Union Budget : सर्वसामान्यांना झटका? बजेट नंतर या 35 वस्तूंचे भाव बदलणार
Union Budget : या बजेटमध्ये या वस्तू होऊ शकतात स्वस्त, तर या वस्तू होतील महाग
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) आता थोड्याच वेळात देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. आत्मनिर्भर भारत मोहिमेला बळ देण्यासाठी या बजेटमध्ये (Union Budget 2023) आयात करण्यात येणाऱ्या अनेक वस्तूंवर सीमा शुल्कात (Custom Duty Hike) मोठी वाढ करण्याची घोषणा करु शकते. केंद्र सरकार मेक इन इंडियासाठी विशेष प्रयत्न करत आहे. त्यामुळे या दोन योजनांसाठी आयात होणाऱ्या वस्तूंवर शुल्क वाढू शकते. त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारावर दिसून येईल. अनेक वस्तू महाग होण्याची शक्यता आहे. एकूण 35 वस्तूंवर आयात शुल्क वाढल्याचा परिणाम दिसू शकतो. यामध्ये खासगी जेट, हेलिकॉप्टर, इलेक्ट्रॉनिक सामान, प्लॉस्टिक वस्तू, ज्वेलरी, हार्ड ग्लास वस्तू, विटामिन यासारख्या पदार्थांचा समावेश आहे.
केंद्र सरकारने ज्या सामानांवर आयात शुल्क वाढविण्याची योजना तयार केली आहे. त्यात विविध मंत्रालयातंर्गत येणाऱ्या वस्तूंचा समावेश आहे. या यादीचा पडताळा घेतल्यानंतर केंद्र सरकारने एकूण 35 वस्तूंची यादी तयार केली आहे. त्यावर आयात शुल्क वाढणार आहे.
या वस्तू भारतात तयार करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी केंद्र सरकारने मोठी योजना तयार केली आहे. त्यामुळे बाहेरील देशातून आयात होणाऱ्या वस्तू महाग करण्यासाठी त्यावर आयात शुल्क वाढविण्यात येणार आहे. डिसेंबर महिन्यात वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सर्वच विभागाकडून या सामानांची यादी मागवली होती.
केंद्र सरकार या चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट भरुन काढण्यावर भर देणार आहे. जुलै-सप्टेंबर या तिमाहीतील चालू खात्यातील तूट 9 महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर 4.4 टक्के झाला होता. ही वित्तीय तूट कमी करण्यासाठी केंद्र सरकार भारतातच वस्तू निर्मितीवर जोर देत आहे. या प्रयत्नांना यश आले तर सध्याची वित्तीय तूट देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या 3.2 ते 3.4 टक्के राहू शकते.
विविध क्षेत्रात बाहेर देशातून आयात होणाऱ्या वस्तूंचे प्रमाण कमी करण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच या वस्तू भारतातच तयार होण्यासाठी मोठा प्रयत्न करण्यात येत आहे. क्वालिटी प्रोडक्ट्ससाठी मोठी गंगाजळी बाहेर जाण्यापेक्षा, दर्जेदार वस्तू भारतातच तयार करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी आयात शुल्क वाढविण्यात येणार आहे.
2014 मध्ये केंद्र सरकारने मेक इन इंडिया योजनेला बळ देण्यासाठी आयात शुल्क वाढविले होते. त्यामुळे ज्वेलरी, छत्री, इअरफोन यासारख्या वस्तू महागल्या होत्या. पण देशातंर्गत या वस्तूंचे उत्पादन वाढल्यानंतर या वस्तूंचे दाम कमी झाले होते. आता 35 वस्तूंवरील आयात शुल्क वाढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वस्तू महाग होतील. पण भारतात त्यांचे उत्पादन सुरु झाल्यानंतर या वस्तू स्वस्त होतील.
बजेट 2023 साठी खालील लिंकवर क्लिक करा
Budget 2023 LIVE : अर्थसंकल्पाच्या पेजवर जाण्यासाठी क्लिक करा