Budget 2023 LIVE: ‘सर्वांना न्याय देणारा, सर्वसमावेश अर्थसंकल्प’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Feb 02, 2023 | 6:15 AM

Budget 2023 Session Parliament LIVE : केंद्रातील मोदी सरकार आज आर्थिक वर्ष 2023-2024साठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचा हा पाचवा अर्थसंकल्प आहे.

Budget 2023 LIVE: 'सर्वांना न्याय देणारा, सर्वसमावेश अर्थसंकल्प', मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया
Budget 2023Image Credit source: tv9 marathi

नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकार आज आर्थिक वर्ष 2023-2024साठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचा हा पाचवा अर्थसंकल्प आहे. तर पुढच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका असल्याने मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे आजच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकार देशवासियांना काय देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 01 Feb 2023 06:43 PM (IST)

    ‘सर्वसामान्यांच्या तोंडाला पान पुसणारा अर्थसंकल्प’; काँग्रेस प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांची टीका

    सोलापूर :

    – सर्वसामान्यांच्या तोंडाला पान पुसणारा अर्थसंकल्प; काँग्रेस प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांची टीका

    – 2021- 22 सालच्या अर्थसंकल्पातही केवळ मोठमोठे आकडे दिले होते मात्र प्रत्यक्षात काहीही झाले नाही.

    – भाजपकडून प्रत्यक्ष मोठ्या आकडे दाखवायचे प्रत्यक्ष कृती शून्य असं फसव बजेट सादर करण्यात आले

    – आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गाजर दाखवणार आहे अर्थसंकल्प आहे

    – महिलांसाठी गॅस दरवाढ, पेट्रोल डिझेल दर, वीज दरवाढ कमी करण्याबाबत कुठेही तरतूद नाही.

    – भांडवलदारांना खुश करणारा हा अर्थसंकल्प आहे.

    – केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मोठमोठ्या योजना जाहीर करायच्या आणि जनतेला गाजर दाखवायचं अशी भूमिका भाजपा नेहमी घेत असा घानाघात ही कुलकर्णीनी केलाय.

  • 01 Feb 2023 05:17 PM (IST)

    मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली सौदी अरेबियाच्या राजदुताची भेट

    सौदी अरेबियाचे राजदुत सलेह इद अल हुसेनी यांनी घेतली मुख्यमंत्री यांची भेट

    देशातील सर्वात मोठे राज्य महाराष्ट्र असल्याने भेटीसाठी सह्याद्री येथे घेतली भेट

    सौदी आणि महाराष्ट्राचे आणि पर्यायाने देशासोबतचे संबंध वाढवण्यासाठी भेट झाल्याची माहिती

  • 01 Feb 2023 05:16 PM (IST)

    नंदुरबार : शहादा येथे अपघात

    गरोदर माता आणि रुग्णांना घेऊन जाणारी रुग्णवाहिकेचा अपघात

    लोणखेडा कॉलेज गेटसमोर रुग्णवाहिका झाली पलटी

    अपघातावेळी 11 गरोदर माता होत्या रुग्णवाहिकेत

    जखमीना उपचारासाठी शहादा उपजिल्हा रुग्णालयमध्ये दाखल

    अतिदुर्गम भाग असलेल्या तेलखेडी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत होते रुग्ण

  • 01 Feb 2023 05:13 PM (IST)

    ‘सर्वांना न्याय देणारा, सर्वसमावेश अर्थसंकल्प’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

    मुंबई :

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून केंद्रीय अर्थसंकल्पाचं स्वागत, म्हणाले…

    • अर्थसंकल्पाचं मनापासून स्वागत करतो. सर्वांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात सहाकर क्षेत्राला दिलासा देणारा निर्णय घेण्यात आलाय.
    • आम्ही केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांना भेटलो होतो. साखर उद्योग आणि सहकार क्षेत्र अडचणीत आलं होतं. त्यामुळे लाखो शेतकरी अडचणीत आले होते. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे इतर सहकारी आम्ही एकत्र मिळून अमित शाह यांना भेटलो होतो. त्यांच्यासमोर सहकार क्षेत्राशी संबंधित व्यथा मांडली होती. त्यामुळे जवळपास दहा हजार कोटी रुपये माफ करण्याचा निर्णय अर्थसंकल्पाने घेतला आहे. त्यामुळे मी अमित शाह यांचे आभारी आहोत.
  • 01 Feb 2023 03:14 PM (IST)

