बजट 2024-25 हायलाईट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील अर्थसंकल्प आज सादर केला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पाबाबत देशातील जनतेच्या केंद्र सरकारकडे प्रचंड अपेक्षा आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही नोकरदार आणि करदात्यांना मोदी सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आयकर रचनेत बदल होईल, करात सवलत मिळेल, नवीन कर रचनेतही सूट मिळेल, अशी आशा नोकरदार वर्गाला आहे. भारत हा जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था असलेला देश आहे. येत्या काळात भारत तिसरी जागतिक अर्थव्यवस्था होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच यंदाच्या अर्थसंकल्पात त्याचाही रोड मॅप मांडला जाण्याचे संकेत आहेत.
यंदाच्या बजेटमध्ये नोकरदार वर्गासह, कृषी, महिला, आरोग्य आणि पायाभूत सुविधांवर अधिक खर्च केला जाण्याची शक्यता आहे. मध्यम वर्ग, सामान्य माणूस, कार्पोरेट, शेतकरी, सेवा क्षेत्र, कृषी आणि रेल्वे सेवेवर बजेटमध्ये अधिक भर दिला जाऊ शकतो. या सर्व क्षेत्रावर बजेटमधून काय काय दिलं जाणार? बजेटमध्ये कुणासाठी काय दिलंय? कोणत्या नव्या घोषणा करण्यात आल्या? काय स्वस्त झालंय आणि काय महाग झालंय? याची प्रत्येक अपडेट इथे देत आहोत. त्यामुळे या पेजला ट्रॅक करत राहा.
-
Union Budget 2024 Live : नव्या कर प्रणालीत बदल
Union Budget 2024 Live : नव्या कर प्रणालीत बदल 0 ते 3 लाख : कर नाही 3 ते 7 लाख : 5 टक्के कर 7 ते 10 लाख : 10 टक्के 10 ते 15 लाख : 15 टक्के 15 ते 20 लाखांहून अधिक : 20 टक्के
-
Union Budget 2024 Live : TDS भरला नाही तर आता गुन्हा दाखल होणार नाही
इन्कम टॅक्स सोपा करण्यावर भर TDS भरला नाही तर आता गुन्हा दाखल होणार नाही टॅक्स संदर्भातील वाद ६ महिन्यांमध्ये सोडवण्यासाठी प्रयत्न
-
Union Budget 2024 Live : या वस्तू होणार स्वस्त?
सोने, चांदी, प्लॅटिनमचे दागिने मोबाईल फोन मोबाईल चार्जर मासे आणि मस्त्य उत्पादने इलेक्ट्रिक वाहने तांब्यापासून बनवलेल्या वस्तू चामड्यापासून बनवलेल्या वस्तू सौरऊर्जा पॅनल
-
Union Budget 2024 Live : गरीब लोकांना हक्काचे घर मिळण्यासाठी प्रयत्न केले जाणार
पीएम आवास योजनेअंतर्गत (शहरी भाग) १ कोटी मध्यमवर्ग गरीब लोकांना हक्काचे घर मिळावे यासाठी प्रयत्न केले जाणार त्यासाठी १० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार
-
Union Budget 2024 Live : 30 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या विकासासाठी प्रयत्न केले जाणार
३० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या १४ शहरांच्या विकासासाठी प्रयत्न केला जाणार आहे. या शहरांच्या विकासासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे.
-
Union Budget 2024 Live : पंतप्रधान शहरी गृहनिर्माण योजनेसाठी 10 लाख कोटींची तरतूद
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 3 कोटी नवीन घरे बांधली जाणार आहेत पीएम शहरी गृहनिर्माण योजनेसाठी 10 लाख कोटींची घोषणा, रेंटल हाऊसिंगचा प्रचार आणि नियमन करण्यासाठी नियम बनवेल. मुद्रांक शुल्क कमी करणाऱ्या राज्यांना प्रोत्साहन दिले जाईल
-
Union Budget 2024 Live : देशातील 1 कोटी तरुणांना इंटर्नशीप देण्यात येणार
देशातील 1 कोटी तरुणांना इंटर्नशीप देण्यात येणार आहे. टॉपच्या कंपन्यात ही इंटर्नशीप दिली जाईल. पुढच्या पाच वर्षांत 1 कोटी तरुणांना इंटर्नशीप दिली जाणार आहे. ही इंटर्नशीप 12 महिन्यांच्या कालावधीसाठी असणार आहे. इंटर्नशीपच्या काळात तरुणांना दर महिना 5 हजार रुपये दिले जाणार आहेत. तसेच वन टाईम असिस्टन्स म्हणून 6 हजार रुपये दिले जाणार
-
Union Budget 2024 Live : मुद्रा योजनेअंतर्गत २० लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाणार
लघु आणि सूक्ष्म उद्योगांच्या विकासासाठी मदत केली जाणार, मुद्रा योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जात वाढ, मुद्रा योजनेअंतर्गत २० लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाणार, याआधीचे कर्ज यशस्वीरित्या फेडलेल्यांना दिले जाणार २० लाखांपर्यंत कर्ज दिले जाणार
-
Union Budget 2024 Live : महिला आणि मुलींसाठी 3 लाख कोटी रुपये
महिला आणि मुलींना लाभ देणाऱ्या योजनांसाठी 3 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या 100 हून अधिक शाखा ईशान्येकडील भागात स्थापन केल्या जातील.
-
Union Budget 2024 Live : ग्रामीण विकासासाठी 2.66 लाख कोटी रुपयांची तरतूद
ग्रामीण विकासासाठी 2.66 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे - निर्मला सीतारमण