Youth Budget 2024 : 10 लाखांपर्यंत कर्ज ते 30 लाख नोकऱ्यांपर्यंत, नवीन पिढीला बजेटमध्ये काय लागली लॉटरी, घ्या जाणून
New Generation Budget 2024 : शैक्षणिक संस्थांमध्ये 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यापासून ते मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये 30 लाख नौकऱ्यांपर्यंत अनेक घोषणांचा पाऊस अर्थमंत्र्यांनी केला. या बजेटमध्ये शिक्षण क्षेत्रासाठी असा फायदा होणार आहे.
मोदी सरकारच्या 3.0 पहिल्या पूर्ण बजेटमध्ये शिक्षण क्षेत्रासाठी मोठी तरतूद करण्यात आली. अर्थमंत्री निर्मला सीतारमण या बजेटचे वाचन करत आहेत. त्यांनी शिक्षण क्षेत्रासाठी अनेक घोषणांचा पाऊस पाडला आहे. या घोषणांमुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल. त्यांनी विविध चार योजनांची घोषणा केली. त्याआधारे विद्यार्थी, कर्मचारी, महिला कर्मचारी या सर्वांना कुठे ना कुठे फायदा होईल. देशांतर्गत शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी शिक्षण घेण्यासाठी 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याची मोठी घोषणा त्यांनी केली.
10 लाखांचे कर्ज
जे विद्यार्थी कोणत्याही सरकारी योजनांचा फायदा घेत नसतील. त्यांना देशातंर्गत शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षणासाठी 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. हे कर्ज 3 टक्के व्याजदरावर देण्यात येईल. यातंर्गत विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी एकूण रक्कम 3 टक्के व्याजदराने कर्ज देण्यात येईल. ई-व्हाऊचरच्या रुपाने थेट ही रक्कम देण्यात येईल.
उत्पादन क्षेत्रात नवीन नोकऱ्या
देशातंर्गत उत्पादन क्षेत्रात नवीन नौकऱ्या वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. जवळपास 30 लाख नोकऱ्या या क्षेत्रातून निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना, उमेदवारांना औद्योगिक प्रशिक्षण, कौशल्य विकास कार्यक्रमातंर्गत प्रशिक्षण देण्यात येईल. या क्षेत्रातील प्रशिक्षण संस्थांना पण अद्ययावत करण्यावर भर देण्यात येणार आहे.
महिलांचा सहभाग वाढविणार
अनेक कार्यक्षेत्रात महिलांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी पाऊल टाकलं येण्यात येणार आहे. काही कंपन्यांसोबत काम करणाऱ्या महिलांसाठी निवासगृह सुरु करण्यात येणार आहे. नवीन नोकऱ्या तयार करणाऱ्यावर अधिक भर देण्यात येणार आहे. खासगी कार्यक्षेत्रात महिलांचा सहभाग वाढविण्यावर सरकार जोर देत आहे.
कमी पगार असणाऱ्यांना सरकारची मदत
बजेटमध्ये ज्यांचा पगार 1 लाख रुपयांपेक्षा कमी असेल, त्यांना 3 हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. सरकार त्यांना मदत देणार आहे. EPFO अंतर्गत नोंदणी करणाऱ्या तरुणांना ही मदत करण्यात येणार आहे. यामुळे सर्वच क्षेत्रात नोकऱ्या वाढण्यासाठी मदत होण्याची आशा आहे.
बजेटमध्ये तरुणांना लॉटरी, काय केली घोषणा अर्थमंत्र्यांनी
1.पहिल्यांदा नोकरी मिळविणाऱ्यांना दोन वर्षांपर्यंत प्रत्येक महिन्याला 300 रुपये अतिरिक्त पीएफची रक्कम सरकार देईल.
2.तर देशातंर्गत शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्यांना सरकार 10 लाखांपर्यंतचे कर्ज देईल.
3.कौशल्य विकास कामासाठी सरकार 30 लाख तरुणांना प्रशिक्षण देईल.
4.त्यासाठी बजेटमध्ये 2 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा
5.केंद्र सरकार 4.1 कोटी तरुणांना रोजगार देण्यासाठी पाच योजना घेऊन येणार
6.त्यासाठी येत्या 5 वर्षात दोन लाख कोटी रुपये खर्च करणार
7.येत्या पाच वर्षांत 1 कोटी तरुणांना सरकार इंटर्नशिप देणार. एका वर्षाच्या