    मध्यमवर्गीयांची मागणी पुर्ण- फडणवीस

    मध्यमवर्गीयांची मागणी पुर्ण- फडणवीस

    आयकर कर रचनेत बदल

    आठ वर्षानंतर कर रचनेत केला बदल

    सर्व घटकांचा विचार करणारा अर्थसंकल्प

  • 01 Feb 2023 02:44 PM (IST)

    Budget News Live | शाश्वत भविष्यासाठी हा अर्थसंकल्प- नरेंद्र मोदी

    हरित ऊर्जा, हरित पायाभूत सुविधा आणि हरित नोकऱ्यांना मिळणार प्रोत्साहन

    या अर्थसंकल्पात तंत्रज्ञान आणि नवीन अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रीत

    पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया

  • 01 Feb 2023 02:41 PM (IST)

    Budget News Live | मध्यमवर्गीयांच्या सक्षमीकरणासाठी सरकारने पावलं उचलली- मोदी

    सरकारने मध्यमवर्गीयांचं सक्षमीकरण करण्यासाठी आणि राहणीमान सुलभ करण्यासाठी पावलं उचलली

    आम्ही टॅक्सचे दर कमी करत दिलासा दिला

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया

  • 01 Feb 2023 02:23 PM (IST)

    Budget Live Update : वंचितांना प्राध्यान्य देणारं बजेट, पंतप्रधान नरेंद्र मोदी

    नवी दिल्ली : बजेट गरिबांचं स्वप्न पूर्ण करणार,

    महिलांसाठी विशेष बचत योजना सुरू,

    बजेटमुळे कोट्यवधी लोकांचे स्वप्न पूर्ण करणार,

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया.

  • 01 Feb 2023 01:54 PM (IST)

    राजन विचारे, खासदार शिवसेना

    राजन विचारे, खासदार शिवसेना

    2024 च्या निवडणूका डोळ्यांसमोर ठेऊन मांडला आहे

    सर्वाधिक महसूल मुंबईतून येतो

    GST सारख्या टॅक्समध्ये सवलत द्यायला हवी होती

    गेल्या 5 वर्षात केलेल्या घोषणाचं काय झालं?

  • 01 Feb 2023 01:42 PM (IST)

    अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला सापत्नपणाची वागणूक मिळाली आहे: सुनील तटकरे

    कर्नाटकचे मुख्यमंत्री कोणत्या शब्दात महाराष्ट्राविषयी बोलतात, त्या राज्याला झुकतं मापं दिलं जातं

    निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन हा अर्थसंकल्प सादर झाला आहे

    शेतकऱ्यांना या बजेटमधून काही मिळालं नाही

    मध्यमवर्गीयांना कररचनेत थोडा दिलासा मिळालाय

    सुनील तटकरेंची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया

  • 01 Feb 2023 01:40 PM (IST)

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केंद्रीय अर्थसंकल्पाचं स्वागत

    बजेटमध्ये सबसीडीच्या पलिकडचा विचार करण्यात आला

    कृषी क्षेत्राला डिजिटल माध्यमांशी जोडण्याचा प्रयत्न

    गावपातळीवर सहाकर क्षेत्र मजबूत होणार

  • 01 Feb 2023 01:25 PM (IST)

    अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला सापत्नपणाची वागणूक मिळाली- सुनील तटकरे

    अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला सापत्नपणाची वागणूक मिळाली आहे

    कर्नाटकचे मुख्यमंत्री कोणत्या शब्दात महाराष्ट्राविषयी बोलतात

    त्या राज्याला झुकतं मापं दिलं जातं निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन हा अर्थसंकल्प सादर झाला आहे

