Union Budget | ऑनलाईन टॅक्स रिटर्न भरताना येत आहेत या प्रमुख अडचणी, टॅक्स भरल्यानंतर ही गोष्ट करायला अजिबात विसरू नका
अनेकदा ऑनलाईन टॅक्स रिटर्न फाईल भरताना नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. 5 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या नागरिकांना ITR भरणे अनिवार्य आहे.
मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठ्या देशाचा उद्या अर्थसंकल्प सादर होत आहे. 1 फेब्रुवारी 2023 रोजी देशाचा अर्थसंकल्प हा देशासमोर सादर केला जाईल. या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशवासियांच्या नजरा लागल्या आहेत. काय स्वस्त होणार आणि काय महाग होणार हे सर्व उद्या कळणार आहे. देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. गेल्या काही वर्षांपासून महागाई सातत्याने वाढत आहे. या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य जनतेला काही दिलासा मिळतो का हे उद्या कळेल. विशेष बाब म्हणजे निर्मला सीतारमण या त्यांच्या कार्यकाळातील पाचवा अर्थसंकल्प उद्या सादर करणार आहेत. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, आपले वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रूपयांपेक्षा अधिक असेल तर आपल्याला आयकर म्हणजे टॅक्स भरावा लागतो. 5 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या नागरिकांना ITR भरणे अनिवार्य आहे.
अनेकदा ऑनलाईन टॅक्स रिटर्न फाईल भरताना नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. 5 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या नागरिकांना ITR भरणे अनिवार्य आहे. मात्र, ITR भरताना मोठ्या समस्या निर्माण होतात. यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो.
ऑनलाईन टॅक्स रिटर्न फाईल भरताना अनेक वेळा इंटरनेट काहीही कारण नसताना स्लो होते. यामुळे ITR भरताना नागरिकांना जास्त वेळ लागतो. जरीही तुमचे इंटरनेट फास्ट असले तरीही साईटच्या काही समस्यांमुळे इंटरनेट स्लो होते. यामुळे टॅक्स रिटर्न फाईल भरण्यास जास्त वेळ जातो.
ITR भरताना संपूर्ण फाॅर्म भरल्यानंतर अनेकदा अचानकपणे साईट हॅंग होते. यामुळे नागरिकाने भरलेले पूर्ण फाॅर्म गायब होतो आणि परत फाॅर्म भरण्याची वेळ येते. बऱ्याच वेळा ऑनलाईन टॅक्स रिटर्न फाईल भरताना साईट हॅंग झाल्याच्या घटना घडतात. परत परत फाॅर्म भरायला लागतो.
ऑनलाईन टॅक्स रिटर्न फाॅर्म भरताना अनेक वेळा नेमक्या कोणत्या सेशनमध्ये फाॅर्म भरायचा हे नागरिकांना कळत नाही. नागरिक फाॅर्म भरतात आणि शेवटी तो फाॅर्म समिट होत नाही. आपला फाॅर्म का समिट होत नाही हे नागरिकांना कळत नाही. ही एक ऑनलाईन टॅक्स रिटर्न भरताना मोठी समस्या आहे.
आता टॅक्स रिटर्न ऑनलाइनही भरता येतो. म्हणजेच त्याचे ई फायलिंग करता येते. तुम्ही कुठूनही म्हणजे घर किंवा ऑफिसमधूनही इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकता. आयकर भरल्यानंतर, प्राप्तिकर रिटर्न पडताळणी फॉर्म देखील डाउनलोड करा. हा फॉर्म डाउनलोड केला जाऊ शकतो.