Volkswagen | Volkswagen Taigun फर्स्ट अॅनिव्हर्सरी एडिशन दाखल, काय आहे किंमत?

Volkswagen | गेल्या वर्षी लाँच केलेल्या Taigun ला एक वर्ष पूर्ण झाल्यावर, कंपनीने तिची Volkswagen Taigun First Anniversary Edition लॉन्च केली आहे. कारच्या घोषणेपासून याबाबत ग्राहकांमध्ये मोठी उत्सूकता निर्माण झालेली होती. अखेरीस ही कार ग्राहकांच्या भेटीला आली आहे.

Volkswagen | Volkswagen Taigun फर्स्ट अॅनिव्हर्सरी एडिशन दाखल, काय आहे किंमत?
आता नवीन फिचर्सची धमालImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 10, 2022 | 10:50 AM

Volkswagen | फॉक्सवॅगनने (Volkswagen) गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आपली Taigun SUV कार लॉन्च केली होती आणि लॉन्च झाल्यानंतर अवघ्या एक वर्षानंतर कंपनीने आता आपल्या प्रीमिअम कारची फर्स्ट अॅनिव्हर्सरी एडिशन लॉन्च केली आहे. Volkswagen Taigun फर्स्ट अॅनिव्हर्सरी एडिशन रायजिंग ब्लू (Rising Blue) कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.

दोन पर्यायात कार

ही कार कंपनीच्या अधिकृत साइटवरून किंवा ग्राहकांना त्यांच्या जवळच्या फोक्सवॅगन शोरूममधून खरेदी करता येणार आहे. टायगुन (Taigun) फर्स्ट अॅनिव्हर्सरी एडिशन डायनॅमिक लाइन आणि टॉपलाइन या दोन पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आली असून ती 1.0 TSI MT आणि AT मध्ये उपलब्ध असेल.

काय असणार खास?

कारमध्ये बॉडी-कलर डोअर गार्निश, हाय लक्स फॉग लॅम्प्स, ब्लॅक ओआरव्हीएम कॅप, ब्लॅक सी पिलर ग्राफिक्स, ब्लॅक रूफ फॉइल, अॅल्युमिनियम पेडल्स, डोअर-एज प्रोटेक्टर आणि विंडो व्हिझर्स असे 11 नवीन घटक मिळतात. टीएसई तंत्रज्ञानाद्वारे सज्ज असलेल्या फोक्सवॅगन Taigun 1.0L TSI आणि 1.5L TSI EVO या दोन इंजिन पर्यायांसह ऑफर केली आहे. 1.0 लिटर टीएसई इंजिन 5000-5500 आरपीएमवर 115 पीएस आणि 1750-4500 आरपीएमवर 178 एनएम निर्मिती करते. ही कार 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स या दोन पर्यायांमध्ये खरेदी करता येईल.

हे सुद्धा वाचा

40 हून अधिक सेफ्टी फीचर्स

सेफ्टीबद्दल बोलायचे झाल्यास, या कारमध्ये इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, 6 एअरबॅग्ज, रिव्हर्स कॅमेरा, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, मल्टी-कॉलिजन ब्रेक्स, टायर प्रेशर डिफ्लेशन वॉर्निंग सिस्टम इत्यादी 40 हून अधिक फीचर्स देण्यात आले आहेत. Volkswagen Taigun First Anniversary Edition Price बद्दल बोलायचे झाले तर, या कारची किंमत 15.40 लाख रुपये (एक्सशोरूम) पासून सुरू होते.

मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.