नव्या मॉडेलसह TVS ची Fiero कमबॅक करणार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
टू-व्हीलर सेगमेंटमध्ये टीव्हीएसने आपली नवी बाईक लाँच करण्याची तयारी केली आहे. कंपनीला 100 सीसी सेगमेंट बाईक्सच्या बाजारातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे, आता कंपनीने नवीन सेगमेंटमध्ये पाऊल टाकण्याचा विचार केला आहे.
मुंबई : टू-व्हीलर सेगमेंटमध्ये टीव्हीएसने आपली नवी बाईक लाँच करण्याची तयारी केली आहे. कंपनीला 100 सीसी सेगमेंट बाईक्सच्या बाजारातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे, आता कंपनीने नवीन सेगमेंटमध्ये पाऊल टाकण्याचा विचार केला आहे. अशी माहिती मिळाली आहे की TVS लवकरच 125cc बाईक्सच्या सेगमेंटमध्ये प्रवेश करणार आहे. कंपनीकडे सध्या 100 सीसी आणि 110 सीसी सेगमेंटमध्ये टीव्हीएस स्पोर्ट, स्टार सिटी आणि Rodeon सारख्या बाईक आहेत. पण एकही बाईक 125cc ची नाही. (TVS Confirms New 125 cc Motorcycle Launch This Month named Fiero)
125 सीसी बाईक्स सेगमेंट वेगाने वाढत असल्याचे पाहून टीव्हीएसने हे पाऊल उचलले आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की TVS आपली जुनी बाईक TVS Fiero सह 125cc सेगमेंटमध्ये प्रवेश करु शकते. Fiero चे नवीन मॉडेल आणण्यासाठी कंपनी उत्सूक आहे. BikeDekho च्या रिपोर्टनुसार, TVS 16 सप्टेंबरला नवीन Fiero 125 लाँच करू शकते.
‘या’ गाड्यांना टक्कर
TVS Fiero 125 साठी बाजारात छाप पाडणे सोपे असणार नाही कारण या विभागात आधीच खूप स्पर्धा आहे. 125 सीसी सेगमेंटमध्ये होंडा एसपी 125, हिरो ग्लॅमर एक्सटेक आणि बजाज पल्सर एनएस 125 सारख्या बाईक्स आधीच उपलब्ध आहेत. या सर्व बाइक्सने लोकांचा विश्वास जिंकला आहे. अशा स्थितीत Fiero साठी हा रस्ता सोपा नसेल
जुन्या नावाचा फायदा मिळणार?
TVS Fiero ही त्या काळातली बाईक आहे जेव्हा स्टाईलिश बाईक्स खूप कमी प्रमाणात होत्या. पण Fiero च्या बाबतीत असे नव्हते. या बाईकचा लूक इतरांपेक्षा वेगळा होता आणि याच कारणामुळे पल्सर, सीबीजी बाजारात आल्यानंतरही या बाईकचे बाजारात स्थान निर्माण झाले. यामुळे, हे शक्य आहे की नवीन मॉडेल लॉन्च झाल्यावर Fiero ला तिच्या नावाचा थोडा फायदा होईल.
इंजिन आणि किंमत
फिएरोमध्ये 125 सीसी इंजिन दिले जाईल. असे मानले जात आहे की, हे इंजिन 11 बीएचपी पॉवर आणि 10.8 एनएम पीक टॉर्क जनरेट करेल. इंजिनबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही. मात्र या बाईकच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर या बाईकची एक्स-शोरूम किंमत 70 हजार रुपये ठेवली जाण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या
Yamaha ची शानदार फेस्टिव्ह ऑफर, ग्राहकांना 1 लाखाचं बक्षीस जिंकण्याची संधी
Royal Enfield च्या ग्राहकांना झटका, Meteor 350 नंतर आता ‘या’ बाईकची किंमत वाढली
(TVS Confirms New 125 cc Motorcycle Launch This Month named Fiero)