Share Market : एकाचे केले 61 लाख! आता बोनस शेअरचे गिफ्ट
Share Market : तीन वर्षांपूर्वी या शेअरमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज ही रक्कम 61 लाख रुपये झाली असती. आता ही कंपनी गुंतवणूकदारांना बोनस शेअरचे गिफ्ट पण देणार आहे. टायर रिसायकल करणाऱ्या या कंपनीने ही कमाल केली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही.
नवी दिल्ली | 24 सप्टेंबर 2023 : शेअर बाजारात गुंतवणूकदारांना तीनच वर्षात या शेअरने 6000 टक्क्यांचा परतावा दिला आहे. टिन्ना रबर अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या (Tinna Rubber Ltd) शेअरवर तुम्हाला पण नशीब आजमावता येऊ शकतं. भारताची सर्वात मोठी इंटिग्रेटेड वेस्ट टायर रिसायकल कंपनी Tinna Rubber ने शेअर बाजाराला (Share Market) याविषयीची माहिती दिली आहे. या कंपनीच्या संचालक मंडळाने 85.64 लाख इक्विटी शेअरच्या वाटपाला मंजूरी दिली आहे. कंपनी शेअरधारकांना बोनस शेअर देईल. टिन्ना रबरने गुंतवणूकदारांना 1:1 या प्रमाणात बोनस देण्याचे जाहीर केले आहे.
5 दिवसात असा दिला परतावा
गेल्या पाच दिवसांत टिन्ना रबर कंपनीने शेअरधारकांना प्रत्येक शेअरमागे 50 रुपयांचा मल्टिबॅगर रिटर्न दिला आहे. एका महिन्यात टिन्ना रबरचा शेअर 23 टक्क्यांनी मजबूत झाला. तर गेल्या 6 महिन्यात टिन्ना रबरचा शेअरने मोटी धमाल केली. हा शेअर 182 रुपयांहून 482 रुपयांच्या टप्प्यावर पोहचला. या शेअरने या कालावधीत 160 टक्क्यांचा बंपर रिटर्न दिला.
कोरोना काळात मोठी पडझड
यावर्षी 31 मार्च रोजी Tinna रबरचा शेअर 173 रुपयांच्या निच्चांकी स्तरावर व्यापार करत होता. कोरोना काळात तर हा शेअर एकदम खाली आला होता. 30 एप्रिल 2020 रोजी हा शेअर 8 रुपयांच्या निच्चांकी स्तरावर घसरला होता. त्यानंतर या शेअरने मोठी झेप घेतली. हा शेअर 60 पटीने वधारला. म्हणजे तीन वर्षांपूर्वी या शेअरमध्ये जर एखाद्याने एक लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 61 लाख रुपये झाले असते. हा शेअर सध्या 481 रुपयांच्या घरात आहे.
या शेअरची धमाल
सरकारी बँकेच्या या शेअरने धमाल उडवली आहे. हा शेअर शुक्रवारच्या व्यापारी सत्रात 8.40 टक्क्यांनी वधारला. या शेअरची किंमत 50.86 रुपये आहे. तो या किंमतीवर बंद झाला. हा मल्टिबॅगर स्टॉक गेल्या 6 महिन्यात 111.92 टक्के चढला. या तेजीच्या सत्रामुळे या सरकारी बँकेचे (PSU Bank) बाजारातील मूल्य वाढले. मार्केट कॅप 44,151.26 कोटी रुपये झाले.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.