आंतरराष्ट्रीय बाजारात TVS च्या ‘या’ स्कूटरचा दबदबा, 1 लाख युनिट्सची विक्री
टीव्हीएस मोटर कंपनीने सांगितले की, त्यांचा स्कूटर ब्रँड TVS Ntorq 125 ने आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रीचा एक लाखांचा टप्पा ओलांडला आहे
मुंबई : टीव्हीएस मोटर कंपनीने (TVS Motor Company) सोमवारी सांगितले की, त्यांचा स्कूटर ब्रँड एनटॉर्क 125 (TVS Ntorq 125) ने आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रीचा एक लाखांचा टप्पा ओलांडला आहे. कंपनी सध्या ही स्कूटर दक्षिण आशिया, लॅटिन अमेरिका, मध्य पूर्व आणि आशियामधील 19 देशांमध्ये विकते. ही स्कूटर ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटीसारख्या फीचर्सनी सुसज्ज आहे. (TVS NTorq 125 crosses 100000 sales mark in international markets)
टीव्हीएस मोटर कंपनीचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी के. एन. राधाकृष्णन यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, Ntorq 125 ची विक्रीबाबतची जगभरातील ग्राहकांचा टीव्हीएसवरील विश्वास दर्शवते. TVS Ntorq ब्रँड विकसित करण्याच्या आमच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. बीएस-6 125 सीसी स्कूटर डिस्क, ड्रम आणि सुपरस्क्वॉयड अशा तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. मार्च 2021 मध्ये, TVS Ntorq 125 स्कूटर 26,851 युनिट्स विक्रीसह देशातील 5 व्या क्रमांकावरील सर्वाधिक विक्री झालेली स्कूटर होती.
TVS NTorq 125 स्कूटरमध्ये काय आहे खास
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह येणाऱ्या या स्कूटरमध्ये 5 इंचांचा एलसीडी डिस्प्ले आहे, ज्यामध्ये लॅप टायमर, 0-60kph एक्सिलरेशन टाइम रेकॉर्डर, टॉप स्पीड रेकॉर्डर, इंजिन टेम्परेचर गॉज, अॅव्हरेज स्पीड इंडिकेटर आणि सर्व्हिस रिमाइंडर दर्शवले जाते.
या स्कूटरची ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी रायडरला ‘Smart Xonnect’ द्वारे त्याचा फोन स्कूटरशी जोडण्याची परवानगी देते. याद्वारे रायडर त्याच्या फोनवरील सर्व डेटा तपासू शकतो. याशिवाय फोन आपल्या एलसीडी डिस्प्लेमध्ये नोटिफिकेशन, ट्रिप रिपोर्ट आणि नेव्हिगेशन अॅरोदेखील दर्शवले जाते.
इंजिन आणि किंमती
या स्कूटरमध्ये 124.8cc थ्री-व्हॉल्व्ह, एअर-कूल्ड, फ्यूल-इंजेक्टेड इंजिन आहे जे 7,000rpm वर 9.1bhp पॉवर आणि 5,500rpm वर 10.5Nm पीक टॉर्क जनरेट करते. भारतात TVS Ntorq 125 च्या ड्रम ब्रेक व्हेरिएंटसाठी 71,095 रुपये द्यावे लागतील. त्याचबरोबर डिस्क ब्रेक व्हेरिएंटसाठी 75,395 रुपये, तर Ntorq 125 च्या रेस व्हेरिएंटसाठी आणि सुपरस्क्वेअर व्हेरिएंटसाठी अनुक्रमे 78,375 आणि 81,075 रुपये मोजावे लागतील.
नेपाळमध्ये Ntorq 125 SuperSquad मार्वल एडिशन लाँच
टीव्हीएस मोटर कंपनीने नेपाळमध्ये मार्व्हलच्या अॅव्हेंजर्सनं प्रेरित होत एनटॉर्क Ntorq 125 SuperSquad मार्वल एडिशन स्कूटर लाँच केलीय. नेपाळमध्ये ही आवृत्ती सादर करण्यासाठी कंपनीने डिस्ने इंडियाच्या ग्राहक उत्पादनांच्या व्यवसायात भागीदारी केलीय. सुपरस्क्वेअर एडिशनमध्ये अनुक्रमे आयर्न मॅन, ब्लॅक पँथर आणि कॅप्टन अमेरिका यांच्या प्रेरणेतून ‘इन्हिन्सिबल रेड, स्टेल्थ ब्लॅक आणि कॉम्बॅट ब्लू’ या तीन पर्यायांमध्ये नवीन ऑफर देण्यात आल्यात.
हेही वाचा
आधी पार्किंगची जागा दाखवा मगच कार खरेदी करा; सरकारची New Parking Policy
Hero MotoCorp 2022 मध्ये इलेक्ट्रिक बाईक/स्कूटर लाँच करणार, जाणून घ्या कंपनीचं प्लॅनिंग
अर्ध्या किंमतीत खरेदी करा Hero Maestro EDGE स्कूटर, पाहा खास ऑफर
(TVS NTorq 125 crosses 100000 sales mark in international markets)