BUDGET 2022 : ‘टीम निर्मला’… अर्थमंत्र्यांचं भाषण कोण लिहितं? कहाणी बजेट घडविणाऱ्या हातांची!

तज्ज्ञ मंडळींच्या विचारमंथनातून संशोधनाचा आधार घेत अर्थसंकल्प आकाराला येतो. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या निर्मिती प्रक्रियेत विविध घटक समाविष्ट असतात.

BUDGET 2022 : ‘टीम निर्मला’... अर्थमंत्र्यांचं भाषण कोण लिहितं? कहाणी बजेट घडविणाऱ्या हातांची!
निर्मला सीतारमण, केंद्रीय अर्थमंत्री (फाईल फोटो)
Follow us
| Updated on: Jan 29, 2022 | 7:47 PM

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री (Finance Minister) निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. कोविड प्रकोपामुळं अर्थचक्र मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला (Indian Economy) बळकटी मिळण्याची आशा आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या अर्थसंकल्पातून प्रत्येक क्षेत्राला मोठ्या अपेक्षा आहेत. व्यवसाय, शिक्षण, आरोग्य, रेल्वे आदी क्षेत्रांच्या नजरा अर्थव्यवस्थेकडे लागलेल्या आहेत. आयकर संरचना (Tax Slab) बदलणार का, पेट्रोल-डिझेलचे भाव उतरणार का यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरे एक फेब्रुवारीला मिळणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प निर्मितीची विशिष्ट प्रक्रिया निर्धारित करण्यात आली आहे. तज्ज्ञ मंडळींच्या विचारमंथनातून संशोधनाचा आधार घेत अर्थसंकल्प आकाराला येतो. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या निर्मिती प्रक्रियेत विविध घटक समाविष्ट असतात. ‘टीम निर्मला’ मधील चेहरे आणि त्यांची भूमिका जाणून घेऊया-

1. डॉ. टी.व्ही.सोमनाथन

डॉ. टीव्ही सोमनाथन (Dr. TV Somnathan) अर्थमंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आहेत. अर्थसंकल्प टीमचा प्रमुख चेहरा आहेत. सोमनाथन यांनी कोलकाता विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएचडी पूर्ण केली आहे. अर्थसंकल्पाची महत्वाची जबाबदारी सोमनाथन यांच्या खांद्यावर आहे. अर्थसंकल्पातील खर्चाच्या समीकरणात समतोल राखण्याचं आवाहन सोमनाथन यांच्यासमोर असणार आहे.

अर्थमंत्रालयातील 5 सचिवांपैकी सर्वात ज्येष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती अर्थसचिव म्हणून केली जाते. सध्या सोमनाथन ही जबाबदारी निभावत आहेत. सोमनाथन तमिलनाडु केडरचे 1987 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

2. देबाशीष पांडा

देबाशीष पांडा (Debashish Panda) अर्थ मंत्रालयात सेवा विभागात सचिव पदावर कार्यरत आहे. उत्तर प्रदेश कॅडरचे 1987 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. सार्वजनिक क्षेत्राला उर्जितावस्था देण्यामध्ये महत्वाची भूमिका आहे. अर्थव्यवस्थेतील सर्व छोट्या-मोठ्या घोषणांची जबाबदारी पांडा यांच्याकडे आहे. अर्थमंत्रालय व रिझर्व्ह बँक यांच्या कारभाराबाबत समन्वय साधण्याची महत्वपूर्ण जबाबदारी पांडा यांच्याकडे देण्यात आली आहे.

3. तरुण बजाज

तरुण बजाज (Tarun Bajaj) अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक विभागाचे सचिव आहेत. हरियाणा केडरचे 1988 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. अर्थमंत्रालयात पदभार स्विकारण्यापूर्वी बजाज पंतप्रधान कार्यालयात कार्यरत होते. अर्थमंत्रालयात बजाज यांनी आतापर्यंत अर्थसहाय्य पॅकेजवर काम केले आहे. कोरोना काळात सरकारकडून देण्यात येणाऱ्या मदत निधी संरचना ठरविण्यात बजाज यांचे महत्वाचे योगदान राहिले आहे.

4. तुहिन कांत पांडे

अर्थमंत्र्याच्या टीममध्ये गुंतवणूक आणि सार्वजनिक संपत्ती विभागाचे सचिव तुहिन कांत पांडे (Tuhin Kanta Pandey) यांच्या नावाचा देखील समावेश आहे. निर्गृंतवणुकीचे महत्वाचे निर्णय पांडे यांच्या अखत्यारित येतात. त्यामुळे पांडे यांच्यासमोर निर्गृंतवणुकीच्या अनेक योजना तसेच एलआयसी आयपीओ प्रमुख उद्दिष्ट असणार आहे.

5. अजय सेठ

अर्थमंत्रालयाचे सचिव अजय सेठ (Ajay Seth) यांच्यावर सर्वांचा नजरा असतात. निर्मला सीतारमण यांची सर्व अर्थसंकल्पीय भाषणांचा मसुदा निर्मितीचे प्रभारी अजय सेठ आहेत.

इतर बातम्या :

Budget 2022 : जनधन खाते होणार डिजिटल? मोदी सरकार आगामी अर्थसंकल्पात जनधन खात्यांसंदर्भात करू शकते ‘ही’ मोठी घोषणा

Budget 2022 : अर्थसंकल्पात हवा रोजगार निर्मितीवर भर, गव्हर्नर सुब्बाराव का म्हणत आहेत देशात आर्थिक विषमता

Budget 2022: पायाभूत सुविधांवर भर, मात्र कर सवलतीत निराशा पदरी पडण्याची शक्यता

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.