Budget 2022: सामान्य जनतेसाठी पहिल्यांदाच सुरु होणार ई-पासपोर्टची सुविधा, सुरक्षेसाठी electronic chip!!
पासपोर्टधारकाची माहिती चिपमध्ये डिजिटल स्वरुपात असेल. ही चिप पासपोर्टच्या बुकलेटमध्ये एम्बेड केली जाईल. या चिपला कुणी छेडछाड केल्यास पासपोर्ट प्रमाणित होणार नाही. ई पासपोर्टमध्ये एक डिजिटल सिग्नेचर असेल. ही सिन्नेचर प्रत्येक देशासाठी युनिक असेल.
नवी दिल्लीः अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Seetharaman) यांनी आज 2022-23 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प (Budget 2022) सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात पहिल्यांदाच त्यांनी ई-पासपोर्टसंबंधी डिटेल्सची घोषणा केली. यंदाच्या बेजटमध्ये डिजिटलायझेशवर जास्त भर देण्यात आला. त्यापैकीच एक म्हणजे ई पासपोर्ट (E Passport) सुविधा. हा ई पासपोर्ट सामान्यांसाठी महत्त्वाचा ठरणार असून याच्या सुरक्षिततेसाठी इलेक्ट्रॉनिक चिप्स आणि फ्यूचर टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, ई-पासपोर्ट पुढील वर्षी जनतेच्या सुविधेसाठी सुरु केले जाईल. आंतरराष्ट्रीय नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसार, या पासपोर्टचे स्वरुप असेल. सध्या भारतीय नागरिकांना पोसपोर्ट म्हणून एक लहान पुस्तिका दिली जाते.
साध्या पासपोर्टचे डिजिटल स्वरुप!
केंद्र सरकारने सामान्यांसाठी आणलेल्या या ई पासपोर्टचे स्वरुप काय असेल, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. अगदी साध्या शब्दात सांगायचं झालं तर आपल्याला एरवी मिळणाऱ्या पासपोर्टचेच हे डिजिटल स्वरुप असेल. या इ पासपोर्टच्या सुरक्षेसाठी अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. यात रेडियो फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन आणि बायोमॅट्रिक्ससारख्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घोषणा करताना म्हटले की, डिजिटल पासपोर्टमध्ये एक इलेक्ट्रॉनिक चिप असेल. त्यावर सुरक्षेसंबंधीचा डेटा इन्कोडेड असले. जागतिक पातळीवरील पदांना अधिक सुविधा देणे हा केंद्र सरकारचा यामागील उद्देश आहे. ई पासपोर्ट बायोमेट्रिक डेटावर आधारीत असल्यामुळे तो अधिक सुरक्षित असेल, असे म्हटले जात आहे. याआधी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीदेखील मंत्रालयाकडून नागरिकांसाठी E-Passport ची सुविधा सुरु करण्याविषयी वक्तव्य केले होते.
चिपला छेडछाड झाल्यास प्रमाणिकरण नाही
पासपोर्टधारकाची माहिती चिपमध्ये डिजिटल स्वरुपात असेल. ही चिप पासपोर्टच्या बुकलेटमध्ये एम्बेड केली जाईल. या चिपला कुणी छेडछाड केल्यास पासपोर्ट प्रमाणित होणार नाही. ई पासपोर्टमध्ये एक डिजिटल सिग्नेचर असेल. ही सिन्नेचर प्रत्येक देशासाठी युनिक असेल.
इतर बातम्या-