Volvo XC 40 Electric: व्हॉल्वो XC40 रिचार्ज चा धमाका, 2 तासांत विकला गेला संपूर्ण वर्षाचा स्लॉट

व्हॉल्वोची नवी इलेक्ट्रिक एसयूव्ही XC40 रिचार्ज या कारने लॉंचच्या दिवशीच धमाका केला आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, बूकिंग सुरू होताच अवघ्या दोन तासांच्या आतच याअवर्षाचा कारचा संपूर्ण स्लॉट विकला गेला आहे.

Volvo XC 40 Electric: व्हॉल्वो XC40 रिचार्ज चा धमाका, 2 तासांत विकला गेला संपूर्ण वर्षाचा स्लॉट
महत्त्वाची बातमी...Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 1:43 PM

व्हॉल्वोची नवी इलेक्ट्रिक एसयूव्ही XC40 रिचार्ज (Volvo New Electric SUV XC40 Recharge)या कारने लॉंचच्या दिवशीच मोठा धमाका केला आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, बूकिंग सुरू होताच अवघ्या दोन तासांच्या आतच (all 150 cars booked just in 2 hours) या वर्षाचा कारचा संपूर्ण स्लॉट विकला गेला आहे. कंपनीने 2022 वर्षासाठी केवळ 150 कारचे युनिट मंजूर केले होते. आणि अवघ्या दोन तासांमध्ये सर्व कार बूक झाल्या. येत्या ऑक्टोबर (delivery will start in October) महिन्यापासून कारची डिलीव्हरी सुरू होईल, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे. हे वर्ष संपण्याच्या आतच सर्व 150 गाड्यांची डिलीव्हरी देण्यात येईल, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. जर एखाद्या व्यक्तीला XC40 रिचार्ज गाडी बूक करायची असेल तर ऑफिशियल साइटवर बुकिंग सुरू आहे. कंपनीने XC40 रिचार्ज या कारमध्ये 78kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे.

कंपनीच्या दाव्यानुसार, सिंगल चार्जिंगमध्ये कार 418 किलो मीटरचा प्रवास करू शकते. या कारमध्ये कंपनीने ड्युएल मोटर सेटअपही दिला आहे. व्हॉल्वो कंपनीच्या या इलेक्ट्रिक एसयुव्ही कारची शो-रूम किंमत 55.90 लाख रुपये इतकी आहे. ही कार सिंगल P8 ऑल व्हीकल ड्राइव ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.

केवळ 150 कार होणार डिलीव्हर

बुकिंग सुरू होताच सर्व 150 कार बूक झाल्या यावरूनच ग्राहकांना या कारचे किती वेड आहे, हे स्पष्ट होते. व्हॉल्वो कंपनीने 2022 सालात या कारच्या केवळ 150 डिलीव्हरी देण्याचा निर्णय घेतला होता. येत्या ऑक्टोबर महिन्यापासून ते डिसेंबर पर्यंत सर्व कारची डिलीव्हरी करण्यात येईल. यावर्षी जरी सर्व कार विकल्या गेल्या असल्या तरीही कंपनीतर्फे पुढच्या वर्षीसाठीही कारचे बूकिंग सुरू करण्यात आले आहे. कंपनीच्या ऑफिशिअल वेबसाईटवर जाऊन, तुम्ही पुढल्या वर्षासाठी कारचे बुकिंग करू शकता.

हे सुद्धा वाचा

4.9 सेकंदांध्ये 100 चा वेग

ही इलेक्ट्रिक एसयूव्ही कार जरी बॅटरीवर चालत असली तर पॉवरच्या बाबतीत ही कार फ्युएल कारच्या तोडीस तोड आहे. 78kWh क्षमतेच्या बॅटरी पॅकमुळे 418 किलोमीटर रेंजचा प्रवास शक्य आहे. त्यासह अवघ्या 4.9 सेकंदात ही कार 100 किलोमीटर प्रतितास वेगाने धावण्यास सक्षम आहे.

अवघ्या 40 मिनिटांत ही कार 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते, असा दावाही कंपनीने केला आहे. कंपनीद्वारे मिळणाऱ्या 150kW च्या चार्जरमुळे हे शक्य असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. फीचर्सच्या बाबतीत बोलायचे झाले तर ही कार इतर कार्सच्या तुलनेत कुठेच कमी नाही. कंपनीने या कारमध्ये एडीएस, म्हणजेच ॲडव्हान्स ड्रायव्हिंग सिस्टिमही (Advance Driving System- ADS)उपलब्ध करून दिली आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.