Union Budget 2023 : महिलांसाठी नवी बचत योजना, या योजनेची वैशिष्ट्ये काय?

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या स्मरणार्थ महिला सन्मान बचत पत्र योजना मार्च 2025 पर्यंत 2 वर्षांसाठी सुरू केली जाईल, असे अर्थमंत्र्यांनी म्हटले. या योजनेअंतर्गत महिला किंवा मुली आंशिक आर्यन पर्यायाच्या नावावर 2 वर्षांसाठी 2 लाख रुपये जमा करू शकतील.

Union Budget 2023 : महिलांसाठी नवी बचत योजना, या योजनेची वैशिष्ट्ये काय?
अर्थसंकल्पात महिलांसाठी नवी बचत योजनाImage Credit source: sansad tv
Follow us
| Updated on: Feb 01, 2023 | 2:19 PM

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी संसदेत आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी सेक्टर्ससाठी विविध घोषणा केल्या आहेत. या अर्थसंकल्पात महिलांनाही विशेष भेट देण्यात आली आहे. अर्थमंत्र्यांनी महिलांसाठी नवीन बचत योजनेची घोषणा केली आहे. या बचत योजनेत 2 वर्षांसाठी महिला बचत योजना जाहीर करण्यात आली आहे. महिला बचत योजनेतील गुंतवणुकीला 2 लाख रुपयांपर्यंत सूट देण्यात आली आहे. अर्थसंकल्पात महिला सन्मान बचत प्रमाणपत्र सादर करण्यात आले आहे.

काय आहेत वैशिष्ट्ये?

हे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र 2025 पर्यंत दोन वर्षांसाठी वैध असेल. ही वन टाईम नवीन बचत योजना आहे. यामध्ये 7.5 टक्के व्याज दिले जाईल. किसान विकास पत्र योजनेप्रमाणेच ही महिला बचत प्रमाणपत्र योजना असून, या माध्यमातून महिला चांगली बचत करू शकतात.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या स्मरणार्थ महिला सन्मान बचत पत्र योजना मार्च 2025 पर्यंत 2 वर्षांसाठी सुरू केली जाईल, असे अर्थमंत्र्यांनी म्हटले. या योजनेअंतर्गत महिला किंवा मुली आंशिक आर्यन पर्यायाच्या नावावर 2 वर्षांसाठी 2 लाख रुपये जमा करू शकतील. याचा लाभ घेण्यासाठी कोणतीही महिला किंवा मुलगी खाते उघडू शकते. पैसे काढण्यासाठी अटी असतील.

हे सुद्धा वाचा

गेल्या आर्थिक वर्षात महिला आणि बालकांसाठी तीन बचत योजना

मागील अर्थसंकल्पात महिलांसाठी 1,71,006 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. सीतारामन यांनी महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या सक्षम अंगणवाडी, मिशन वात्सल्य, मिशन शक्ती आणि पोषण 2.0 यांसारख्या योजनांमध्ये सुधारणा करण्याची घोषणा केली होती.

यासोबतच 2 लाख अंगणवाड्यांचे अपग्रेडेशन करण्यात आले. याशिवाय महिला व बालकांच्या विकासासाठी 3 योजना सुरू करण्यात आल्या.

Non Stop LIVE Update
'त्या महिलांचे फोटो काढा, आम्हाला द्या..', भाजप नेत्याचा बहिणींना दम
'त्या महिलांचे फोटो काढा, आम्हाला द्या..', भाजप नेत्याचा बहिणींना दम.
'त्या गोंधळानं आमचा राजा वाचला अन् इज्जत राहिली', भरसभेत दादांची कबुली
'त्या गोंधळानं आमचा राजा वाचला अन् इज्जत राहिली', भरसभेत दादांची कबुली.
संजय राऊत अन् राज ठाकरेंमध्ये जुंपली, सभेतून ठाकरेंसह राऊतांवर निशाणा
संजय राऊत अन् राज ठाकरेंमध्ये जुंपली, सभेतून ठाकरेंसह राऊतांवर निशाणा.
'साहेबांचा नाद केला आता...', धनंजय मुंडेंना हरवा; शरद पवार मैदानात
'साहेबांचा नाद केला आता...', धनंजय मुंडेंना हरवा; शरद पवार मैदानात.
मोदींच्या 'एक है तो सेफ है' घोषणेवर संजय राऊतांची टीका, म्हणाले.....
मोदींच्या 'एक है तो सेफ है' घोषणेवर संजय राऊतांची टीका, म्हणाले......
भाजपा - शिंदेंनी गुंडांना निवडणूक निरीक्षक नेमलंय, राऊत यांची टीका
भाजपा - शिंदेंनी गुंडांना निवडणूक निरीक्षक नेमलंय, राऊत यांची टीका.
नरेंद्र मोदी यांनीच महाराष्ट्राला 'एटीएम' बनवले, नाना पटोले यांची टीका
नरेंद्र मोदी यांनीच महाराष्ट्राला 'एटीएम' बनवले, नाना पटोले यांची टीका.
जेवढे मोदी - शाह जास्त फिरतील तेवढ्या आम्हाला जास्त जागा -जयंत पाटील
जेवढे मोदी - शाह जास्त फिरतील तेवढ्या आम्हाला जास्त जागा -जयंत पाटील.
भाजपा नेत्याच्या हत्येने खळबळ, भरदिवसा कुऱ्हाडीने वार केले
भाजपा नेत्याच्या हत्येने खळबळ, भरदिवसा कुऱ्हाडीने वार केले.
कॉन्ट्रॅक्टरचं दिवाळी आणि जनतेचं दिवाळं, काय म्हणाले उद्धव ठाकरे ?
कॉन्ट्रॅक्टरचं दिवाळी आणि जनतेचं दिवाळं, काय म्हणाले उद्धव ठाकरे ?.