Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1 लीटर पेट्रोलमध्ये 45km रेंज, 80 हजारांची Suzuki Access 125 अवघ्या 17,820 रुपयात

या स्कूटरच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात आपल्याला 124cc सिंगल सिलेंडर इंजिन मिळेल. हे इंजिन 8.7ps ची पॉवर आणि 10Nm टॉर्क देते.

1 लीटर पेट्रोलमध्ये 45km रेंज, 80 हजारांची Suzuki Access 125 अवघ्या 17,820 रुपयात
Follow us
| Updated on: Sep 26, 2021 | 1:02 PM

मुंबई : पेट्रोलच्या वाढत्या किंमती कमी होण्याचे नाव घेत नसल्यामुळे ग्राहक आता इलेक्ट्रिक वाहने किंवा सेकंड हँड मार्केटच्या दिशेने वाटचाल करत आहेत. दरम्यान, अनेक कंपन्या आहेत ज्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर आणि मोटारसायकली लाँच केल्या आहेत. पण अनेक ग्राहक आहेत जे चार्जिंग स्टेशनची समस्या लक्षात घेऊन पेट्रोल स्कूटरची निवड करत आहेत. पण त्यात त्या वाहनांचाही समावेश आहे ज्यांचे मायलेज जास्त आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक स्कूटर घेऊन आलो आहोत. सुझुकी एक्सेस 125 असे या स्कूटरचे नाव आहे. (you can buy Suzuki Access 125 buy under Rs 20000 from second hand platform Droom)

सुझुकी एक्सेस 125 ही कंपनीची सर्वोत्तम मायलेज स्कूटर आहे. जर तुम्ही आज शोरूममध्ये ही स्कूटर खरेदी करायला गेलात तर तुम्हाला 73,400 ते 82,600 रुपये मोजावे लागतील. पण आज आम्ही तुमच्यासाठी एक शानदार ऑफर आणली आहे. ज्यामध्ये, तुम्ही अगदी कमी किंमतीत ही स्कूटर घरी घेऊन जाऊ शकता. तुम्ही ही स्कूटर अवघ्या 17,820 रुपयांमध्ये खरेदी करु शकता.

Suzuki Access 125 स्कूटर ड्रूम (Droom) नावाच्या प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध आहे. वेबसाइटवर त्याची किंमत 17,820 रुपये आहे. ही सेकंड हँड सेगमेंट स्कूटर आहे आणि ही फर्स्ट ओनर स्कूटर आहे. ही स्कूटर 22 हजार किलोमीटर चालली आहे, ही बाईक हरियाणा 26 आरटीओमध्ये नोंदणीकृत आहे. वेबसाईटवर सांगितले गेले आहे की, ही स्कूटर 1 लीटर पेट्रोलमध्ये 45 किमीचे मायलेज देते. पांढऱ्या रंगांच्या स्कूटरचे सहा फोटो पोस्ट करण्यात आले आहेत, ज्यात स्कूटर सर्व बाजूंनी पाहता येते. हे 2012 चे मॉडेल आहे.

स्कूटरच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात आपल्याला 124cc सिंगल सिलेंडर इंजिन मिळेल. हे इंजिन 8.7ps ची पॉवर आणि 10Nm टॉर्क देते. स्कूटरचे ट्रान्समिशन ऑटोमॅटिक आहे. यामध्ये तुम्हाला पुढच्या चाकात डिस्क ब्रेक आणि मागच्या बाजूला ड्रम ब्रेक मिळतात. यामध्ये तुम्हाला ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत. जर आपण स्कूटरच्या मायलेजबद्दल बोललो तर इथे तुम्हाला 45 kmpl चे मायलेज मिळते.

वेबसाइटने ही स्कूटर बुक करण्याचा पर्याय दिला आहे, ज्यासाठी इच्छुक ग्राहकाला फक्त 499 रुपये भरावे लागतील. तथापि, करार करण्यापूर्वी, सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. आता आम्ही तुम्हाला त्या वैशिष्ट्यांबद्दल सांगणार आहोत, जे त्यात सापडणार नाहीत. या स्कूटरमध्ये ABS देण्यात आलेलं नाही आणि मोबाईल कनेक्टिव्हिटीचा पर्यायही उपलब्ध नाही. त्यात स्पीडोमीटर अॅनालॉग उपलब्ध आहे. सिंगल सिलिंडर इंजिन 4 स्ट्रोकसह येते.

महत्त्वाची सूचना : जर आपण ही सेकंड हँड स्कूटर घेणार असाल तर सर्व बाजूंनी कार तपासून पाहा. स्कूटरचं डेंटिंग आणि पेंटिंग तपासा. वाहन मालकाचे कागदपत्र तपासा. त्याच वेळी, स्कूटर आणि कागदपत्रांची कसून चौकशी केल्यानंतरच ही स्कूटर खरेदी करा. तसेच बातमीत दिलेली माहिती ही Droom वरुन घेतली आहे.

इतर बातम्या

मारुतीनंतर आता तुमच्या आवडत्या टाटा कार महागणार, जाणून घ्या किंमत किती वाढणार?

ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी पेपर सोबत बाळगण्याचं आता नो टेन्शन, DigiLocker ला मिळाली मान्यता

Tata चा CNG गाड्यांच्या धडाका, अवघ्या 5 हजारात बूक करा किफायतशीर कार

(you can buy Suzuki Access 125 buy under Rs 20000 from second hand platform Droom)

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.