Bonus Share : कोण देतं हो 15 बोनस शेअर, ही दिग्गज कंपनी करणार कारनामा

Bonus Share : केमिकल सेक्टरमध्ये काम करणाऱ्या या स्मॉल कॅप कंपनीने गुंतवणूकदारांना सणापूर्वीच मोठी लॉटरी लावली. गुरुवारी या शेअरमध्ये मोठी उसळी आली. हा शेअर तीन टक्क्यांनी वधारला. हा शेअर 90 रुपयांवर पोहचला. आता ही कंपनी गुंतवणूकदारांना 15 बोनस शेअर देण्याच्या तयारीत आहे.

Bonus Share : कोण देतं हो 15 बोनस शेअर, ही दिग्गज कंपनी करणार कारनामा
Follow us
| Updated on: Sep 28, 2023 | 7:26 PM

नवी दिल्ली | 28 सप्टेंबर 2023 : शेअर बाजारात (Share Market) धडामधूम सुरुच आहे. चढउताराचे सत्र सुरु असल्याने काही शेअर घसरत आहेत. तर काहींमध्ये तेजी दिसून येत आहे. यापूर्वी बाजाराने सलग 11 दिवसांचे तुफानी खेळ दाखवला आहे. आता बाजार घसरणीला असला तरी काही शेअरची कामगिरी जोरदार आहे. गुरुवारी या कंपनीचा शेअर 3 टक्क्यांनी वधारला. हा शेअर आता 90 रुपयांच्या घरात आहे. कंपनीच्या संचालकांनी पात्र गुंतवणूकदारांना 15:100 प्रमाणात बोनस शेअर (Bonus Share) देण्याची तयारी केली आहे. त्यासाठी रेकॉर्ड डेट 5 ऑक्टोबर 2023 ही ठेवण्यात आली आहे. त्यामुळे सध्या गुंतवणूकदार जाम खूश आहेत. त्यांना अचानक लॉटरी लागली आहे.

कशी आहे कामगिरी

युग डेकोर असे या कंपनीचे नाव आहे. कंपनीचा कारभार जगभर पसरलेला आहे. हा शेअर गेल्या दोन वर्षांत 380 टक्क्यांनी वधारला आहे. तर गेल्या एका वर्षात हा शेअर 47 टक्क्यांनी उसळला आहे. युग डेकोरचा शेअर गेल्या 52 आठवड्यातील उच्चांकावर पोहचला आहे. हा शेअर 119.90 रुपयांहून 23 टक्क्यांनी निच्चांकी ट्रेड करत आहे. युग डेकोरचा शेअर गेल्या तीन महिन्यात 22 टक्क्यांपेक्षा अधिक वाढला आहे. गेल्या 3 वर्षांत हा शेअर 406 टक्के तर गेल्या पाच वर्षांत हा शेअर 386 टक्क्यांनी वधारला आहे. आता बोनस शेअरच्या वृत्तामुळे कंपनीचा शेअर घेण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या आहेत. कंपनीचा शेअर अजून वधारण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

कंपनीचा पसारा जगभर

युग डेकोर ही कंपनी एडहेसिव्ह, पीव्हीए गोंद, लाकूड जोडण्यासाठीचे डिंक, बुट जोडण्यचा गोंद, सर्व चिकटविण्याचे पदार्थ ही कंपनी तयार करते. कंपनी भारतीय आहे. या कंपनीचा कारभार आशिया, युरोप आणि आफ्रिकासह जगभरात पसरला आहे. या कंपनीचे बांगलादेश, दुबई, सौदी अरब, इथिओपिया, इराक, मोझांबिक, नेपाळ, श्रीलंकेसह इतर देशात ग्राहक आहेत.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.