    शेतकऱ्यांना या बजेटमधून काहीही मिळालेलं नाही

    मध्यमवर्गीयांना कररचनेत थोडा दिलासा मिळालाय

    सुनील तटकरेंची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया

  • 01 Feb 2023 01:06 PM (IST)

    केंद्रीय अर्थसंकल्प हा निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन सादर करण्यात आला

    जून्याच योजनांना नवीन नावं दिलीत,

    महापालिकेचा अर्थसंकल्प आहे की केंद्र सरकारचा,

    केंद्र सरकारला हे कळायला हवं की दुष्काळ फक्त कर्नाटकात नाही,

    मात्र निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन एस , एसटी ,ओबीसी योजनांचा दोन तीन वेळा उल्लेख केला,

    कररचनेत थोडा बदल केलाय त्यानं थोडा दिलासा मिळलाय,

    अरविंद सावंत यांची अर्थसंकल्पावर टिका.

  • 01 Feb 2023 01:00 PM (IST)

    पर्यटनासंदर्भात अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा

    50 पर्यटनस्थळे निश्चित केली जाणार आहेत. ते देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी संपूर्ण पॅकेज म्हणून विकसित केले जातील.

    राज्यांच्या राजधानीमध्ये Unity Mall उघडण्यासाठी राज्यांना प्रोत्साहित केले जाईल. या अंतर्गत एक जिल्हा, एक उत्पादन आणि हस्तकला वस्तूंना प्रोत्साहन दिले जाणार

  • 01 Feb 2023 12:50 PM (IST)

    काय स्वस्त? काय महाग?

    खेळणी, सायकल, ऑटोमोबाइल स्वस्त

    इलेक्ट्रॉनिक वाहने स्वस्त

    परदेशातून येणाऱ्या चांदीच्या वस्तू महागणार

    काही मोबाईल फोन, कॅमेरा लेन्स स्वस्त होतील

    सिगारेट होणार महाग

  • 01 Feb 2023 12:46 PM (IST)

    मोठी करसवलत जाहीर

    अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कराबाबत मोठी घोषणा केली आहे.

    आता 7 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही.

    ही मर्यादा आधी 5 लाख रुपये होती.

  • 01 Feb 2023 12:28 PM (IST)

    इतक्या लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर लागणार नाही

    7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर लागणार नाही

    9 लाख उत्पन्नासाठी 44 हजार कर

  • 01 Feb 2023 12:09 PM (IST)

    Union Budget 2023 : निर्मला सीतारमण यांच्या बजेटमधील आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घोषणा, Highlights

    बजेटमधील आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घोषणा, Highlights. वाचा सविस्तर….

  • 01 Feb 2023 12:06 PM (IST)

    Budget 2023 LIVE :  तरुणांवर सरकारचे लक्ष

    देशातील युवकांसाठी कौशल्य युवा केंद्रे उभारण्यावर सरकार भर देणार, त्याचबरोबर परदेशात नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ३० कौशल्य भारत केंद्रे सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी केली नॅशनल अॅप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम तयार करून विद्यार्थ्यांना थेट मदत देण्यात येणार आहे.

  • 01 Feb 2023 11:58 AM (IST)

    Budget 2023 LIVE: अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 2.40 लाख कोटी रुपयांची तरतूद

    पुढील आर्थिक वर्षात रेल्वेसाठी 2.40 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

    पुढील 1 वर्षासाठी मोफत अन्नधान्य योजना, त्यासाठी 2 लाख कोटींचे बजेट

    भांडवली गुंतवणुकीचा खर्च 33 टक्क्यांनी वाढवून 10 लाख कोटी रुपये केला जात आहे, जो जीडीपीच्या 3.3% असेल

    5G वरील संशोधनासाठी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये 100 लॅब उभारणार

  • 01 Feb 2023 11:55 AM (IST)

    रेल्वेसाठी २.४० लाख कोटींचे तरतूद अर्थसंकल्पात

    बायोगॅसच्या उभारणीसाठी १० हजार कोटींची तरतूद

    एकलव्य शाळेत ३८ हजार ८०० शिक्षकांची भरती करणार

    गरीबांना मोफत अन्नधान्य योजनेची मुदत १ वर्ष वाढवली

    रेल्वेसाठी २.४० लाख कोटींचे तरतूद अर्थसंकल्पात

  • 01 Feb 2023 11:50 AM (IST)

    Budget 2023 LIVE: अर्थसंकल्पात निर्मला सीतारामण यांच्या मोठ्या घोषणा

    पंतप्रधान आवास योजनेचा खर्च 66 टक्क्यांनी वाढवून 79 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक करण्यात येत आहे.

