5G Jobs : 5G उघडेल तुमचे नशीब, आता अनुभवा नोकऱ्यांचा पाऊस..
5G Jobs : 5G केवळ मनोरंजनापुरते मर्यादीत राहणार नाही तर अनेक क्षेत्रात क्रांती येणार आहे..
नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (RIL) रिलायन्स जिओने (Reliance Jio) शनिवारी राजस्थानमध्ये 5जी नेटवर्क वर आधारित वाय-फाय सेवा सुरु केली. रिलायन्स जिओचे संचालक आकाश अंबानी यांनी नाथद्वारा 5G सेवा सुरु केली. टेलिकॉम क्षेत्रातील या कंपनीने दिल्ली, मुंबई, कोलकत्ता आणि वाराणसी या शहरातही 5G सेवेचा शुभारंभ केलेला आहे.
आता तुम्ही विचार करत असाल की 5G मुळे मुलं अजून मोबाईल आणि लॅपटॉपला घट्ट चिपकून बसतील तर हा अंदाज साफ चुकीचा आहे. कारण केवळ मनोरंजनासाठीच 5Gचा वापर होणार नाही.
5G मुळे देशात रोजगाराच्या नव्या दालनाची दार उघडेल. कुशल तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे. या सेवेमुळे अनेक क्षेत्रात क्रांती येणार आहे. तंत्रज्ञान आले म्हणून नोकऱ्या जाणार नसून अनेक नवीन क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची गरज पडणार आहे.
देशात 5G सेवेमुळे मोबाईलमध्ये इंटरनेटचा झंझावात येईल. सोबत नोकऱ्यांचा पाऊसही पडेल. सुरुवातीच्या टप्प्यातच देशात जवळपास 80 हजार जणांना थेट नोकऱ्या मिळतील असा दावा करण्यात येत आहे.
टेलिकॉम सेक्टरमध्ये थेट नोकरीसोबतच अप्रत्यक्ष रोजगारही मिळतील. मोबाईल टॉवर, मोबाईल हँडसेट्स, नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर, 5G सिक्योरिटी, सायबर सिक्योरिटी यासह इतर क्षेत्रात भरपूर संधी उपलब्ध होतील.
सरकारच्या अंदाजानुसार, 5G मुळे देशात नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध होतील. टेलिकॉम कंपन्या पुढील 2 ते 3 वर्षांत जवळपास 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात 80 हजार नागरिकांना थेट रोजगार प्राप्त होईल.
ग्लोबल जॉब वेबसाइट इन्डीड (Indeed) च्या दाव्यानुसार, टेलिकॉम सेक्टरमध्ये गेल्या वर्षभरात नोकऱ्यांमध्ये 33 टक्के वृद्धी झाली आहे. 5G मुळे 2040 पर्यंत 450 अरब डॉलरची उलाढाल होण्याची शक्यता आहे.