Global Brand | जगातील 200 हून अधिक देशात ग्राहक, या कंपनीचे नाव नाही अनेकांच्या गावी

Global Brand | या कंपनीची स्थापना 1898 मध्ये झाली. ही कंपनी सध्या 200 हून अधिक देशात घट्ट पाय रोवून आहे. तिची उत्पादनं 100 कोटींहून अधिक ग्राहक दररोज वापरतात. पण या कंपनीचे नाव अनेकांना माहिती नाही. अनेक जागतिक पातळीवर कंपन्यांसारखंच साम्राज्य असणाऱ्या या कंपनीचे नाव अनेकांच्या गावी पण नाही. 

Global Brand | जगातील 200 हून अधिक देशात ग्राहक, या कंपनीचे नाव नाही अनेकांच्या गावी
Follow us
| Updated on: Oct 22, 2023 | 9:49 AM

नवी दिल्ली | 22 ऑक्टोबर 2023 : जगात अशा अनेक कंपन्या आहेत, ज्यांची स्वतःची अनेक उत्पादनं आहेत. पण त्याची माहिती फार थोड्या ग्राहकांना असते. देशात टाटा, बाटा, हिंदूस्थान लिव्हर आणि इतर अनेक कंपन्या आहेत. त्यांची उत्पादनं अनेकांना माहिती आहे. बाजारातील अशीच एक बिग जायंट कंपनी आहे. तिच्याकडे अनेक ब्रँड्स आहेत. या ब्रँड्सची बाजाराला ओळख आहे. हे उत्पादनं दररोज हातोहात खपतात. जगातील जवळपास 200 हून अधिक देशात कंपनीचे साम्राज्य आहे. दररोज 100 कोटींहून अधिक ग्राहक तिची उत्पादनं खरेदी करतात. कोणती आहे बाजारातील श्रीमंत कंपनी?

ही आहेत या कंपनीची उत्पादनं

  1. कोल्ड ड्रिंक- ड्रिंक्समध्ये या कंपनीकडे Looza, Marinda, Brisk, Ocean Spray, Mug, Mountain Dew, Sobe, Aquafina, Lipton, 7up, Tropicana, AMP energy, Pepsi, Gatorade आणि Dole हे ब्रँड आहेत.
  2. स्नॅक्स- स्नॅक्समध्ये कंपनीचा पोर्टफोलिओचा मोठा आहे. Ruffles, Fritos, Cheetos, Cracker Jack, Sun Chips, Tostitos, Rold Gold, Spitz, Lays आणि Doritos ही उत्पादनं आहेत.
  3. हे सुद्धा वाचा
  4. इतर ब्रँड्स कोणते- याशिवाय या मोठ्या कंपनीकडे इतर पण अनेक नामवंत ब्रँड्स आहेत. ओट्ससाठी प्रसिद्ध Quaker. तर हिची उपकंपनी Yum आहे, तिच्यातंर्गत KFC, Taco Bell आणि Pizza Hut असे ब्रँड्स येतात. Life, Harvest Crunch, Aunt Jemima, Crispy Minis आणि Chewy अशी जीभेवर रेंगाळणारी चव या ब्रँड्समुळे येते. ही कंपनी लहान मुलांसाठी पण उत्पादन तयार करते.

कोणती आहे ही कंपनी

या कंपनीचे उत्पादन तुम्ही नक्कीच कधी ना कधी चाखले असेल. पण लोकांना या कंपनीचे नाव माहिती नाही. किंवा नाव माहिती असले तरी तिच्या इतर उत्पादनांची माहिती नाही. तर पेप्सिको हा तो जागतिक ब्रँड आहे. तिच्या अनेक उत्पादनांचा वापर लोक करतात, पण त्याची माहिती त्यांना नाही. वरील सर्व ब्रँड्ची पॅरेंट कंपनी ही पेप्सिको आहे. पेप्सिको ही फास्ट फूड आणि ड्रिंक उत्पादन कंपनी आहे. तिची उत्पादनं जगभर नावाजलेली आहे. पेप्सिकोच्या फूड पोर्टफोलिओमध्ये स्नॅक्स, न्यूट्रिशियन्स फूड आणि बेव्हरेज यांचा समावेश आहे.

पेप्सिकोविषयी घ्या जाणून

पेप्सिकोचे आज 200 हून अधिक देशात ग्राहक आहेत. कंपनीच्या वेबसाईटवर केलेल्या दाव्यानुसार, जगभरातील 100 कोटींहून अधिक ग्राहक दररोज उत्पादने वापरतात. 2022 मध्ये पेप्सिकोने 86 अब्ज डॉलरचा महसूल मिळवला. पेप्सिकोच्या इतर उत्पादनांचा वार्षिक महसूल 1 अब्ज डॉलरपेक्षा अधिक आहे. या कंपनीची स्थापना 1898 मध्ये झाली. तर Lays सुरुवात 1932 मध्ये करण्यात आली. या कंपनीची उत्पादनं लॅटिन अमेरिका, युरोप, आशिया-पॅसेफिक, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, चीन, आफ्रिका, मध्य-पूर्वेतील देशांसह सर्वच भागात पोहचतात.

देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.