    येत्या तीन वर्षांत आदिवासी विद्यार्थ्यांना आधार देणाऱ्या 740 एकलव्य मॉडेल शाळांसाठी 38 हजार 800 शिक्षक व सहाय्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार

    देशात 50 नवे विमानतळ उभारण्यात येणार

  • 01 Feb 2023 11:41 AM (IST)

    budget 2023 live updates – शेतकऱ्यांसाठी विविध योजना जाहीर

    BUDGET 2023 LIVE

    शेतकऱ्यांसाठी विविध योजना जाहीर

    –  पंचामृत योजना

    – गोवर्धन योजना

    – बायोगॅस धोरणासाठी 10 हजार कोटीची गुंतवणूक

    – ‘मिष्ठी’ योजना

    – आंब्याची बागायतीसाठी ‘मिष्ठी’ योजना

  • 01 Feb 2023 11:38 AM (IST)

    union budget 2023 highlights : येत्या वर्षात विकासदर 7 टक्के राहण्याची अपेक्षा

    येत्या वर्षात विकासदर 7 टक्के राहण्याची अपेक्षा

    गरिबांच्या घरासाठी 79 हजार कोटींचा फंड

    50 नवी विमानतळ उभारणार

    मोफत रेशनचा 80 कोटी लोकांना फायदा होणार, त्यासाठी 2 लाख कोटींचा खर्च

    44 कोटी 60 लाख नागरिकांना जीवनविम्याचं कवच

  • 01 Feb 2023 11:37 AM (IST)

    Budget 2023 LIVE: अर्थसंकल्पात निर्मला सीतारामण यांच्या मोठ्या घोषणा

    मुले आणि युवकांसाठी राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीची स्थापना

    पशुपालन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसायावर लक्ष केंद्रित करून कृषी कर्जाचे उद्दिष्ट 20 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवले जाईल

    शेतीशी संबंधित स्टार्ट अप ला प्राधान्य दिले जाईल

    2014 पासून उभारण्यात आलेल्या सध्याच्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या सहकार्याने 157 नवीन नर्सिंग महाविद्यालये उभारण्यात येणार

  • 01 Feb 2023 11:32 AM (IST)

    Budget 2023 LIVE: ग्रामीण महिलांसाठी 81 लाख बचत गटांना मदत

    अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिल्ट्स लवकरच स्थापन करण्यात येणार आहे.

    ग्रामीण महिलांसाठी 81 लाख बचत गटांना मदत मिळाली, त्यात आणखी वाढ करण्यात येणार आहे.

    केवळ आर्थिक मदतच केली नाही तर त्यांची तांत्रिक कौशल्ये सुधारण्यावर भर देण्यात आला आहे

  • 01 Feb 2023 11:31 AM (IST)

    Budget 2023 LIVE: अर्थसंकल्पातील 7 प्राधान्यक्रमे

    निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पातील 7 प्राधान्यक्रमांची दिली माहिती

    अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पातील सात प्राधान्यक्रम सांगितले

    यामध्ये इन्फ्रा, ग्रीन ग्रोथ, फायनान्शियल सेक्टर, युथ पॉवर यांचा समावेश

  • 01 Feb 2023 11:29 AM (IST)

    यंदाच्या अर्थसंकल्पात 7 गोष्टींवर भर: निर्मला सीतारामण

    शेतकरी, महिला आणि अनुसूचित जातीचा विकास केला

    जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या विकासावर भर दिला

    डिजिटल पब्लिक इन्फ्रास्टक्चरची निर्मिती केली

    भारत जगातील सर्वात मोठा अन्न उत्पादक आणि निर्यातदार आहे

  • 01 Feb 2023 11:27 AM (IST)

    Budget 2023 LIVE: देशाची अर्थव्यवस्था 7 टक्के दराने वाढणार

    अर्थसंकल्पीय भाषणात निर्मला सीतारामन म्हणाल्या की, चालू वर्षासाठी आपल्या अर्थव्यवस्थेचा विकास दर 7 टक्के राहण्याचा अंदाज जो जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक आहे.

