मे महिन्यात जीएसटीमध्ये 65 टक्के वाढ, जाणून घ्या सरकारी तिजोरीत किती रक्कम आली

आयात केलेल्या वस्तूंच्या माध्यमातून आंतर जीएसटीमध्ये 26002 कोटी रुपये जमा झाले आहेत. सेसकडून एकूण 9265 कोटी प्राप्त झाले आहेत. सेसमधून 868 कोटींचा उपकर आयात वस्तूंच्या माध्यमातून आला आहे. (65 percent increase in GST in May, know how much came to the government)

मे महिन्यात जीएसटीमध्ये 65 टक्के वाढ, जाणून घ्या सरकारी तिजोरीत किती रक्कम आली
हॉटेल किंवा रेस्टॉरंटचा व्यवसाय करताय, तर मग जीएसटीचा हा नियम जाणून घ्या
Follow us
| Updated on: Jun 05, 2021 | 6:25 PM

नवी दिल्ली : मे महिन्यात सरकारच्या जीएसटी कलेक्शनमध्ये वाढ झाली आहे. मे मध्ये जीएसटी कलेक्शनमधून सरकारच्या तिजोरीत 1 लाख 2 हजार 709 कोटी रुपये जमा झाले. यात केंद्रीय जीएसटी 17592 कोटी, राज्य जीएसटी 22653 कोटी आणि आंतर जीएसटी 53199 कोटी होती. आयात केलेल्या वस्तूंच्या माध्यमातून आंतर जीएसटीमध्ये 26002 कोटी रुपये जमा झाले आहेत. सेसकडून एकूण 9265 कोटी प्राप्त झाले आहेत. सेसमधून 868 कोटींचा उपकर आयात वस्तूंच्या माध्यमातून आला आहे. मे 2021 मध्ये वार्षिक आधारावर एकूण जीएसटीमध्ये 65 टक्के वाढ झाली आहे. (65 percent increase in GST in May, know how much came to the government)

सलग आठव्या महिन्यात 1 कोटींचा टप्पा पार

सलग आठवा महिन्यात जीएसटी कलेक्शनने 1 लाख कोटींचा टप्पा पार केला आहे. मे महिन्यात सरकारने 15014 कोटी सीजीएसटी आणि 11653 कोटी एसजीएसटीची नियमित सेटलमेंट केली आहे. अर्थ मंत्रालयाने शेअर केलेल्या माहितीनुसार वस्तूंच्या आयात वाढीमुळे महसुलात 56 टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशांतर्गत व्यवहारांमध्ये वर्षाकाठी 69 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जीएसटी कलेक्शनने एक लाख कोटींचा आकडा पार केला हा सलग आठवा महिना आहे. कोरोनाच्या नव्या लाटेमुळे काही राज्यांमध्ये स्थानिक लॉकडाउन लादण्यात आले आहे. असे असूनही जीएसटी कलेक्शनने 1 लाख कोटींचा टप्पा ओलांडणे हे आर्थिक पुनर्प्राप्तीच्या दृष्टीने भक्कम संकेत आहे.

नियमात बदल झाल्यामुळे अंतिम डेटामध्ये बदल होईल

सरकारनेही नियमात बदल केला आहे. नवीन नियमांतर्गत, ज्यांची वार्षिक उलाढाल 5 कोटींपेक्षा जास्त आहे ते आता पुढील महिन्याच्या 4 तारखेपर्यंत रिटर्न भरू शकतात. म्हणजे, मे महिन्यासाठी रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 4 जूनपर्यंत होती, जी आधीच्या नियमानुसार 20 मे असायची. ज्यांची उलाढाल 5 कोटींपेक्षा कमी आहे ते जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत विलंब शुल्क न देता परतावा दाखल करू शकतात. अशा परिस्थितीत मे महिन्यासाठी निव्वळ जीएसटी संकलन यापेक्षा अधिक होईल, अशी अपेक्षा होती. (65 percent increase in GST in May, know how much came to the government)

इतर बातम्या

रात्रीची वेळ, सामसूम रस्ता, भरधाव कार, चालकाचा गाडीवरील ताबा सुटला, मंडळ अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू

शिवसेना-भाजप पुन्हा कधी एकत्र येऊ शकतात? उद्धव ठाकरे म्हणतात..

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.