Multibagger Stock : अरे हा तर परीस! 1 लाखाचे झाले 36 कोटी

Multibagger Stock : हा शेअर नाही तर परीस आहे. ज्या गुंतवणूकदाराच्या हाती हा लागला, तो करोडपती झाला. उन्हाळ्यात आठवण येणाऱ्या या कंपनीने असे काही मालामाल केले की..

Multibagger Stock : अरे हा तर परीस! 1 लाखाचे झाले 36 कोटी
Follow us
| Updated on: Jun 24, 2023 | 3:24 PM

नवी दिल्ली : शेअर बाजारात (Share Market) जे गुंतवणूकदार धीर ठेवतात, तेच कमाई करतात. दीर्घकालीन गुंतवणुकीत शेअर बाजाराने आतापर्यंत अनेकांना भरभरुन दिले आहे. काही शेअर्सने तर अनेक वर्षाची मैत्री कायम ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांचे तर नशीबच पालून टाकले. हे गुंतवणूकदार अवघ्या 10 ते 20 वर्षांत करोडपती (Crorepati) झाले. पण त्यासाठी अर्थातच योग्य स्टॉकची निवड आणि लागलीच गुंतवणूक न काढणे हा मंत्र जपावा लागतो. धरसोड करणाऱ्या गुंतवणूकदारांना इन्ट्रा डे मधून कमाई होते. पण ती लॉटरी असते. जोरदार फंडामेटल असणाऱ्या कंपन्या परीसासारख्या असतात. आता या कंपनीने 26721 टक्के परतावा दिला.

कोणती आहे कंपनी या मल्टिबॅगर स्टॉकने (Multibagger Stock)एक लाखांचे 36 कोटी रुपये झाले. तर ही कंपनी सिम्फनी आहे. सिम्फनीच्या (Symphony Share Price) शेअरने गुंतवणूकदारांना थंडावाच दिला नाही तर जबरदस्त परतावा पण दिला. 20 वर्षांत हा परतावा मिळाला आहे. त्यामुळे अनेकांना चारचाकी, घराचे स्वप्न साकारता आले आहे.

25 पैशांहून आगेकूच सध्या या शेअरमध्ये विक्रीचे सत्र सुरु आहे. मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. 2003 मध्ये या शेअरची किंमत केवळ 25 पैसे होती. आज एका शेअरची किंमत 900 रुपये झाली आहे. NSE वर शुक्रवारी या शेअरमध्ये 1.90 टक्क्यांची पडझड झाली होती.

हे सुद्धा वाचा

असी घेतली उसळी वर्ष 2023 मध्ये या सहा महिन्यात या शेअरने मोठा पल्ला गाठला नाही. उलट शेअरमध्ये तीन टक्क्यांची घसरण आली आहे. पण गेल्या वर्षभराचा विचार करता या शेअरने गुंतवणूकदारांना 7 टक्क्यांचा नफा मिळवून दिला. सिम्फनीचा शेअर 52 आठवड्यांचा उच्चांक 1,219.00 रुपये तर 52 आठवड्यांचा निच्चांक 820.60 रुपये आहे.

2003 ने उघडले असते नशीब या शेअरने अनेक वर्षांपासून गुंतवणूकदारांना बंपर रिटर्न दिला आहे. या कंपनीचा शेअर 3 जून 2003 रोजी बीएसई वर 25 पैशांना मिळत होता. शुक्रवारी, आठवड्याच्या शेवटच्या व्यापारी सत्रात 23 जून 2023 हा शेअर 900 रुपयांवर बंद झाला. एखाद्या गुंतवणूकदारांने 20 वर्षांपूर्वी या कंपनीत एक लाख रुपये गुंतवले असते तर आज या गुंतवणुकीचे मूल्य 36 कोटी रुपयांवर पोहचले असते. या शेअरने गेल्या 15 वर्षांत 26721 टक्क्यांचा परतावा दिला आहे. 15 वर्षांपूर्वी एक लाखांची गुंतवणूकीचा परतावा आता अडीच कोटी रुपयांहून अधिक झाला आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.