Budget 2021: फडणवीस साहेबांच्या ‘त्या’ प्रामाणिकपणाबद्दल अभिनंदन; अजितदादांची टोलेबाजी

केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खरपूस टीका केली आहे. (ajit Pawar taunt Devendra Fadnavis While Reacting On Union Budget)

Budget 2021: फडणवीस साहेबांच्या 'त्या' प्रामाणिकपणाबद्दल अभिनंदन; अजितदादांची टोलेबाजी
अजित पवार-देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Feb 01, 2021 | 7:28 PM

मुंबई: केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खरपूस टीका केली आहे. या अर्थसंकल्पावर टीका करतानाच अजितदादांनी राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही टोले लगावले आहेत. (ajit Pawar taunt Devendra Fadnavis While Reacting On Union Budget)

अजित पवार यांनी एक प्रेसनोट काढून केंद्रीय अर्थसंकल्पाची चिरफाड केली आहे. त्यात त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही टोले लगावले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना नाशिक आणि नागपूरकरांचे अभिनंदन केले आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे अभिनंदन करण्याची त्यांचीही हिंमत झाली नाही. कारण अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काहीही नाही, याची जाणीव त्यांनाही झाली आहे. त्यांनीच त्याची अप्रत्यक्ष कबूली केवळ नाशिक व नागपूर मेट्रोबद्दल अभिनंदन करुन दिली आहे. फडणवीस साहेबांच्या या एवढ्या प्रामाणिकपणाबद्दल मात्र, मी त्यांचे अभिनंदन करतो, असा टोला अजित पवार यांनी लगावला.

आज केवळ अर्थसंकल्प मांडला गेला आहे. तो मंजूर करताना महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी आवश्यक सुधारणा सूचवून महाराष्ट्रावरचा अन्याय दूर करावा. महाराष्ट्रातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

अर्थसंकल्प नशिबावर सोडता येत नाही

बजेट मांडताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्यावर भाष्य केलं. क्रिकेटचा सामना नशिबाने साथ दिल्यास एकवेळ जिंकता येतो, परंतु देशाच्या अर्थसंकल्पारखी गोष्ट नशिबावर सोडून चालणार नाही, हे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी समजून घ्यायला हवे होते, असं सांगतानाच केंद्रीय अर्थसंकल्प हे आत्मनिर्भर बजेट असल्याचा ट्रेंड ट्विटरवर चालवला जातोय, परंतु हे आत्मनिर्भर नाही तर, देशाला बरबादीकडे नेणारे, अस्ताव्यस्त बजेट आहे, अशी टीका त्यांनी केली. (ajit Pawar taunt Devendra Fadnavis While Reacting On Union Budget)

पश्चिम बंगालला पैसे मिळतीलच याची खात्री नाही

मुंबई, पुण्यासह महाराष्ट्राच्या वाट्याला अर्थसंकल्पातून भरीव काहीही आले नसून महाराष्ट्रावरील केंद्राचा आकस पुन्हा एकदा दिसून आला आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुका नजिक असल्याने केंद्रीय अर्थमंत्र्यांनी पश्चिम बंगालला २५ हजार कोटी जाहीर केले. ते मिळतील याची खात्री नाही. पश्चिम बंगाल निवडणुकांमुळे केंद्रीय अर्थमंत्र्यांना कवीवर्य रविंद्रनाथ टागोरांची आवर्जून आठवण झाली. परंतु, ही आठवण करताना त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेची पहाट अंधारलेली असल्याचे सांगून आर्थिक आघाडीवर केंद्र सरकारचे अपयश कबूल केले आहे, अशी जोरदार टीकाही त्यांनी केली. (ajit Pawar taunt Devendra Fadnavis While Reacting On Union Budget)

संबंधित बातम्या:

Budget 2021: बजेट देशासाठी हवं, निवडणुकांसाठी नको; मुख्यमंत्र्यांचा टोला

ना आमदार, ना नगरसेवक, तरीही ‘वर्षा’वर शिवसेना प्रवेश, मनसेला खिंडार पाडणारे राजेश कदम कोण?

वो दौर कुछ और था, ये दौर कुछ और है; पक्ष सोडून गेलेल्यांवर जयंत पाटलांचं भाष्य

(ajit Pawar taunt Devendra Fadnavis While Reacting On Union Budget)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.