Budget 2023 : सीएनजीच्या दरात किलोमागे रूपयांची 2.50 घसरण, वाहनचालकांना दिलासा
महानगर गॅस कंपनीने सीएनजी CNG च्या किंमतीत सुधारणा करीत किलोमागे दर 2.50 रूपयांनी कमी केले खरे परंतू घरगुती पाईपचा दर मात्र कायमच ठेवला आहे. त्यामुळे सर्वसामान्य गृहीणींचे घरगुती बजेट कोसळलेलेच आहे.
मुंबई : महानगर गॅस कंपनीने ( MGL) सीएनजीच्या दरात कपात केली आहे. सीएनजीचा ( CNG ) दर किलोमागे 89.50 रूपयांवरून 87.00 रूपये करण्यात आला आहे. म्हणजे कालरात्रीपासून सीएनजी किलोमागे 2.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. बजेटच्या तोंडावर दर कमी झाल्याने वाहनचालकांना दिलासा मिळणार असला तरी घरगुती पाईप गॅसच्या ( PNG ) दरात मात्र कोणतीही कपात न केल्याने सर्वसामान्यांना बसणारी झळ कायमच आहे.
महागाईने सर्वसामान्याचे जगणं महाग झाले असताना महानगर गॅस कंपनीने सीएनजीचे दर किलोमागे 2.50 रूपये कमी केले आहेत. मात्र पाईप गॅस ( PNG ) दर गेल्यावर्षी नोव्हेंबर 2022 मध्ये प्रति घन मीटर 54 रूपयांनी वाढवलेला दर कायमच आहे. त्यामुळे सर्वसामान्य गृहीणींचे घरगुती बजेट कोसळलेलेच आहे.
महानगर गॅस कंपनीने सीएनजी CNG च्या किंमतीत सुधारणा करीत किलोमागे दर 2.50 रूपयांनी कमी केले खरे परंतू घरगुती पाईपचा दर मात्र कायमच ठेवला आहे. त्यामुळे सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांना दिलासा मिळणार आहे. यात मुंबई आणि आजूबाजूच्या क्षेत्रातील टॅक्सी आणि ऑटो रिक्षा चालकांनी मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईत 40 हजार टॅक्सी चालक आहेत. तर अडीच लाखांहून अधिक ऑटो रिक्षा चालक आहेत. ही सर्व वाहने सीएनजी इंधनावरच धावत आहेत. मुंबईतील टॅक्सी चालकांच्या संघटनेने कोरोनाकाळात आर्थिक नुकसान झाल्याने टॅक्सी व्यवसाय परवडत नसल्याने अनेक वेळा आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांना भाडेवाढ मंजूर करण्यात आली आहे.
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने घरगुती नैसर्गिक वायूचे वाटप वाढवण्यासाठी इनपुट गॅसची किंमत कमी केली असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे महानगर गॅस लिमिटेड (MGL) त्यांच्या कॉम्प्रेस्ड गॅसच्या किंमती कमी केल्याचे जाहीर केले आहे. नैसर्गिक वायूच्या (सीएनजी) दरात रु. 31 जानेवारी 2023 च्या मध्यरात्री / 01 फेब्रुवारी 2023 च्या सकाळपासून मुंबईत आणि आसपास किलोमागे 2.50 रुपयांची बचत होणार आहे. त्यामुळे मुंबई आणि आसपासच्या शहरात सीएनजीचा सुधारीत दर किलोमागे 87.00 रूपय इतका असेल असे कंपनीने म्हटले आहे. हा सीएनजीचा नवा दर पेट्रोलच्या तुलनेत सुमारे 44% ची आकर्षक बचत करणारा असल्याचे महानगर गॅस कंपनीने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.