आयात शुल्क कमी केल्याने सोन्याच्या दरात मोठी घसरण, मुंबई-पुण्यात किती रुपयांनी स्वस्त?

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात त्यांनी सोन्यावरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सोन्याच्या जरात मोठी घसरण झाली आहे. पुणे, मुंबई आणि जळगावमध्ये किती रुपयांनी स्वस्त झालंय सोनं जाणून घ्या.

आयात शुल्क कमी केल्याने सोन्याच्या दरात मोठी घसरण, मुंबई-पुण्यात किती रुपयांनी स्वस्त?
gold rate today
Follow us
| Updated on: Jul 23, 2024 | 4:27 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील NDA सरकारने तिसऱ्या कार्यकाळातील आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्पात सोन्या-चांदीबाबत मोठी घोषणा करण्यात आलीये. त्यामुळे सोन्याच्या अचानक मोठी घसरण झाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाच्या अखेरीस सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम सुमारे 4000 रुपयांनी कमी झालाय. मुंबईत सोन्याचा भाव 3531 रुपयांनी घसरला आहे. पुण्यात सोन्याचा भाव 3526 रुपयांनी स्वस्त झाला आहे. जळगावमध्ये सोन्याचा दर 3 हजारांनी स्वस्त झालाय. गोंदियामध्ये 400 आणि वाशिममध्ये 2800 रुपयांनी सोनं स्वस्त झालं आहे.

MCX वर किंमत किती

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्पात सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटी कमी करण्याची घोषणा करताना सोने आणि चांद स्वस्त झाली. कारण यावर लागणारा कस्टम ड्युटी 6% पर्यंत कमी झाला आहे. सोन्याच्या किमतीवर लगेचच त्याचा परिणाम दिसला. सोनं हे ४ हजार रुपयांनी स्वस्त झाला आहे, तर चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. MCX वर सोन्याच्या फ्युचर्स ट्रेडिंग दरम्यान, मंगळवारी तो 72,850 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर पोहोचला होता आणि सोन्यावरील कस्टम ड्यूटी कमी करण्याची घोषणा होताच, तो वेगाने घसरला. आता सोन्याचा भाव 68,500 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर पोहोचला आहे.

चांदीमध्येही मोठी घसरण

एकीकडे सोन्याचे भाव कमी झाले, तर दुसरीकडे चांदीच्या दरातही घसरण झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज अर्थात एमसीएक्सवर चांदीची किंमत 89,015 रुपयांवर पोहोचली होती आणि अचानक त्यातही 4,740 रुपयांची घसरण झाली. आता चांदीचा भाव 84,275 रुपये प्रति किलोने स्वस्त झाला आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भाषणात सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटी 10 टक्क्यांवरून 6 टक्के केली आहे. बेसिक कस्टम ड्युटी ५ टक्के, ॲग्री इन्फ्रा आणि डेव्हलपमेंट सेस १ टक्के आहे. याशिवाय प्लॅटिनमवरील शुल्क आता 6.4 टक्के करण्यात आले आहे. आयात केलेल्या दागिन्यांवर कस्टम ड्युटीही कमी करण्यात आली आहे.

सोने आणि चांदीवरील सीमा शुल्क 6% पर्यंत कमी केले आहे, ज्यामुळे देशांतर्गत किंमती देखील कमी होऊ शकतात आणि सोन्याची मागणी वाढू शकते. सोने आणि चांदीवरील सध्याचे शुल्क 15% आहे, ज्यामध्ये 10% मूलभूत कस्टम ड्युटी आणि 5% कृषी पायाभूत सुविधा विकास उपकर समाविष्ट आहे. अर्थमंत्र्यांच्या घोषणेनंतर आता मूळ कस्टम ड्युटी 5 टक्के, तर उपकर 1 टक्के असेल.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....