    भारतीय अर्थव्यवस्था योग्य मार्गावर असून उज्ज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

    निर्मला सीतारामन म्हणाल्या की, अंत्योदय योजनेंतर्गत गोरगरिबांसाठी मोफत धान्य पुरवठ्यात एक वर्षाची वाढ करण्यात आली आहे.

  • 01 Feb 2023 11:27 AM (IST)

    Budget 2023 LIVE – नर्सिंग कॉलेजेस संदर्भात अर्थमंत्र्यांची महत्त्वाची घोषणा

    महत्त्वाच्या ठिकाणी 157 नर्सिंग कॉलेजेस सुरु होणार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा

  • 01 Feb 2023 11:23 AM (IST)

    28 महिन्यांत 80 कोटी लोकांना मोफत धान्य देण्यात आले

    28 महिन्यांत 80 कोटी लोकांना मोफत धान्य देण्यात आले

    सरकारने कोविड लसीचे 220 कोटी डोस उपलब्ध केले. 44.6 कोटी लोकांना ते पीएम सुरक्षा आणि पीएम जीवन ज्योती योजनेतून मिळाले आहेत.

    पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून करोडो शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे.

    लोकसहभागातून सरकार सबका साथ, सबका विकास या माध्यमातून पुढे गेले आहे.

    28 महिन्यांत 80 कोटी लोकांना मोफत धान्य देण्यात आले आहे

  • 01 Feb 2023 11:21 AM (IST)

    Budget 2023 LIVE – अमृत काळाच लक्ष्य काय?

    अमृत काळासाठी टेक्नोलॉजी आणि ज्ञान आधारित अर्थव्यवस्था आमचं लक्ष्य आहे. सबका साथ, सबका प्रयासच्या साथीने जनभागीदारी साध्य करणं महत्त्वाच आहे असं सीतारमन म्हणाल्या.

  • 01 Feb 2023 11:20 AM (IST)

    Union Budget 2023 – डाळिंबासाठी विशेष हब तयार करण्यात येणार

    – जागतिक स्तरावर भरड धान्य वर्ष साजरा करणार

    – अॅग्रो स्टार्टअपसाठी भरीव तरतूद

    – महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला प्रोत्साहन

  • 01 Feb 2023 11:20 AM (IST)

    4 कोटींहून अधिक लोकांचे जन धन खाते

    4 कोटींहून अधिक लोकांचे जन धन खाते : अर्थमंत्री निर्मला सीतारामन

  • 01 Feb 2023 11:19 AM (IST)

    भारताला जागतिक आर्थिक व्यवस्थेत आपली भूमिका मजबूत करण्याची अनोखी संधी

    पर्यटनाला चालना देण्याचं काम मिशन मोडवर असेल

    आपली डिजिटल पायाभूत सुविधा अतुलनीय

    आव्हानांचा हा काळ भारताला जागतिक आर्थिक व्यवस्थेत आपली भूमिका मजबूत करण्याची अनोखी संधी देतो

  • 01 Feb 2023 11:17 AM (IST)

    भारतातील लोकांचे दरडोई उत्पन्न डब्बल

    भारतातील लोकांचे दरडोई उत्पन्न डब्बल

    मागच्या काही वर्षांत भारतातील लोकांचे दरडोई उत्पन्न डब्बल झाल्याचे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले आहे. त्याचबरोबर दरडोई उत्पन्न 1.97 लाख रुपये वार्षिक झाले आहे. भारतीय अर्थव्यवस्था अधिक मजबूत झाली आहे, त्याचा परिणाम लोकांच्या राहणीमानावर दिसत आहे.

