7th Pay Commission: सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे 10 हजारांची ग्रेड असणाऱ्या सरकारी कर्मचार्‍यांना 2.88 लाख मिळणार, पण कसे?

आता सरकारच्या या निर्णयामुळे 10,000 रुपये ग्रेड असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना सुमारे 2.88 लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे. संपूर्ण गणना कशी केली जाईल ते जाणून घ्या. 

7th Pay Commission: सरकारच्या 'या' निर्णयामुळे 10 हजारांची ग्रेड असणाऱ्या सरकारी कर्मचार्‍यांना 2.88 लाख मिळणार, पण कसे?
पीएफ अकाऊंट
Follow us
| Updated on: Jul 14, 2021 | 5:10 PM

नवी दिल्लीः 7th Pay Commission: केंद्रीय मंत्रिमंडळाने अखेर कोट्यवधी केंद्रीय कर्मचारी 18 महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या निर्णयाला मान्यता दिली. सातव्या वेतन आयोगांतर्गत महत्त्वपूर्ण निर्णय घेत मंत्रिमंडळाने केंद्रीय कर्मचार्‍यांचा डीए 11 टक्क्यांनी वाढवून 28 टक्के करण्यास मान्यता दिलीय. आता सरकारच्या या निर्णयामुळे 10,000 रुपये ग्रेड असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना सुमारे 2.88 लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे. संपूर्ण गणना कशी केली जाईल ते जाणून घ्या.

जून 2020 मध्ये, महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढविण्यात आला

पहिल्यांदाच सरकारने जानेवारी 2020 मध्ये डीएमध्ये 4 टक्के वाढ केली होती. यानंतर जून 2020 मध्ये, महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढविण्यात आला. जानेवारी 2021 मध्येही महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढविला.

कर्मचाऱ्यांना याचाच फायदा होणार

ज्या सरकारी कर्मचाऱ्यांचा ग्रेड पगार 10,000 च्या ब्रॅकेटमध्ये येतो. म्हणजेच 1,44,200 ते 2,18,200 रुपयांच्या मूलभूत पगाराच्या श्रेणीत येतो. अशा स्थितीत जर 1 जानेवारी 2020 ते जून 2020 या कालावधीत त्या कर्मचार्‍याच्या डीएची रक्कम 34608 ते 52368 रुपये होईल. यानंतर 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत पुढील 6 महिन्यांचा हप्ता 60564 रुपयांपासून ते 91644 रुपयांपर्यंत होणार आहे. डीए अद्याप शिल्लक असल्याने पुढील जानेवारी 1,21,2021 ते 30 जून 2021 या कालावधीत पुढील 7 महिन्यांची थकबाकी 95,172 ते 1,44,012 रुपये आहे. या सहा महिन्यांचे हे तीन हप्ते जोडले गेले तर ही रक्कम 1,90,344 रुपये ते 2,88,024 रुपयांपर्यंत असेल. म्हणजेच, या टप्प्यात येणार्‍या सरकारी कर्मचाऱ्यास 18 महिन्यांपर्यंत एकूण 2.88 लाख रुपयांचा लाभ मिळू शकेल.

28 % दराने लाभ मिळेल

सरकारने केंद्रीय कर्मचार्‍यांना डीए 17 टक्क्यांवरून 28 टक्क्यांपर्यंत वाढविला. अशा प्रकारे आता कर्मचार्‍यांना पूर्ण 28 टक्के लाभ मिळू शकेल. आता सरकारने त्यास मान्यता दिलीय. अशा परिस्थितीत थकबाकी आणि वाढीव डीएसह शासकीय कर्मचार्‍यांना वेळेवर पैसे मिळायला हवेत, 10 हजार रुपये ग्रेड पे असणाऱ्यांना जास्तीत जास्त 2.88 लाख रुपये मिळू शकतात. वास्तविक कोरोनामुळे डीए म्हणजेच सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यावर बंदी होती, जी आता सरकारने 28 टक्के मंजूर केलीय.

संबंधित बातम्या

पोस्टाच्या ‘या’ योजनेत FD पेक्षा अधिक व्याज, अवघ्या 5 वर्षांत 7 लाख मिळण्याची संधी, पटापट तपासा

Cabinet Decision: सामान्य माणसाच्या हितासाठी सरकारचे मोठे निर्णय; कोणाला होणार फायदा आणि कसा ते जाणून घ्या

7th Pay Commission: Due To The Government’s decision, government employees with a grade of 10,000 will get Rs 2.88 lakh

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.