Budget 2023| सुखसमृद्धी भरभराटीचं प्रतीक, निर्मला सीतारमण यांनी आज नेसलेल्या साडीबद्दल वाचलंत?

रेड टेंपल आणि कांजीवरम साडीचं एक वेगळंच वैशिष्ट्य आहे. सुरेख कलाकुसर आणि तलम कापडानुसार ती तयार केली जाते.

Budget 2023| सुखसमृद्धी भरभराटीचं प्रतीक, निर्मला सीतारमण यांनी आज नेसलेल्या साडीबद्दल वाचलंत?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 01, 2023 | 12:33 PM

नवी दिल्लीः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांनी कारकीर्दीतला पाचवा अर्थसंकल्प (Budget) सादर केला. आज सकाळीच मोठ्या आत्मविश्वासाने त्यांनी संसद भवनात प्रवेश केला. यावेळी त्यांनी लाल रंगाची साडी (Red Saree) नेसली होती. काळा आणि सोनेरी जरीकाठाची ही साडी अनेकांचं ल वेधून घेणारी ठरली. भारतीय परंपरा आणि हस्तकलेविषयी त्यांचं प्रेम यातून दिसून आलं. निर्मला सीतारमण यांनी नेसलेली ही साडी सुख-समृद्धीचं प्रतीक असल्याचं भारतीय परंपरेत म्हटलं आहे. त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नेसलेली ही साडी आज चर्चेचा विषय ठरली आहे.

साडीचा प्रकार कोणता?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यांनी नेसलेली साडी रेड टेंपल साडी म्हणून प्रसिद्ध आहे. कांचीपुरम साड्यांपैकी हा एक प्रकार आहे.  दक्षिण भारतातील लोकप्रिय साड्यांमध्ये हा प्रकार गणला जातो.

साडीचा उगम कुठे?

निर्मला सीतारमण यांच्यामुळे चर्चेत आलेली रेड टेंपल साडी ही दक्षिण भारतातील आहे. तमिळनाडूत तिचा उगम झाल्याचं म्हटलं जातं.  या साडीला कांजीवरम किंवा कांचीपुरम असंही म्हटलं जातं.  कांचीपुरम शहर सिल्क साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथील रेड टेंपल साडीला सर्वाधिक मागणी आहे. ही साडी कधीही आउट फॅशन होत नाही.

लाल रंगाचं वैशिष्ट्य काय?

रेड टेंपल साडी ही मुळातच सुख-समृद्धीचं प्रतीक आहे. हिंदु धर्मात लाल रंगाला महत्त्व आहे. शक्ती, मजबुती, कणखरपणा, सौभाग्याशी लाल रंगाचं नातं जोडलेलं आहे. लग्नात आणि विशेष प्रसंगांना लाल रंगाला जास्त महत्त्वा आहे. दुष्ट शक्तींचा नाश होतो तर हा रंग परिधान करणाऱ्यासाठी शुभ मानलं जातं..

कशी तयार होते ही साडी?

रेड टेंपल साडी प्युअर रेशमी धाग्यांपासून बनवली जाते. या साड्यांच्या विणकामासाठी दक्षिण भारत आणि गुजरातचा जर आणि रेशमी धागे वापरले जातात. अनेक साड्यांसाठी खास ओरिजनल रेशमी धागे वापरले जाता. यामुळे अधिक मऊपणा, चमक आणि टीकाऊपणा वाढतो.

या साड्यांमध्ये फुलांच्या डिझाइनसह इतर रंगांचा सुरेख वापर केला जातो. याचे फॅब्रिकदेखील हलके आणि ब्रेथेबल अर्थात त्यातून सहजपणे हवा आरपार जाऊ शकते. त्यामुळे उन्हाळ्यात ही साडी नेसणं अत्यंत आरामदायी होतं.

अत्यंत कुशल कारागीर ही साडी विणतात. सीडीची बॉर्डर वेगळी विणली जाते. त्यामुळे अशा प्रकारची साडी विनण्यासाठी कित्येक दिवस लागतात.

खास डिझाइन, सोन्या-चांदीचा जर

रेड टेंपल आणि कांजीवरम साडीचं एक वेगळंच वैशिष्ट्य आहे. सुरेख कलाकुसर आणि तलम कापडानुसार ती तयार केली जाते. जरीकामासोबतच सुंदर बॉर्डर, पदर आणि ब्लाऊज हेदेखील या साडीचं आकर्षण असतं. यावर सोन्याच्या जरीचा वापर केला जातो.

या साडीवरील डिझाइन हिंदू पौराणिक कथांवरून प्रेरीत असते. त्यामुळे ही साडी सुख-समृद्धी सौभाग्याचं प्रतीक असते, असं मानलं जातं.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.