AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mukesh Ambani : बुद्धीबळाचा हाच खेळाडू! 10 स्टॉकच्या जोरावर मुकेश अंबानी यांनी मारली बाजी

Mukesh Ambani : मुकेश अंबानी हे उद्योगपतीच नाही तर एक हुशार गुंतवणूकदार पण आहेत. या स्टॉकमध्ये केलेली गुंतवणूक त्यांना फायदेशीर ठरली आहे, त्यांना इतके टक्के परतावा मिळाला आहे.

Mukesh Ambani : बुद्धीबळाचा हाच खेळाडू! 10 स्टॉकच्या जोरावर मुकेश अंबानी यांनी मारली बाजी
| Updated on: Sep 16, 2023 | 3:44 PM
Share

नवी दिल्ली | 16 सप्टेंबर 2023 : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे भारतातच नाही तर आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत. रिलायन्सचे (Reliance Industry) चेअरमन आहेत. रिलायन्सच्या पंखाखाली अनेक कंपन्या आगेकुच करत आहेत. त्यांनी समूहातील काही कंपन्यांची जबाबदारी मुलांवर सोपवली आहे. रिलायन्सने या वर्षांत विस्ताराचा जोरदार वेग पकडला आहे. अंबानी हे केवळ उद्योगपतीच नाही तर हुशार गुंतवणूकदार म्हणून पण ओळखल्या जातात. स्टॉकएज नुसार, मुकेश अंबानी यांच्याकडे 11 कंपन्यांचे शेअर आहेत. चालू आर्थिक वर्षात त्यातील एकाच शेअरबाबत त्यांचा अंदाज चुकला. हा शेअर सध्या डाऊन साईडला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज अंबानी यांची मुख्य कंपनी आहे. तर जिओ फायनेन्शिअल शेअर बाजारात सूचीबद्ध झाला आहे. चला तर जाणून घेऊयात अंबानी यांच्या कोणत्या शेअरने जोरदार कामगिरी केली ते…

या 10 शेअर्सने केली मोठी कमाल

  1. आलोक इंडस्ट्रीज (Alok Industries) : चालू आर्थिक वर्षात 2023-24 मध्ये आतापर्यंत या शेअरने 68 टक्के परतावा दिला आहे.
  2. नेटवर्क 18 मीडिया अँड इन्व्हेसमेंट (Network 18 Media & Investments) : या शेअरने या वर्षात आतापर्यंत मुकेश अंबानी यांना 58 टक्के परतावा दिला आहे.
  3. डेन नेटवर्क्स (Den Networks) : या शेअरमध्ये या आर्थिक वर्षात एप्रिल महिन्यापासून 57 टक्के उसळी घेतली आहे. अंबानी यांना या शेअरने 57 टक्के परतावा दिला आहे.
  4. हाथवे भवानी केबलटेल अँड डेटाकॉम (Hathaway Bhawani Cabletel & Datacom) : या स्टॉकमध्ये यावर्षी आतापर्यंत 30 टक्के तेजी दिसून आली.
  5. स्टर्लिंग अँड विल्सन रिन्यूएबल (Sterling & Wilson Renewable) : या शेअरमध्ये अंबानी यांना या वर्षांत चांगला परतावा दिला. या शेअरमध्ये 26 टक्क्यांची उसळी दिसून आली.
  6. रिलायन्स इंडस्ट्रीज इन्फ्रास्ट्रक्चर (Reliance Industrial Infrastructure) : या स्टॉकमध्ये आतापर्यंत 24 टक्क्यांची तेजी दिसून आली.
  7. जस्ट डायल (Just Dial) : या शेअरमध्ये एप्रिलपासून ते आतापर्यंत 23 टक्क्यांची वृद्धी दिसून आली.
  8. टीवी18 ब्रॉडकास्ट (TV18 Broadcast) : या शेअरमध्ये या चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 21 टक्क्यांची उसळी दिसून आली.
  9. रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) : या स्टॉकमध्ये आतापर्यंत 5 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.
  10. हाथवे केबल अँड डेटाकॉम (Hathaway Cable & Datacom) : या स्टॉकमध्ये आतापर्यंत यावर्षात 36 टक्क्यांची वृद्धी दिसून आली.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.