AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका झटक्यात पकडेल 60 किमीचा स्पीड, ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर होणार लाँच

भारतीय टू व्हीलर बाजारात मिळत असलेल्या बॉबर बाइक जावा पराकबाबत आपण नक्कीच ऐकले आणि पाहिले असेल. Zapp इलेक्ट्रिक सिटी स्कूटरचा लूक देखील जावा पराकशी मेळ खातो आहे. ही एक बजेट सेगमेंटमध्ये उपलब्ध असणारी इलेक्ट्रिक स्कूटर आहे. यात अनेक दमदार फीचर्स आणि चांगला स्पीड देण्यात आला आहे.

एका झटक्यात पकडेल 60 किमीचा स्पीड, ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर होणार लाँच
डिस्पॅच इलेक्ट्रिक स्कूटर (File photo)
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 12:57 PM

सध्या देशात इलेक्ट्रिक बाइकच्या सेगमेंटमध्ये प्रचंड उलाढाल वाढली आहे. या सेगमेंटमध्ये अजून एका नवीन इलेक्ट्रिक स्कूटरचे (Electric scooter) नाव लवकरच जोडले जाणार आहे. या नवीन स्कूटरचा लूक हा दमदार बॉबर बाइकसारखा असणार आहे. भारतीय टू व्हीलर बाजारात मिळत असलेल्या बॉबर बाइक जावा पराकबाबत आपण नक्कीच ऐकले आणि पाहिले असेल. Zapp इलेक्ट्रिक सिटी स्कूटरचा लूक देखील जावा पराकशी मेळ खातो आहे. ही एक बजेट सेगमेंटमध्ये (Budget segment) उपलब्ध असणारी इलेक्ट्रिक स्कूटर आहे. यात अनेक दमदार फीचर्स (Features) आणि चांगला स्पीड देण्यात आला असून दमदार मोटर्सचाही वापर करण्यात आला आहे.

दरम्यान, ब्रिटेनमध्ये लाँच होत असलेल्या या बाइकचे नाव Zapp i3 e-scooter आहे. ही बाइक सिंगल चार्जमध्ये 60 किलोमीटर प्रति चार्जवर चालते. याचा टॉप स्पीड 60 किमी प्रतितासापर्यंत आहे. सोबतच ही 60 किमीचा स्पीड केवळ 4.8 सेकंदात पकडण्याची क्षमता ठेवते. शहरी भागांमध्ये राहत असलेल्या तसेच लहान मोठे अंतर कापणार्या युजर्ससाठी ही बाइक फायदेशिर ठरु शकते, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. शिवाय ही बजेटमध्ये असल्याने ग्राहकांना याचा फायदा होउ शकतो.

ड्युअल एबीएस सिस्टीम

Zapp i3 e-scooter एक लाइटवेट ई-स्कूटर असून ही स्कूटर अपसाइड डाउन फोर्कसह उपलब्ध आहे. यामध्ये सॉलिड अॅडजेस्टेबल रियर शॉक देण्यात आले आहे. ही एक ड्युअल चॅनल एबीएस सोबत उपलब्ध होते. सोबत कंपनीच्या दाव्यानुसार, यात चांगल्या प्रकारची ब्रेकिंग सिस्टीम देण्यात आली आहे. ज्याच्या माध्यमातून ट्रॅफिक असलेल्या रस्त्यांवरही बाइक चालविणे सोपे जाते.

बॅलेंसिंगसाठी अनोखी ट्रीक

कंपनीने चांगला बॅलेंस बनवण्यासाठी स्कूटरच्या सेंडरमध्ये बॅटरी ठेवली आहे. सोबतच यात देण्यात आलेल्या इलेक्ट्रिक मोटर 9.6 होर्स पावर देण्याची क्षमता ठेवते. ही मोटर्स 20 एचपीची पॉवर देते, असा दावा करण्यात आला आहे. या बाइकच्या रियर व्हीलला 587 एनएमचा पीक टार्क मिळाला आहे.

बॅटरी चार्जिंग

बॅटरी चार्जिंगबाबत कंपनीचा दावा आहे, की यात बॅटरी रिमूव्ह केली जाउ शकते. आणि सहजपणे कार्यालय घरी आदी ठिकाणी तिला चार्ज करता येते. दरम्यान, अनेक ठिकाणी स्व्पँबल बॅटरीचे चलन वाढत असून ओकिनावा, कोमाकी आणि बाउंसीसह अनेक ब्रेंडमध्ये या फीचर्सचा वापर करण्यात आला आहे.