Electric Scooter खरेदी आधी ही बातमी वाचा, कुठल्या राज्यात सर्वाधिक सब्सिडी?
Electric Scooter | केंद्र सरकार आणि राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी एका योजनेची सुरुवात केली होती. इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर केंद्र आणि राज्य सरकारकडून घसघशी डिस्काऊंट मिळतो. तुम्ही नवीन इलेक्ट्रिक टू-व्हीलर खरेदीचा विचार करत असाल, तर ही बातमी नक्की वाचा.

Electric Scooter | देशात इलेक्ट्रिक स्कूटर, बाइक आणि स्कूटीची डिमांड वेगाने वाढत आहे. यात सरकारच्या फेम-II सब्सिडी योजनेच मोठ योगदान आहे. त्याचबरोबर राज्य सरकारही इलेक्ट्रिक टू व्हीलर खरेदीवर सब्सिडी देत आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक टू व्हीलरची डिमांड वेगाने वाढतेय. तुम्ही इलेक्ट्रीक टू-व्हीलर खरेदीचा विचार करत असाल, तर कुठल्या राज्यात तुम्हाला इलेक्ट्रिक टू-व्हीलरवर सब्सिडी मिळेल ते जाणून घ्या. फेम-II सब्सिडी संपूर्ण देशात फिक्स आहे. पण प्रत्येक राज्य सरकारकडून दिली जाणारी सब्सिडी वेगवेगळी आहे. यात काही राज्य जास्त सवलत देतात, तर काही राज्य कमी.
केंद्र सरकारने इलेक्ट्रिक टू-व्हीलर आणि फोर-व्हीलरला प्रोत्साहन देण्यासाठी फेम II सब्सिडी योजना सुरु केली. या स्कीमची सुरुवात एप्रिल 2019 मध्ये झाली. पाचवर्षाच्या या स्कीमसाठी 10,000 कोटी रुपयांची बजेट सहायता दिली गेली. 31 मार्च, 2024 रोजी हा कालावधी संपत आहे. या स्कीममध्ये इलेक्ट्रिक वाहनाच्या बॅटरी क्षमतेच्या आधारावर सरकारकडून डिस्काऊंट दिला जातो. फेम II सब्सिडीमध्ये इलेक्ट्रिक टू व्हीलरवर केंद्र सरकारकडून 21,131 रुपयापर्यंत सवलत दिली जाते.
कुठल्या राज्यात सर्वाधिक डिस्काऊंट?
देशातील सर्व राज्यात फेम II सब्सिडी दिली जाते. पण दिल्ली आणि ओदिशा या दोन राज्यात तुम्हाला फेम II सब्सिडीशिवाय अतिरिक्त 17 हजार रुपयांची सब्सिडी राज्य सरकारकडून मिळेल. आसाम सरकार देशात फेम II सब्सिडीशिवाय इलेक्ट्रिक टू व्हीलर खरेदीवर सर्वाधिक 20 हजार रुपयांचा डिस्काऊंट देते.
कुठल्या राज्यात कमी डिस्काऊंट?
देशातील केंद्र शासित प्रदेश पुडुचेरी, गोवा, बिहार, आंध्र प्रदेश, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेशसह काही दूसऱ्या राज्यात फेम II सब्सिडीशिवाय अन्य कुठलीही सूट राज्य सरकारकडून मिळत नाही.