  • 01 Feb 2023 11:16 AM (IST)

    Budget 2023 LIVE – पर्यटना विकासाला प्राधान्य

    पर्यटना विकासाला प्राधान्य दिलं. आम्ही मिशन मोडवर त्यावर काम केलं, असं निर्मला सीतारमण यांनी सांगितलं.

  • 01 Feb 2023 11:15 AM (IST)

    जीडीपीचा दर सुमारे 7 टक्के राहण्याचा अंदाज

    जीडीपीचा दर सुमारे 7 टक्के राहण्याचा अंदाज

    चालू आर्थिक वर्षात जीडीपीचा दर सुमारे 7 टक्के राहण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर रोजगाराच्या संधी कशा वाढवता येतील यावर सरकारचा विशेष भर आहे. भारताकडून G20 अध्यक्षपद ही एक मोठी संधी आहे.

  • 01 Feb 2023 11:14 AM (IST)

    Budget 2023 LIVE – उपाशीपोटी झोपणार नाही, याची काळजी घेतली

    कोरोनाकाळात मोफत अन्न-धान्य पुरवठा योजनेसह कोणी उपाशीपोटी झोपणार नाही, याची आम्ही काळजी घेतली असं निर्मला सीतारमण यांनी संसदेत सांगितलं.

  • 01 Feb 2023 11:12 AM (IST)

    गरीबांना 2024 पर्यंत मोफत रेशन देण्याची मोठी घोषणा

    कोरोना काळातही अर्थव्यवस्था मजबूत, देश थांबला नाही: सीतारामन

    भारतीय अर्थव्यवस्था चमकता तारा

    पीएम अन्नपूर्ण कौशल्य योजनेची सुरुवात होणार

  • 01 Feb 2023 11:10 AM (IST)

    भारतीय अर्थव्यवस्था योग्य दिशेने वाटचाल करत आहे

    निर्मला सीतारामन म्हणाल्या, जगाने भारतीय अर्थव्यवस्थेला एक चमकता तारा मानले आहे. त्यामुळे जगात भारताचा मान वाढला आहे. भारतीय अर्थव्यवस्था योग्य दिशेने वाटचाल करत आहे. त्याचबरोबर उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत आहे. कोरोनाच्या काळात कोणीही उपाशी झोपणार नाही याची आम्ही काळजी घेतली आहे. सरकारने 2 लाख कोटी रुपये खर्च करून प्रत्येक व्यक्तीला अन्नधान्य दिले. 80 कोटी लोकांना 28 महिन्यांसाठी मोफत रेशनची व्यवस्था करण्यात आली.

  • 01 Feb 2023 11:09 AM (IST)

    Budget 2023 LIVE – निर्मला सीतारमण यांनी सादर केलं बजेट

    लोकसभेच कामकाज सुरु झालय. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या आपलं पाचव बजेट सादर करतायत. संसेदत अर्थमंत्र्यांच बजेटवरील भाषण सुरु आहे. अमृतकाळातील हे पहिलं बजेट असल्याचं त्यांनी सांगितलं.

  • 01 Feb 2023 11:06 AM (IST)

    जागतिक स्तरावर भारताचं महत्त्व वाढणार

    जागतिक स्तरावर भारताचं महत्त्व वाढणार

    कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद करणार

    सर्व देशात भारताचा विकास दर अधिक

    देश वेगाने प्रगती करतोय केंद्रीय अर्थमंत्र्याकडून विश्वास व्यक्त केलाय

  • 01 Feb 2023 10:49 AM (IST)

    बजेटनंतर बोलू – खरगे

    “बजेटनंतर आम्ही रिएक्ट करु. आम्ही पक्षाकडून पत्रकार परिषद घेऊ. अंदाजावर बोलणं ठीक नाही. रिपोर्ट पाहिल्यानंतर बजट कसं असलं पाहिजे होतं. प्रत्यक्षात ते कसं आहे, त्यावर बोलूं” असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

  • 01 Feb 2023 10:40 AM (IST)

    अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात उसळी

    अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात उसळी

    शेअर बाजारात सेन्सेक्सची 540 अंकांनी उसळी

  • 01 Feb 2023 09:35 AM (IST)

