LIC ला दुहेरी फटका, आधी अदानी आता अर्थसंकल्पानंतर घसरण

एलआयसीने अदानी समूहाच्या पाच कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. यामध्ये 1 ते 9 टक्क्यांपर्यंतची हिस्सेदारी आहे. अदानी समूहाचे शेअर घसरल्याचा फटका एलआयसीला बसला.

LIC ला दुहेरी फटका, आधी अदानी आता अर्थसंकल्पानंतर घसरण
Follow us
| Updated on: Feb 01, 2023 | 3:45 PM

नवी दिल्ली : भारताची सर्वात मोठी जीवन विमा कंपनी एलआयसीला (LIC) आठवड्याभरात दुसऱ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. चार दिवसांपुर्वी गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या कंपन्यांसदर्भात हिंडनबर्गने (Hindenburg) केलेल्या एका अहवालाचा LIC ला हादरा दिला होता. एलआयसीने अदानी समूहाच्या पाच कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. यामध्ये 1 ते 9 टक्क्यांपर्यंतची हिस्सेदारी आहे. अदानी समूहाचे शेअर घसरल्याचा फटका एलआयसीला बसला. आता अर्थमंत्र्यांनी केलेल्या एक तरतुदीनंतर एलआयसीचे शेअर बुधवारी घसरले.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात नवीन कर प्रणालीला (new tax regime) प्रोत्साहन देण्यासाठी अनेक घोषणा केल्या आहेत. त्यात डिडक्शंसचा फायदा घेण्यास मंजुरी दिली नाही. आता मोठ्या विमा रक्कमेवर कपातीचा फायदा मिळणार नाही. आयकरातील ही सुट बंद होणार असल्याने त्याचा फटका एलआयसीसह सर्वच विमा कंपन्यांचा शेअरला बसला.

का झाली घसरण

हे सुद्धा वाचा

एलआयसीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. एलआयसीचे शेअर 8.30 टक्क्यांनी घसरुन 601 रुपयांवर आला. दुपारी एसबीआय लाइफ इन्शुरन्सचे शेअर्स 10 टक्क्यांनी घसरून 1,097.95 रुपयांवर, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ 9.88 टक्क्यांनी घसरून 407.50 रुपयांवर आणि एचडीएफसी लाइफ इन्शुरन्सचे शेअर 11 टक्क्यांनी घसरून 515 रुपयांवर आले.

व्यवसायावर होणार परिणाम

नवीन कर प्रणालीला प्रोत्साहन देण्याचा सरकारच्या निर्णयाचा परिणाम विमा कंपन्यांच्या व्यवसायावर होणार आहे. अनेक करदाते केवळ कलम 80C अंतर्गत कपातीचा लाभ घेण्यासाठी विमा पॉलिसी खरेदी करतात.

हिंडेनबर्गचा परिणाम

हिंडेनबर्ग या अमेरिकेतल्या कंपनीनं एक रिपोर्ट जाहीर केला. त्या रिपोर्टमध्ये अदानी समुहानं शेअर बाजार हाताळून स्वतःच्या संपत्ती फुगवल्याचा दावा केला होता. हा रिपोर्ट आल्यानंतर अदानी यांच्या अनेक कंपन्यांचे शेअर गडगडले. हे सारे आरोप खोटे असून हिंडेनबर्गचा रिपोर्ट अर्धवट आणि खोट्या माहितीवर आधारित असल्याचा दावा अदानी समुहानं केलाय. परंतु एलआयसीची अदानी समुहात गुंतवणूक असल्यामुळे एलआयसीचे शेअरही घसरले.

एलआयसीचा दावा

अदानींचे शेअर कोसळल्यानंतर एकट्या एलआयसीलाच सुमारे 16 हजार कोटींचा फटका बसल्याचा दावा करण्यात आलाय. त्यावर एलआयसीनं स्पष्टीकरण देताना म्हटलंय की, अदानींच्या कंपन्यांमध्ये एलआयसीनं एकूण 30 हजार 127 कोटींची गुंतवणूक केलीय. जर अदानींच्या शेअर किमतीप्रमाणे त्यांची आजही विक्री केली तर ती रक्कम 56 हजार 142 कोटी होईल. म्हणजे एलआयसीनं गुंतवणूक केलेल्या रक्कमेपेक्षा 26 हजार 16 कोटी हा नफाच असेल. असं एलआयसीनं म्हटलंय.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.