Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Two Wheeler : बुलेटला टक्कर देण्यासाठी बजाज-ट्राइंफची ‘ही’ बाईक मैदानात उतरणार

रशलेन डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, बजाज आणि ट्राइंफ मिळून एक नवीन प्रोडक्टवर काम करीत आहेत. या नवीन प्रोडक्टवरुन लवकरच परदा हटविण्यात येणार आहे. एका माहितीनुसार, ही बाइक रेट्रो क्लासिक स्क्रॅम्बलर आणि एक लो राइडिंग क्रूजर असणार आहे.

Two Wheeler : बुलेटला टक्कर देण्यासाठी बजाज-ट्राइंफची ‘ही’ बाईक मैदानात उतरणार
Bajaj Two WheelerImage Credit source: Bikedekho
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 11:35 AM

मुंबई : प्रीमिअम सेगमेंटच्या बाइक बनविणारी कंपनी ट्राइंफने (Triumph) बजाजसोबत (Bajaj) पार्टनरशिप केली आहे. याअंतर्गत आता मीडिअम सेगमेंटच्या प्रीमिअम बाइक लाँच करण्यात येणार आहे. दोन्ही कंपन्यांच्या पार्टनरशिपमधून तयार करण्यात येत असलेल्या प्रोडक्टबाबत नुकतीच काही माहिती लिक झाली आहे. रशलेन डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, बजाज आणि ट्राइंफ मिळून एक नवीन प्रोडक्टवर (Product) काम करीत आहेत. या नवीन प्रोडक्टवरुन लवकरच परदा हटविण्यात येणार आहे. एका माहितीनुसार, ही बाइक रेट्रो क्लासिक स्क्रॅम्बलर आणि एक लो राइडिंग क्रूजर असणार आहे. इंडियन आणि इंग्लिश कंपनीव्दारे तयार होत असलेले हे अपकमिंग प्रोडक्ट डिझाईनसह अनेक वेशिष्ट्यांनी परिपूर्ण असणार आहे.

दमदार लूक

या नवीन बाईकचा लूक अतिशय दमदार तयार करण्यात आला आहे. एका माहितीनुसार, ट्राइंफची ही अपकमिंग बाइक, कपंनीच्या आयकॉनिक बोनेविले फॅमिलीचाच एक भाग असणार आहे. सोबत यात अनेक नवीन फीचर्स देउन बाइकला एक दमदार लूक देण्यात आला आहे.

दरम्यान, बजाज आणि ट्राइंफ यांच्या पार्टनरशिपमध्ये या वर्षाच्या सुरुवातीपासून तयार करण्यात आलेली स्क्रॅम्बलर बाइक एका टेस्टिंगच्या दरम्यान दिसून आली होती. ही बाइक एक रोडस्टटेर व्हेरिएंटला लावण्यात आली होती. स्पॉट करण्यात आलेल्या फोटोंवरुन, या अपममिंग बाइकमध्ये 19 इंचाचा फ्रंट व्हील दाखविण्यात आले आहे. तर रियरवर 17 इंचाचे व्हील दिसून येत आहे. यात फूट पेग्स आणि हेंड्‌स गार्डदेखील देण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा

350 सीसी सेगमेंटच्या पंगतीत

बजाज-ट्राइंफची ही बाइक 350 सीसीच्या सेगमेंटमध्ये प्रवेश करण्यासाठी तयार आहे. सध्या या सेगमेंटमध्ये रॉयल एनफील्डचा दबदबा बघायला मिळत आहे. 350 सीसीच्या सेगमेंटमध्ये रॉयल एनफील्ड क्लासिक आणि त्याच्या दुसर्या बाइक्सचे चांगले मार्केट शेअर्स आहेत. इतकेच नाही तर रॉयल एनफील्डने या सेगमेंटमध्ये आपल्या थंडर, स्क्रॅम्बर आणि हिमालयन सारख्या बाइक्सदेखील लाँच करण्याच्या तयारीत आहे.

दरम्यान, बजाज-ट्राइंफची अपकमिंग बाइक मीडिअम सेगमेंटची बाइक असणार आहे. ही एक सिंगल सिलेंडर प्रीमिअम बाइक असणार आहे. ट्राइंफ सिंगल सिलेंडर बाइकदेखील तयार करीत आहे, परंतु बजाजचा सिंगल सिलेंडर बाइक कमी किमतीत तयार करण्यात हातखंडा आहे. अशात दोन्ही कंपन्या मिळून काही तरी नवीन तयार करण्याचा प्लॅन तयार करीत आहे. त्यामुळे कमी किमतीत दमदार बाइक निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे.

हत्येच्या कटाचे धसांचे गंभीर आरोप; मुंडेंची प्रतिक्रिया
हत्येच्या कटाचे धसांचे गंभीर आरोप; मुंडेंची प्रतिक्रिया.
दम नाही, त्यांनी हिंदी सिनेमे पाहणं कमी करावं, दमानियांचा धसांना सल्ला
दम नाही, त्यांनी हिंदी सिनेमे पाहणं कमी करावं, दमानियांचा धसांना सल्ला.
खोक्याच्या बायकोने धसांना फसवलं जात असल्याचा केला दावा
खोक्याच्या बायकोने धसांना फसवलं जात असल्याचा केला दावा.
‘समृद्धी’वरून प्रवास करताय? आजपासून टोलवाढ, तुमच्या गाडीला किती शुल्क?
‘समृद्धी’वरून प्रवास करताय? आजपासून टोलवाढ, तुमच्या गाडीला किती शुल्क?.
धसांना हरणाचं मांस पुरवलं? धसांनी Tv9 शी बोलताना सारंकाही सांगितलं
धसांना हरणाचं मांस पुरवलं? धसांनी Tv9 शी बोलताना सारंकाही सांगितलं.
पंतप्रधान मोदींचं अवतार कार्य संपलं आहे..; संजय राऊतांची प्रतिक्रिया
पंतप्रधान मोदींचं अवतार कार्य संपलं आहे..; संजय राऊतांची प्रतिक्रिया.
VIDEO: 'तेल लगाने गया...', L&T च्या सुरक्षा रक्षकाला मनसैनिकांचा हिसका
VIDEO: 'तेल लगाने गया...', L&T च्या सुरक्षा रक्षकाला मनसैनिकांचा हिसका.
धस खोक्याचे आका...त्यांना हिरो व्हायचंय, तृप्ती देसाईंचा धसांवर निशाणा
धस खोक्याचे आका...त्यांना हिरो व्हायचंय, तृप्ती देसाईंचा धसांवर निशाणा.
धसांच्या गंभीर आरोपांवर दमानिया म्हणाल्या, बुद्धीला हे न पटण्यासारखं..
धसांच्या गंभीर आरोपांवर दमानिया म्हणाल्या, बुद्धीला हे न पटण्यासारखं...
'माझ्या खुनाचा कट अन् मला व्हिलन ठरवून...', धसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
'माझ्या खुनाचा कट अन् मला व्हिलन ठरवून...', धसांचा खळबळजनक गौप्यस्फोट.