सर्वसामान्यांना दिलासा, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन परवानासह इतर कागदपत्रांबाबत मोठा निर्णय

यापूर्वीही लॉकडाऊन आणि संबंधित निर्बंधांमुळे या कागदपत्रांची वाढवण्याची मुदत ही पाच वेळा वाढवण्यात आली आहे. (Validity of driving license, vehicle documents extended till September 2021)

सर्वसामान्यांना दिलासा, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन परवानासह इतर कागदपत्रांबाबत मोठा निर्णय
vehicle
Follow us
| Updated on: Jun 17, 2021 | 2:18 PM

मुंबई : जर तुमच्याही ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन परवाना, नोंदणी यासह इतर कोणत्याही कागदपत्रांची वैधता वाढवायची असेल तर काळजी करू नका. कारण नुकतंच सरकारने कागदपत्रांची वैधता वाढवण्याची मुदत सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवली आहे. रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने एक परिपत्रक देऊन यासंदर्भात माहिती दिली आहे. (Validity of driving license, vehicle documents extended till September 2021)

रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन परवाना, नोंदणी यासारख्या ज्या कागदपत्रांची वैधता 1 फेब्रुवारी 2020 रोजी संपत होती, त्यांची वैधता आता सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वीही लॉकडाऊन आणि संबंधित निर्बंधांमुळे या कागदपत्रांची वाढवण्याची मुदत ही पाच वेळा वाढवण्यात आली आहे. त्यानंतर आता सहाव्या वेळीही सरकारने ही मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी सरकारने 30 मार्च 2020, 9 जून 2020, 24 ऑगस्ट 2020, 27 डिसेंबर 2020 आणि 26 मार्च 2021 रोजी परिपत्रक काढून वैधता वाढवली होती. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना याबाबतचा आदेश सरकारने कळवला होता. तसेच मोटार वाहन कायदा 1988 आणि मध्यवर्ती मोटर वाहन नियम 1989 च्या अंतर्गत ही वैधता वाढण्यात आली आहे.

वैधता संपल्यानंतरही कोणतीही कारवाई नाही

यासोबतच वाहन दुरुस्ती, सर्व प्रकारच्या वाहनांना परवानगी, वाहन चालविण्याचा परवाना, नोंदणी यासंबंधी कागदपत्रांची वैधता ही 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता ही कागदपत्रे तपासणारे अधिकारी 30 सप्टेंबरपर्यंत कोणतीही कारवाई करू शकणार नाहीत.

सरकारच्या मते ‘सध्याची परिस्थिती लक्षात घेता या कागदपत्रांची वैधता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ज्या कागदपत्रांची वैधता 01 फेब्रुवारी 2020 रोजी किंवा त्यानंतर कालबाह्य होत आहे ती आता 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वैध असतील, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. (Validity of driving license, vehicle documents extended till September 2021)

संबंधित बातम्या :

Gold Price : सोन्याचा किंमतीत मोठी घसरण, तोळ्याचे नवे दर किती?

PAN-AADHAR LINK | तुमचा पॅनकार्ड आधारशी लिंक आहे का? असे करा चेक

E-Pan | तुमचं पॅनकार्ड हरवलंय? अवघ्या पाच मिनिटात डाऊनलोड करा नवीन e-PAN कार्ड, संपूर्ण प्रक्रिया काय?

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.