Union Budget 2023 : ‘बजेटमध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला….’, महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्याचं परखड भाष्य
Union Budget 2023 : अर्थसंकल्पाकडे शेतकरी, उद्योजक, गृहिणी आणि नोकरदार या सर्वांचेच डोळे लागले होते. बजेटमध्ये आपल्यासाठी काही घोषणा होतील. सवलत किंवा लाभ मिळतील, याकडे लक्ष होतं.
Union Budget 2023 : आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला. देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पाचवा आणि मोदी 2.0 सरकारमधील शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाकडे शेतकरी, उद्योजक, गृहिणी आणि नोकरदार या सर्वांचेच डोळे लागले होते. बजेटमध्ये आपल्यासाठी काही घोषणा होतील. सवलत किंवा लाभ मिळतील, याकडे लक्ष होतं. बजेट सादर झाल्यानंतर अनेकांनी संमिश्र भावना व्यक्त केल्या आहेत. विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेस पक्षाने या बजेटवर सडकून टीका केली. विदर्भातील काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बजेटचा समाचार घेताना त्रुटींवर बोट ठेवलं.
ग्रामीण अर्थव्यवस्था मजबुतीसाठी काय?
“या बजेटमध्ये सामान्य माणूस, गरीब माणूस हद्दपार झालाय. ग्रामीण अर्थव्यवस्था मजबुतीसाठी या अर्थसंकल्पात काही नाहीय. ग्रामीण भागतील लोढे शहरांकडे जातातय़त त्याला थोपवण्यासाठी अर्थसंकल्पात काहीच नाहीय. ग्रामीण भागात रोजगार उपलब्धतेविषयी अर्थव्यवस्थेत काही नाहीय” अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
ओबीसींसाठी काही नाही
“या अर्थसंकल्पात ओबीसींसाठी काही दिसल नाही. ओबीसी देशातील मोठा समाज असून मुख्य कणा आहे. त्यांच्यासाठी या अर्थसंकल्पात काही नाहीय. आदिवासी योजनांना कात्री लावल्याच दिसतय” अशी टीका विजय वेडट्टीवार यांनी केली. पंतप्रधान ओबीसींच नेतृत्व करतात. पण बजेटमध्ये त्यांच्यासाठी कुठलीही ठोस तरतूद नाही, असं वडेट्टीवार म्हणाले. “केंद्रीय मंत्रिमंडळात 23 ओबीसी मंत्री आहेत. पण ओबीसींसाठी साध्या 23 योजनाही नाहीत” असे वडेट्टीवार म्हणाले. या अर्थसंकल्पात मोजक्या उद्योगपतींसाठी पायघडल्या घातल्याचा आरोप त्यांनी केला.
निवडणूक लढणं, जिंकण यासाठी अर्थसंकल्प
दुष्काळासाठी मदत जाहीर करताना दुजाभाव केल्याचा आरोपही वडेट्टीवारांनी केला. “कर्नाटकात निवडणूक आहे, तिथे 5300 कोटी दिलेत. महाराष्ट्र मागच्यावर्षी दुष्काळ, अतिवृष्टीने होरपळून निघाला, पण काय मदत केली? निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हे सर्व केलं जातय. हे सरकार निवडणूक लढणं, जिंकण यासाठी अर्थसंकल्प तयार करतं” अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला भोपळा
“या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला भोपळा. मिळाला. पुढच्यावर्षी निवडणूक आहे, त्यावेळी भोपळ्यापेक्षा मोठी वस्तू देतील. 100 पैकी 35 मार्क द्यावे” असा हा अर्थसंकल्प नाही अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.