Leena Tiwari : 30 हजार कोटींच्या घरात संपत्ती, पण प्रसिद्धपासून दूर, कोण आहेत लीना तिवारी

Leena Tiwari : लीना तिवारी यांना वाचनाची आवड आहे. त्या सोशल मीडिया आणि पार्टी कल्चरपासून कोसो दूर आहेत. त्यामुळे अनेक लोकांना त्यांचा परिचय नाही. त्या भारतातील पाचव्या सर्वात श्रीमंत महिला आहेत. तसेच त्या मोठ्या दानशूर पण आहेत.

Leena Tiwari : 30 हजार कोटींच्या घरात संपत्ती, पण प्रसिद्धपासून दूर, कोण आहेत लीना तिवारी
Follow us
| Updated on: Sep 02, 2023 | 3:51 PM

नवी दिल्ली | 2 सप्टेंबर 2023 : देशात अनेक महिला पुरुषांच्या खाद्यांला खांदा लावून प्रगती करत आहेत. महिलांनी अनेक क्षेत्रात नाव कमावले आहे. आज प्रत्येक क्षेत्रात महिलांचा बोलबाला आहे. व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रात तर महिलांनी मोठी झेप घेतली आहे. आज देशातील अनेक महिलांनी व्यवसायात हजारो कोटींचा टप्पा गाठला आहे. त्यांची संपत्तीच कोट्यवधी रुपयांची आहे. लीना तिवारी (Leena Tiwari) यांनी पण मोठी कामगिरी बजावली आहे. त्या भारतातील पाचव्या सर्वात श्रीमंत महिला (Richest Women in India) आहेत. त्यांना वाचनाची आवड आहे. पण त्या सोशल मीडिया आणि पार्टी कल्चरपासून दूर आहेत. त्यांनी मेहनतीने कोट्यवधींच्या उलाढालीची कंपनी उभी केली आहे. त्यांच्या कंपनीत हजरो लोक काम करतात. त्यांच्या कंपनीची उलाढाल पण मोठी आहे. त्या मोठ्या दानशूर पण आहेत.

श्रीमंतीत टॉप-5 मध्ये

लीना तिवारी फॉर्मा कंपनी यूएसव्ही इंडियाच्या चेअरमन आहेत. फोर्ब्सच्या या वर्षी एप्रिल महिन्यातील यादीत भारतातील सर्वात श्रीमंत महिलांमध्ये त्या पाचव्या क्रमांकावर होत्या. फॉर्मा कंपनी यूएसव्ही इंडियाची स्थापना त्यांचे वडील विठ्ठल गांधी यांनी केली होती. 1961 मध्ये ही कंपनी सुरु करण्यात आली होती. आता तिवारी या 65 वर्षांच्या आहेत. फोर्ब्सने 2022 मध्ये लीना तिवारी यांना भारतातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत त्यांना 51 वे स्थान दिले होते.

हे सुद्धा वाचा

इतक्या हजार कोटींच्या धनी

लीना तिवारी या खासगी कंपनी USV इंडियाच्या मालक आहेत. त्यांची एकूण संपत्ती 3.7 अब्ज डॉलर म्हणजे 30,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. लीना तिवारी बायोकॉनच्या किरण मजुमदार शॉ, Nykaa ची फाल्गुनी नायर आणि जोहो कॉर्पची राधा वेंबू यांच्या पुढे आहेत. त्या भारतातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत अग्रेसर आहेत.

मुंबई विद्यापीठातून शिक्षण

लीना तिवारी यांनी मुंबई विद्यापाठीतून शिक्षण पूर्ण केले. त्यांनी वाणिज्य शाखेतून पदवी घेतली. तर बोस्टन विद्यापीठातून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. त्यांना पर्यटन आणि पुस्तक वाचण्याचा छंद आहे. त्या पार्टी कल्चरपासून दूर राहतात. त्या सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत.

प्रशांत तिवारी यांच्याशी लग्न

लीना तिवारी यांचे पती प्रशांत तिवारी आहे. ते युएसव्हीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. कंपनीचा कारभार ते पाहतात. प्रशांत तिवारीने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (IIT) मधून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. अमेरिकेतील Cornell विद्यापीठातून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यांना अनिशा तिवारी ही मुलगी आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.