कारची पहिली झलकच मनात घर करते. फ्रंट ग्रिल्स आणि बंपरचा वापर करण्यात आल्याने ही कार अर्टिगापेक्षा हटके दिसते. या कारच्या कॉस्मेटिकमध्ये पण बदल करण्यात येत आहे. अर्टिगासारखीच ही कार 3 रो 7 सीटर लेआउटसह दिसेल. सर्वात विशेष म्हणजे कारमध्ये अर्टिगाच्या फीचर्ससह Toyota i-Connect फीचर्स दिसतील.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.