Budget 2022 : आपत्कालीन विम्यांतर्गत 5 लाखांची मदत, केंद्रीय अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा!
कोरोनाच्या (Corona) सावटाखाली अर्थसंकल्प सादर होत आहे. आरोग्याच्या दृष्टीने हे बजेट खूप महत्वाचे आहे. अर्थसंकल्प 2022 (Budget 2022) संसदेत मांडला जात आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालय डिजिटल आरोग्य (Health) पायाभूत सुविधांसाठी एक धोरण तयार करत आहे, ज्याबद्दल बजेटमध्ये घोषणा केली जाऊ शकते.
मुंबई : कोरोनाच्या (Corona) सावटाखाली अर्थसंकल्प सादर होत आहे. आरोग्याच्या दृष्टीने हे बजेट खूप महत्वाचे आहे. अर्थसंकल्प 2022 (Budget 2022) संसदेत मांडला जात आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालय डिजिटल आरोग्य पायाभूत सुविधांसाठी एक धोरण तयार करत आहे, ज्याबद्दल बजेटमध्ये घोषणा केली जाऊ शकते. अर्थमंत्री निर्मला सितारमन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी संसदीय अर्थसंकल्पात एक मोठी घोषणा आरोग्याशी संबंधित केली आहे. यामुळे आता सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आपत्कालीन विम्या अंतर्गत 5 लाखांची मदत
आपत्कालीन विम्या अंतर्गत 5 लाखांची मदत आता मिळणार आहे. कोरोनामुळे देशात आरोग्य विम्याबाबत मोठ्या प्रमाणात सजगता निर्माण झाली आहे. लाखो कोरोना बाधित नागरिकांच्या आप्तजणांनी आरोग्य विमा खरेदी करण्याचा मार्ग अवलंबिला आहे. सध्या विविध कंपन्यांनी आरोग्य विमे उपलब्ध केले आहेत. व्यक्ती, वय तसेच आरोग्य गरजा यानुरुप प्रत्येक विम्याच्या हफ्त्यात भिन्नता आहे. मात्र, आरोग्य विम्यावर असलेल्या 18% जीएसटीमुळे विम्याच्या प्रीमियममध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे.
विमा पॉलिसीवरील करांत कपात करण्याची आवश्यकता
विमा क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोट्यावधी भारतीयांच्या आवाक्यात आरोग्य विमा येण्यासाठी कर दरांत बदल करणे गरजेचं आहे. विमा पॉलिसीवरील करांत कपात केल्यास किंवा कर पूर्णपणे रद्द केल्यास शक्य होईल. सध्या आरोग्य विमा खरेदीवर 18% जीएसटीची आकारणी केली जाते. त्यामुळे आरोग्य विमा 18% वरुन 5% करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.
संबंधित बातम्या :
Budget 2022: ‘झिरो बजेट’ शेतीची जबाबदारी कृषी महाविद्यालयावर, काय आहे तरतूद?