Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

3 Stocks to buy | या 3 स्टॉकवर ठेवा नजर, लाभांश मिळेल बंपर

3 Stocks to buy | बरेच गुंतवणूकदार लाभांश देणाऱ्या स्टॉकमध्येच गुंतवणूक करतात. त्यांच्यासाठी येणारा सप्टेंबर महिना खास राहणार आहे. त्यांना गुंतवणुकीवर तगडा लाभांश मिळण्याची शक्यता आहे.

3 Stocks to buy | या 3 स्टॉकवर ठेवा नजर, लाभांश मिळेल बंपर
लाभांश मिळेल बंपरImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 15, 2022 | 4:53 PM

3 Stocks to buy | बरेच गुंतवणूकदार लाभांश (Dividends) देणाऱ्या स्टॉकमध्येच गुंतवणूक करतात. त्यांच्यासाठी येणारा सप्टेंबर महिना खास राहणार आहे. त्यांना गुंतवणुकीवर तगडा लाभांश मिळण्याची शक्यता आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात बहुतेक गुंतवणूकदारांना (Investors) लॉटरी लागते. त्यांना लाभांश मिळतो. जेवढे जास्त शेअर तेवढा लाभांश पदरात पडतो. अनेक जण त्यासाठी सरकारी कंपन्या (Government Companies) आणि चांगला व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांच्या शोधात असतात, ज्या त्यांना चांगला लाभांश देतील. जुलै, ऑगस्ट महिन्यात काही कंपन्यांनी गुंतवणूकदारांना मालामाल (good returns) केले तर काहींना हवा तसा मोबदला मिळाला नाही. आता सप्टेंबर (September) महिन्यात पुन्हा गुंतवणूकदारांना लाभांश मिळण्याची संधी मिळाली आहे. हे 3 स्टॉक बंपर परतावा देऊ शकतात, असा तज्ज्ञांचा व्होरा आहे. त्यामुळे बाजारातील तज्ज्ञांच्या मदतीने आणि अभ्यासाअंतीच हे स्टॉक्स खरेदी करण्याचा निर्णय घ्या.

एलआयसी हाउसिंग फाइनेंस

या कंपनीने 425 रुपये लाभांश जाहीर केला आहे. हे शेअर्स 2 रुपये दर्शनी मूल्यासह असल्याने त्यासाठीचा लाभांश प्रति शेअर 8.5 रुपये आहे. 19 सप्टेंबर 2022 रोजी लाभांश देण्याची आगाऊ तारीख घोषीत करण्यात आली आहे. कंपनी त्यांच्या उत्पादनांच्या फायद्याचे गणित तपासत आहे.

हे सुद्धा वाचा

एलआयसी हाऊसिंग फायनान्सची (LIC Housing Finance) प्रगती 30 जून 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत अधिक चांगली होती, ज्यामध्ये ईपीएस (EPS) 16.80 रुपये होता. तज्ज्ञांच्या दाव्याप्रमाणे हा ईपीएस 2022-23 या वर्षासाठी 80 रुपये असू शकतो. सध्याच्या 380 रुपयांच्या किंमतीवर हा शेअर जेमतेम 5 पट किंमतीवर व्यापार करत आहे. सध्याच्या 380 रुपयांच्या स्तरावर खरेदी करण्यासाठी हा एक चांगला स्टॉक असल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे.

Banco Products

बँको प्रोडक्ट्स इंडियाने 1000% लाभांश जाहीर केला आहे आणि या स्टॉकची लाभांशची तारीख 6 सप्टेंबर 2022 ही आहे. इंजिन कूलिंग सिस्टम आणि इंजिन सीलंटमध्ये बॅन्को प्रॉडक्ट्स सर्वात दमदार खेळाडू मानल्या जातो. कंपनीने स्टॉक एक्सचेंजला लाभांश देण्याविषयीची तारीख कळवल्याचे समजते.

Gulf Oil Lubricants

गल्फ ऑईल ल्युब्रिकंट्स हा ही एक दमदार शेअर आहे. त्याने यापूर्वी ही गुंतवणूकदारांना चांगला लांभाश दिला आहे. त्याचा ट्रॅक रेकॉर्डही सातत्यपूर्ण आहे. 8 सप्टेंबर 2022 रोजी हा शेअर लाभांश देण्याची शक्यता आहे. या कंपनीने तिमाहीत ही चांगली प्रगती नोंदवली आहे. कंपनीने तिमाहीत 69.26% वाढीसह 706 कोटी रुपयांवर विक्रमी कमाई केली. ही कंपनी हिंदुजा ग्रुपचा भाग आहे.

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.