सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, महागाई भत्ता पुन्हा सुरु, किती टक्के वाढ?

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोलमडलेल्या आर्थिक गणितांमुळे बंद झालेला केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महाभाई भत्ता पुन्हा सुरु झाला आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, महागाई भत्ता पुन्हा सुरु, किती टक्के वाढ?
cash
Follow us
| Updated on: Jul 20, 2021 | 10:10 AM

नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोलमडलेल्या आर्थिक गणितांमुळे बंद झालेला केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महाभाई भत्ता पुन्हा सुरु झाला आहे. इतकंच नाही तर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महाभाई भत्त्यात 4 टक्के वाढही केली आहे. त्यामुळे एकूणच केंद्रीय कर्मचाऱ्यांची डबल लॉटरी लागली आहे. याचा फायदा जवळपास 1 कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार आहे. यात 48 लाख कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांचा समावेश आहे.

केंद्र सरकारने एकाच वेळी महागाई भत्ता पुन्हा सुरु करण्याचा आणि महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये चांगलंच आनंदाचं वातावरण आहे. महागाई भत्त्यात वाढ झाल्याने या कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारात चांगलीच वाढ होणार आहे. आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 17 टक्के महागाई भत्ता देण्यात येत होता. मात्र आत्ताच्या 4 टक्के वाढीसह हा महागाई भत्ता 21 टक्के झाला आहे. असं असलं तरी या निर्णयाची अंमलबजावणी कधी होणार याची अधिकृत घोषणा होणं बाकी आहे. त्यामुळे सरकारच्या या तारखेकडे सर्वच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या नजरा टिकून आहेत.

केंद्र सरकारच्या कॅबिनेटने मार्च 2020 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना अधिकचा महागाई भत्ता देण्याच्या निर्णयाला मंजूरी दिली होती. या निर्णयाची अंमलबजावणी 1 जानेवारी 2020 पासून करण्यात येणार आहे. अर्थमंत्र्यांनी स्वतः सध्याची महागाई लक्षात घेता कर्मचाऱ्यांना 4 टक्के अधिकचा महागाई भत्ता देण्याची माहिती दिली. विशेष म्हणजे या निर्णयाचा फायदा निवृत्त झालेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना देखील होणार आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर आता सरकारच्या तिजोरीवर डीएचा दरवर्षी 12 हजार 510 कोटींचा आणि डीआरचा 14 हजार 595 कोटींचा (आर्थिक वर्ष 2020-21) बोजा पडणार आहे.

हेही वाचा :

केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी Good News; महागाई भत्ता लवकरच वाढण्याची शक्यता

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता ‘या’ महिन्यापासून मिळण्याची शक्यता

बुलेट ट्रेन रोखा, कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता रोखणं अमानवीय : राहुल गांधी

व्हिडीओ पाहा :

7th Pay Commission Latest News DA hiked by 4 per cent for central govt employees

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.