Union Budget 2023 : शिक्षक भरती संदर्भात बजेटमध्ये महत्त्वाची घोषणा
Union Budget 2023 : सीतारमण यांनी हे अमृत बजेट असल्याचं सांगितलं. बजेट सादर करताना निर्मला सीतारमण यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यात शिक्षक भरती संदर्भात त्यांनी एक घोषणा केली.
Union Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज पाचवं आणि मोदी 2.0 सरकारमधील शेवटच बजेट सादर केलं. सीतारमण यांनी हे अमृत बजेट असल्याचं सांगितलं. बजेट सादर करताना निर्मला सीतारमण यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यात शिक्षक भरती संदर्भात त्यांनी एक घोषणा केली. एकलव्य मॉडेल रेसिडेनशिअल स्कूल्ससाठी 38,800 शिक्षकांची भरती करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं.
– पंतप्रधान आवास योजनेचा खर्च 66 टक्क्यांनी वाढवून 79 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक करण्यात येत आहे.
– येत्या तीन वर्षांत आदिवासी विद्यार्थ्यांना आधार देणाऱ्या 740 एकलव्य मॉडेल शाळांसाठी 38 हजार 800 शिक्षक व सहाय्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार
– देशात 50 नवे विमानतळ उभारण्यात येणार
– गरिबांच्या घरासाठी 79 हजार कोटींचा फंड
– 50 नवीन विमानतळ उभारणार
– मोफत रेशनचा 80 कोटी लोकांना फायदा होणार, त्यासाठी 2 लाख कोटींचा खर्च महत्त्वाच्या अर्थव्यवस्थांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करतेय, असं सीतारमण म्हणाल्या. जागतिक मंदीचा परिणामाची भिती असताना, विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2023-24 चा अर्थसंकल्प सादर केला. कोरोनाची साथ आणि रशिया-.युक्रेन युद्धामुळे जागतिक मंदीच वातावरण असताना, भारतीय अर्थव्यवस्थेची योग्य दिशेने वाटचाल सुरु आहे. भविष्य उज्वल आहे असं निर्मला सीतारमण म्हणाल्या.