TVS ची नवीन 125cc स्कूटर बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

TVS मोटर कंपनी आपली नवीन 125 सीसी स्कूटर 7 ऑक्टोबरला (गुरुवारी) भारतीय बाजारात लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने आपल्या आगामी प्रोडक्टचे नाव अद्याप जाहीर केलेले नाही.

TVS ची नवीन 125cc स्कूटर बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
TVS Scooter
Follow us
| Updated on: Oct 06, 2021 | 7:02 PM

मुंबई : TVS मोटर कंपनी आपली नवीन 125 सीसी स्कूटर 7 ऑक्टोबरला (गुरुवारी) भारतीय बाजारात लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने आपल्या आगामी प्रोडक्टचे नाव अद्याप जाहीर केले नसले तरी, काही स्पाय शॉट्स सूचित करतात की ती ज्युपिटर 125 स्कूटर असेल. (TVS new 125cc scooter will launched in India on October 7, know price and features)

होसूर-आधारित ऑटोमेकरने काही दिवसांपूर्वी स्कूटरबाबत टीझ केलं होतं. टीझर इमेजमध्ये एलईडी डीआरएलचा वापर दर्शवला गेला आहे जो दुचाकीच्या पुढील अॅप्रनवर बसवता येतो. कंपनीने आगामी टू – व्हीलरचे टेक्निकल डिटेल्स अद्याप जाहीर केले नाहीत, परंतु अशी अपेक्षा आहे की, स्कूटरमध्ये सध्याचे NTorq 125 सारखेच इंजिन आणि प्लॅटफॉर्म असेल. या व्यतिरिक्त, कंपनी आपल्या मोठ्या जुपिटरला नवीन मेकॅनिकल सेटअप देऊ शकते, परंतु त्याचे ऑफीशियल डिटेल्स अद्याप उघड झालेले नाहीत.

ज्युपिटर 125 लाँच केल्यामुळे, कंपनी 125 सीसी सेगमेंटमध्ये आपले स्थान मजबूत करण्याचे लक्ष्य ठेवेल, जे देशात खूप लोकप्रिय होत आहे. टीव्हीएस मोटरने अलीकडेच भारतात आपली नवीन रेडर 125 मोटारसायकल बाजारात आणण्याची घोषणा केली आहे, जे कंपनीने नवे प्रोडक्ट आहे. ही बाईक म्हणजे कंपनी या सेगमेंटकडे किती गांभीर्याने पाहात आहे, याचंच उदाहरण म्हणता येईल.

कंपनी या नव्या स्कूटरमध्ये अनेक अत्याधुनिक फीचर्स देईल, जेणेकरुन या सेगमेंटमधील प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देता येईल.

नवीन ज्युपिटर 125 स्कूटरची किंमत

2021 ज्युपिटर 125 ही स्कूटर होंडा अॅक्टिव्हा 125 आणि सुझुकी अॅक्सेस 125 ची थेट प्रतिस्पर्धी म्हणून समोर येईल. लॉन्च केल्यावर या स्कूटरची किंमत 75,000 ते 81,000 रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान ठेवली जाण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या

डुकाटीची शानदार सुपरस्पोर्ट 950 मोटारसायकल बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

बहुप्रतीक्षित Tata Punch भारतात लाँच, 21000 रुपये देऊन बुक करा शानदार मायक्रो एसयूव्ही

MG Astor लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या कसा असेल कारचा लूक, किंमत आणि फीचर्स

(TVS new 125cc scooter will launched in India on October 7, know price and features)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.