    अर्थसंकल्पापूर्वी ग्राहकांना मोठा दिलासा

    घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या किंमतीत वाढ नाही

    कंपन्या दर महिन्याच्या 1 आणि 16 तारखेला दर करतात जाहीर

    मागील अर्थसंकल्पापूर्वी LPG गॅसच्या किंमतीत 100 रुपयांची झाली होती दरवाढ

    या वर्षाच्या सुरुवातीला व्यावसायिक गॅसच्या किंमतीत 25 रुपयांची दरवाढ

    मोदी सरकारच्या दोन टप्प्यात गॅस सिलिंडरचा भाव दुप्पटीपेक्षा अधिक

    गेल्या वर्षी घरगुती LPG सिलिंडरच्या भावात एकूण 153.5 रुपयांची वाढ

  • 01 Feb 2023 08:42 AM (IST)

    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण संसदेत पोहोचल्या

    सीतारामण सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर करणार

    केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी बजेटपूर्वी केली देवाची पूजा

    डॉ. भागवत कराडही संसदेकडे निघाले

  • 01 Feb 2023 08:38 AM (IST)

    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थमंत्रालयात

    अर्थमंत्रालयात पोहचल्या केंद्रीय अर्थमंत्री

    आज सादर करणार देशाचा अर्थसंकल्प

    महागाईच्या झळा होतील का कमी

    अर्थसंकल्पाकडून सर्वांनाच मोठ्या अपेक्षा

    अर्थमंत्र्यांच्या पेटाऱ्यातून कोणाला मिळेल गिफ्ट

  • 01 Feb 2023 06:56 AM (IST)

    बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी काय?; राज्यातील जनतेचं लक्ष

    मोदी सरकार आज या सरकारचा शेवटचा बजेट सादर करणार आहे

    त्यामुळे या बजेटमधून महाराष्ट्रासाठी काय मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे

    राज्यात झालेलं सत्तांतर, आमदार अपात्रतेचा कोर्टात सुरू असलेला वाद आणि सी-व्होटरचा नुकताच आलेला सर्व्हे,

    या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जनतेला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी बजेटमधून महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता

  • 01 Feb 2023 06:52 AM (IST)

    मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बजेटमधून घोषणांचा वर्षाव होण्याची शक्यता

    मुंबई महापालिकेच्या कधीही निवडणुका होण्याची शक्यता आहे

    त्यामुळे मुंबईसाठी आजच्या बजेटमधून काही महत्त्वाच्या घोषणा केल्या जाऊ शकतात

    मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलबाबत काही घोषणा होण्याची शक्यता

  • 01 Feb 2023 06:47 AM (IST)

    अर्थसंकल्पातून रोजगार वाढवण्यावर भर दिला जाऊ शकतो

    नवा व्यवसाय करण्यासाठी कर्ज आणि सवलतींची घोषणा केली जाऊ शकते.

    पीएलआय स्कीमचा विस्तार केला जाऊ शकतो

    एसएमई सेक्टरमध्ये गुंतवणूक वाढवण्याचे मोठे निर्णय होऊ शकतात

    रोजगार वाढवण्यावर अधिक भर दिला जाऊ शकतो

  • 01 Feb 2023 06:45 AM (IST)

    अर्थसंकल्पात कररचनेत बदल होण्याची शक्यता

    अर्थसंकल्पात 5 लाख रुपयांपर्यंतची सूट दिली जाऊ शकते.

    सध्या 2.5 लाख रुपयांपर्यंत कर सवलत आहे

    सध्या 2.5 लाख ते 5 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्के कर लागतो

  • 01 Feb 2023 06:35 AM (IST)

    आज केंद्रीय अर्थसंकल्प, निर्मला सीतारामण सादर करणार 5 वा अर्थसंकल्प

    सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प

    पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर होणार अर्थसंकल्प

    त्यामुळे आजच्या अर्थसंकल्पाकडे देशवासियांचं लक्ष

Published On - Feb 01,2023 6:22 AM

Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.