जगातलं सर्वात महाग ड्रायफ्रूट असलेल्या पिस्त्याची कहाणी वाचून थक्क व्हाल!

Why Pistachios So Expensive : पिस्ता (Pistachio) हे सगळ्यात महाग ड्रायफूट (Dry Fruit) समजलं जातं. पण कधी विचार केला आहे का की पिस्ता इतका महाग का असतो? कारण पिस्त्याची शेती करणे आणि त्याच्या झाडांची देखभाल करणे सोपे नसते.

जगातलं सर्वात महाग ड्रायफ्रूट असलेल्या पिस्त्याची कहाणी वाचून थक्क व्हाल!
पिस्ता हे जगातलं सर्वात महाग ड्रायफ्रूट का आहे?
Follow us
| Updated on: Jan 11, 2022 | 6:35 PM

Why Pistachios So Expensive : पिस्ता (Pistachio) हे सगळ्यात महाग ड्रायफूट (Dry Fruit) समजलं जातं. पण कधी विचार केला आहे का की पिस्ता इतका महाग का असतो? कारण पिस्त्याची शेती करणे आणि त्याच्या झाडांची देखभाल करणे सोपे नसते. चला तर मग जाणून घेऊया पिस्त्याची किंमत इतकी जास्त का असते, त्याची देखभाल अवघड का असते आणि हा किती फायदेशीर असतो? (why are pistachios so expensive know the reason behind it)

पिस्ता (Pistachio) हे सगळ्यात महाग ड्रायफूट (Dry Fruit) समजलं जातं. पण कधी विचार केला आहे का की पिस्ता इतका महाग का असतो? कारण पिस्त्याची शेती करणे आणि त्याच्या झाडांची देखभाल करणे सोपे नसते. चला तर मग जाणून घेऊया पिस्त्याची किंमत इतकी जास्त का असते, त्याची देखभाल अवघड का असते आणि हा किती फायदेशीर असतो?

पिस्त्याची शेती करणे आणि त्याच्या झाडांची देखभाल करणे सोपे नसते. मात्र पिस्त्याचा प्रवास देखभालीपुरता मर्यादित नाही, तर पिस्त्याच्या झाडाला (Pistachio Tree) फळ येण्यासाठी तब्बल 15 ते 20 वर्षे लागतात. याशिवाय अनेक अशी कारणं आहेत, जी याची किंमत वाढवत असतात. कॅलिफोर्निया आणि ब्राझीलसह जगभरातील इतर भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात याची शेती केली जाते.

दुसऱ्या ड्रायफूटच्या तुलनेत त्याची किंमत इतकी अधिक का असते आणि हे किती फायदेशीर असतात जाणून घ्या प्रश्नांची उत्तरे

15 वर्षानंतर एका झाडापासून साधारणत: 22 किलो पिस्ता मिळतो. सेंट्रल इंस्‍टीट्यू्ट ऑफ मेडिसिनल अँड एरोमॅटिक प्‍लांटचे (CSIR) चे तज्ज्ञ आशिष कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 ते 20 वर्ष एक झाड तयार झाल्यानंतर अगदी काही प्रमाणात त्याला पिस्ता लागायला सुरुवात होते. साधारणत: एका झाडापासून एका वर्षात 22 किलो पिस्ता मिळतो. पिस्त्याच्या मागणीपेक्षा नेहमीच त्याचे उत्पादन खूपच कमी असते. फक्त ब्राझील हा एक असा देश आहे तेथील परिस्थिती थोडी वेगळी आहे. येथे दरवर्षी एका झाडापासून जवळपास 90 किलो उत्पादन घेतले जाते.

यामुळे वाढते पिस्ताची किंमत

एका रिपोर्टनुसार पिस्ताची लागवड केल्यावर 15 ते 20 वर्ष झाल्यानंतर पिस्त्याच्या झाडाला फळे यायला सुरवात होते. यापासूनच पिस्ता तयार होत असतो. एवढ्या वर्षांपर्यंत त्या झाडांची योग्यरीतीने देखभाल करावी लागते. यासाठी येणारा खर्च सुद्धा अधिक प्रमाणात असतो. योग्य पद्धतीने देखभाल केल्यानंतर सुद्धा आपण खात्रीशीरपणे या पासून किती उत्पादन होईल याची हमी देऊ शकत नाही. त्यामुळे याचे उत्पादन घेणे सोपे नसते. त्याच्यासाठी जास्त प्रमाणात पाणी, जास्त प्रमाणात कामगार, जास्त जमीन आणि अधिक पैशांची सुद्धा आवश्यकता असते. यासारख्या कारणांमुळे त्याच्या किमतीमध्ये वाढ होत जाते.

प्रत्येक वर्षी होत नाही उत्पादन

याचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना अधिक जमीन खरेदी करावी लागते आणि अधिक झाडे लावावी लागतात. यातून होणारे उत्पादन मात्र नाममात्र असते. याशिवाय महत्त्वाची गोष्ट म्हणजे या झाडांपासून दरवर्षी पिस्ता मिळतात असेही नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना याचे दोनदा पीक घ्यावे लागते. ज्यामध्ये एक वर्षाचे अंतर ठेवले जाते, म्हणून मुबलक झाडे असतानासुद्धा मागणीनुसार पिस्त्याचे उत्पादन कधीही होत नाही.

मोठ्या प्रमाणात कामगारांची गरज असते

पिस्ताची शेती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामगारांची उपलब्धता असणे गरजेचे असते. झाडाला लागलेले पिस्ते एक एक करून हाताने तोडले जातात आणि साफ केले जातात. कॉलिटीनुसार त्यांना वेगळे केले जाते. त्याची तोडणी करत असताना यादरम्यान याची काळजी घेतली जाते की कोणते पिस्ता निर्यातीसाठी पाठवायचे आहेत आणि कोणते नाही. या पद्धतीने त्यांची तोडणी करण्यासाठी कामगारांना दिली जाणारी मजुरी या कारणामुळे याची किंमत वाढत जाते.

अनेक वेगळ्या प्रकारचे पोषकतत्वे असल्यामुळे पिस्ता खूप फायदेशीर ठरत असतो. यामध्ये प्रोटीन, पोटॅशियम, विटामिन- बी6 आणि कॉपर आढळते हेल्पलाइनच्या रिपोर्टनुसार वजन, ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सोबतच डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरतो.

इतर बातम्या

पिझ्झा, बर्गर खाताय तर सावधान; फास्ट फूडमुळे रोगप्रतिकारक शक्तीच शरीराला पोहोचवतीये हानी

सावधान! तुम्हीही रोज सकाळी झोपेतून उशिरा उठता? तर होऊ शकतो मधुमेह; ब्रिगहॅम विद्यापीठाचा अहवाल

डोळ्यांच्या समस्याने त्रस्त आहात?, तर आजच ‘या’ पदार्थांचा आहारामध्ये समावेश करा

(why are pistachios so expensive know the reason behind it)

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.