जबरदस्त फीचर्ससह Volkswagen Taigun भारतात लाँच, जाणून घ्या किंमत
फोक्सवॅगन टायगुन (Volkswagen Taigun) ही कार भारतीय बाजारात अधिकृतपणे 10.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) च्या किमतीत लॉन्च करण्यात आली आहे.
मुंबई : फोक्सवॅगन टायगुन (Volkswagen Taigun) ही कार भारतीय बाजारात अधिकृतपणे 10.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) च्या किमतीत लॉन्च करण्यात आली आहे. टायगुन जीटी लाइनची किंमत 14.99 लाख (एक्स-शोरूम) रुपयांपासून सुरू होते आणि 17.49 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते. फोक्सवॅगन टायगुन एक आकर्षक परंतु स्पर्धात्मक मिड साईज एसयूव्ही स्पेसमध्ये प्रवेश करते ज्यात जर्मन ऑटो जायंट स्वतःसाठी जागा बनवू पाहत आहे. (Volkswagen Taigun SUV launched at Rs 10.50 lakh, clocks 12,000 pre-bookings)
टायगुनला विशेषतः ‘मेड इन इंडिया आणि मेड फॉर इंडिया’ असे उत्पादन म्हणून सादर करण्यात आले आहे. ज्या सेगमेंटमध्ये ही कार लाँच करण्यात आली आहे, सध्या या सेगमेंटमधील गाड्यांना भारतीय ग्राहकांकडून जोरदार पसंती मिळत आहे. ही कार नुकत्याच लाँच झालेल्या स्कोडा कुशकसह प्लॅटफॉर्म शेअर करते. टायगून केवळ फोक्सवॅगन चाहत्यांचे आवडते वाहन होईलच, मात्र ही कार नवीन ग्राहकांनादेखील आकर्षित करू शकणारा पर्याय आहे, असे कंपनीने मानने आहे.
फॉक्सवॅगन टायगुनचं इंजिन आणि ट्रान्समिशन ऑप्शन
Taigun दोन TSI पेट्रोल इंजिन ऑप्शन्ससह सादर करण्यात आलेली कार आहे. ही कार 1.0 लीटर युनिट आणि 1.5 लीटर मोटरसह सादर करण्यात आली आहे. हे इंजिन आधीच एका मॅनुअल गियरबॉक्सशी आणि एका 6-स्पीड ऑटोमॅटिक युनिटशी जोडले आहे. पॉवरफुल इंजिनमध्ये मॅन्युअलसह DSG ऑटोमॅटिक युनिटही मिळतं.
फोक्सवॅगन टायगुन 6 वेगवेगळ्या रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. यामध्ये पिवळा, पांढरा, निळा, लाल, राखाडी आणि काळा या रंगांचा समावेश आहे. टायगुन बाहेरील बॉडीवर स्मार्ट क्रोम एडिशनसह येते आणि फ्रंट ग्रिलवरील हॉरीझॉन्टल लाइन्स फॅमिलियर आहेत. एलईडी हेड लाइट आणि डीआरएल युनिट फेससह यूथ अपील मिळतो. ही कार 17 आणि 16-इंचांच्या अलॉय व्हील्ससह येतो. जे व्हेरिएंटवर अवलंबून आहेत. यामध्ये फंकी एलईडी टेल लाइट डिझाईनही देण्यात आलं आहे. या सेगमेंटमध्ये सर्वात चांगला व्हीलबेस टायगुनचाच आहे.
इतर बातम्या
मारुतीनंतर आता तुमच्या आवडत्या टाटा कार महागणार, जाणून घ्या किंमत किती वाढणार?
ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी पेपर सोबत बाळगण्याचं आता नो टेन्शन, DigiLocker ला मिळाली मान्यता
Tata चा CNG गाड्यांच्या धडाका, अवघ्या 5 हजारात बूक करा किफायतशीर कार
(Volkswagen Taigun SUV launched at Rs 10.50 lakh, clocks 12,000 pre-bookings)